रात्र वैऱ्याची - भाग 2
रात्र वैऱ्याची - भाग 2
(मागील भागात आपण पाहिले की सौम्या त्या भयानक रात्रीत एकटीच प्रवास करत होती, आईची माया तिला मोठ्यात मोठा धोका ही पत्करण्याची हिम्मत देत होती..)
अशातच अचानक समोरून आलेला तो लख्ख प्रकाश तिच्या डोळ्यांवर पडतो. आणि त्या प्रकाशाने तिचा रस्त्याचा अंदाज चुकतो अता पुढे..!
अचानक समोरून आलेल्या प्रकाशाने सौम्याला काहिच दिसेना झाले.. ती अंदाजेच चालत राहिली, काही क्षणात तो ब्रेक्सचा कर्कश आवाज..... किती वेळ गेला काय झाले तीला काहिच कळत नव्हते, मनात फक्त चिऊची चिंता तिला खात होती. तिला जाणवत होतं ते फक्त वेदनेने भरलेल शरीर, आणि त्या भयाण रात्रीची भयानकता, रक्ताने माखलेले तिचे ते हातपाय ती सुन्न झाली होती ऊठून ऊभी राहण्यास तळमळत होती वेदना ईतक्या असाहाय्य होत्या की, साध हात हालवन ही तीला जमत नव्हते..
अशातच ती किलकिल्या डोळ्यानी बघत होती मनात मात्र चिऊची चिंता हे काय झाल..? या विचारातच तीच्या डोळ्यांपुढे अंधारी येवू लागली तीला काहिच दिसेना हळू-हळू तीच शरीर तीच मन लाखो विचारांतून आणि असहाय्य अश्या त्या वेदणेतून अनभिज्ञ झाल..
कोणतीच जाणीव तिला होत नव्हती ना त्या भयान रात्रीची भयानकता जाणवत होती ना त्या शरीराच्या जखमा..
ना पावसाचे थेंब तिला भिजवत होते ना कोणतीच हालचाल.. अशातच ती उठली इकडेतिकडे पाहिले ना हवेच्या झुळकेचा भास होता ना ओलाव्याचा ओला स्पर्श.. अता फक्त मनात होती ती चिऊ..
उठताच ती सैर भैर झाली स्वतःशी अर्त हाकेचा आक्रोश केला,,,,, पण ऊपयोग काय..? अता तीचा तो आक्रोश कुणालाच ऐकू येत नव्हता..
स्वतःशी आक्रोश करत तिची नजर भिरभिरली आणि,,,आणि, तिला तिचंच शरीर निपचीत पडलेल दिसलं.. स्पर्शाभूती तिने गमावली होती.. अगदी काहीच क्षणांच्या त्या कर्कश अवाजात ती स्वतःचा जीव गमावून बसली होती.. याची कल्पना तिला अता झाली की आपण अता या दुनियेचा निरोप घेतला आहे.. जखमेतून रक्त वाहनं थांबल होतं. लाखो यातनेपासून शरीर ही अता मुक्त होऊन निपचित पडून होतं.. आजूबाजूचे ते दोन-तीन लोक फक्त ती आहे की गेली याची शहानिशा करत होते.. काय प्रकार आहे हा..? तिने त्यांना जरा शंकेच्या नजरेने पाहिले.
त्यातला एकजण फोनवर बोलत होता. "साहब आपका काम हो गया है..!" आप हमारा माल तयार रखें..
हे काय...? म्हणजे हा प्लान होता..? सौम्या एकदम शॉक्ड झाली.. हा जर प्लान असेल तर या मागे कोण..? नाही मला याचा शोध घेतला पाहीजे.
पण हे कोण करेल आणि का..? काय बिघडवलं होतं मी कुणाचं..? मनात लाखो प्रश्न घेऊन सौम्या स्वतःच्याच मृत्यूचा आक्रोश करू लागली. काळीज भेदून टाकणारा तिचा तो आक्रोश,,,,, त्या भेदक वातावरणात ऐकणारा कोणीच नव्हता. त्या गाडीतून उतरलेले ते तीन लोक ती म्रूत झाल्याची खात्री करून तेथून निघून गेले..
ती धाय मोकलून तिथेच रडत होती. ओरडत होती पण,,, पण उपयोग काहीच नव्हता तिची हाक, तिची विनवणी अता या जगाला अनभिज्ञ झाली होती.. तिचा अवाज तिचं अस्तित्व अता या जगातून कायमच नाहीस झाल होतं.. या जगासाठी तिचा प्रवास कायमचा संपला होता.. पण शेवटी आई ती आई असते ना..? तिच्या चिमुरडीची चिंता, तिची काळजी तिला परत घेऊन आली होती.. तिच्या विनवणीकडे कोणाचंच लक्ष नाही, आपल्याला कोणी ऐकूच शकत नाही हे लक्षात घेऊन तिने जवळंच तिच्या पर्सच्या बाजूला पडलेला तिचा मोबाईल फोन ऊचलला.. तिची मैत्रीण अनन्याला कॉल लावला पण तिने कॉल घेतलाच नाही.. असेच दोनतीन जणांना कॉल केले पण कोणीच कॉल घेतला नाही..
सार्थक,,, हा सार्थकला कॉल करते तसेही अता वादविवादाची वेळ आपल्याकडे राहिलीच नाही.. ( सार्थक हा सौम्याचा नवरा काही कारणांवरून भांडण करून दोघे वेगळे झालेले) सार्थकला कॉल केला त्याने ही घेतला नाही. तिने परत परत कॉल केला.. शेवटी त्याने फोन घेतला,
हॅलो... सौम्या काय झाले इतक्या रात्री,,, ?
सौम्या काही बोलायच्या आतच तो तिकडून बोल्ला आणि अर्ध्यावरच थांबला..
सार्थक अरे प्लीज घरी ये ना अरे आपली चिऊ,,,,
चिऊ,,,, काय झालं चिऊ ला...?
अरे आपली चिऊ.....
अगं सौम्या सांग ना काय झालय चिऊ ला ...
अरे सार्थक तू ये ना घरी,, घरी चिऊ एकटीच आहे रे माझा रोडमध्ये अपघात झालाय प्लीज तू चिऊला घेऊन ये..
हो,, हो मी लगेच निघतो तू अत्ता आहेस कुठे..?
मी,,, मी अता शहराच्या बाहेरच्या त्या झाडीवाल्या रस्त्यावर आहे.
पण तू आधी घरी जा..
हो तू घाबरू नको मी आलोच लगेच
इतकं बोलून तो फोन ठेवून देतो आणि लगेच निघतो..
कितीदा सांगत होतो हिला नको जॉबच्या मागे लागू पण ऐकेल तर खरं ना.. याच कारणावरून कायमची कटकट आणि त्यातूनच वेगळे,,, स्वतःशीच बडबडत सार्थक गाडी पळवत होता. चिऊकडे जाण्यापेक्षा त्याने सरळ सौम्याकडे गाडी वळवली. जाताजाताच त्याने अँब्युलन्सला कॉल केलेला. इकडे सौम्या तिथेच स्वतःच्या निपचित पडलेल्या शरीराकडे पाहून रडत बसली होती.. अचानक तिच्या मनात एक तळमळ उठली आणि तिने तडक घराकडे धाव घेतली.
आपण अता एक आत्मा आहोत केव्हाही कुठेही जाऊ शकतो,,,, आणि ती तडक घराकडे धावली...
(क्रमश:)


