Ganesh Phapale

Others

2  

Ganesh Phapale

Others

वेश्या

वेश्या

4 mins
247


वेश्या,,,,,,,,,,,! काय असते? सर्वसामान्य लोकांच्या मते ति एक समाजाला काळिमा फासणारी कलंकित अशी, आणि ४ पैश्याची भूरळ असलेलि देह व्यापार करणारी एक तुच्छ स्री जात,ईतकच कदाचित आपला सर्वसामान्य समाज तिला ओळखतो,,, आणि सर्व सामान्य समाज तरी कोणता हो,,,,? जो दिवसाच्या उजेडात येणाऱ्या जाणार्या मूलि महिलांचे शरिर न्याहळतो, तोंडाला येईल ते शब्दोच्चार करून परिसरात आपल्या स्वच्छ संस्कारांची ऊधळन करतो, आणि तोच दिवसातला सफेद बगळा रात्रीच्या अंधारात तिकडे त्या वेश्येचे शरीर कुस्करत असतो, तोच खरा वेश्या या नावाने चिडलेला दिसून येतो,,,,,!


वेश्या जरी असलि, देह व्यापार जरी करत असलि तरी ती एक स्त्री आहे, आणि तीही मातृत्व प्राप्त असलेली एक माता असते, फरक ईतकच कि आपण लोक ना तिला स्रिचा दर्जा देतो आणि नाही तिच्या मूलांना या खूल्या समाजात वावरण्याचा हक्क,,,,,,! त्यात त्या चिमूकल्यांचा काय दोष असेल,,,? ईतकच कि कुणाच्या तरि वासनेतून जन्म घेतला हा,,? कि एक देह विकनार्या महिलेच्या पोटी जन्म घेतला हा,,,,,? मला माहीत नाही मि योग्य बोलतोय कि अयोग्य पण मला ईतकच सांगायचे आहे कि, वेश्या व्यवसाय करणारी स्त्री ही स्वतःची शरीर भूक भागविण्यासाठी तरी मूळिच या व्यवसायात पडत नाहीत,,,,,! मंग अता हा प्रश्न निर्माण होईल कि हौस नाही तर मंग हाच व्यवसाय का,,,,? इतरही स्त्रिया आहेत ज्या आर्थिक स्थितीने कमजोर असतात मंग त्या सर्वसामान्य पणे आपले आयुष्य जगतात मंग याच का अशा व्यावसायात पडतात,,,,,? पडला ना प्रश्न,,,,?


सर्वांची कारणे मला माहीत तर नाही, पण ईतक सांगू शकतो कि, अर्थिक आणि शारिरीक परिस्थिती दुर्बल असेल तर नाविलाजे त्यांना हा मार्ग पत्कारावा लागतो,,,,,,,आणि काहींना आपल्या समाजातील ऊमरट, ऊपवासकरू असतात हे भाग पाडतात,,,,,, आणि अशाच काही उमरटांमूळे स्वतःला या चिखलात फेकून घेतलेली एक ति,,,, ति म्हणजे " आशा " नाव तिच,,,,, जिची जगण्याची आशाच संपलि आहे अशि ही एक "आशा" नावाची ३२शीतलि तरूणी, वयाच्या १८ व्या वर्षी लग्न झालं, आणि ४/६ वर्षात सोबत्याची एका accident मध्ये प्राण ज्योत मालावलि, घरात म्हतारे सासू सासरे, आणि हाताशी एक लहानग लेकरू,,, देव जेव्हा परिक्षा बघतो ना, अगदी पूर्णच बघतो, तरूण स्रि, तिही या भूकेलेल्यांच्या भोवर्यात एकटी पडलेली, ईतक्या कमि वयात ती विद्धवा झाली होती, पण स्वाभीमानी, आणि स्वकष्टाने जगण्याची लेकराला शिकवून मोठ करण्याची जिद्द धरून ति ऊभी राहिली, शेतात मोलमजुरी करत होती, दिवस जात होते, आणि वासनेने व्याकूळलेले, तिच्या शरिराचे लचके घ्यायला आतूरलेले होते, एकटी स्रि, त्यात घरचि सर्व जबाबदारी, लोक फायदा घ्यायला तर टपलेलेच, नको नको ते टोमने एकावे लागायचे, कोण काय बोलेल नेम नाही, कधी तरि कानावर शब्द पडायचे, काय शेतात काम करते एकदा येवून जा,,,, तूला काही कामाची गरज नाही, ,, तळाची आग मस्तकात जात पण ति एक हतबल झालेली स्रि काहीच करू शकत नव्हति, असेच लाजिरवाणे दिवस ती जगत होती, त्यात भरीत भर एक दिवस हार्ट अटैक ने सासरे हि गेले,,,,!

त्या पाठोपाठ त्यांच्या अचानक जान्याने सासूला मोठा धक्का बसला, त्या हि paralyzed होऊन अंथूरनाला खिळल्या,, आणि म्हणतात ना, दूखाच्या, आणि गरजेच्या वेळी कोणि कोणाच नसत,,,! आपले काय ,,?आणि परके काय,? मदतीच्या नावाने शरिराची मागणी करू लागले, एक निराधार स्रि म्हणून कोणी एक तर ऐन रात्री घरात शिरला, नशेत बूडून, पूरूषि ताकतीच वर्चस्व गाजवत तो तिच कोमल शरिर तुडवून गेला, विरोध करून थकलि, पण त्या भूकेल्याच्या आणि वासनाधीन झालेल्याच्या ताकतीपूढे तिचे काहिएक चाल्ले नाही, तिच्या शरिराचे लचके घेऊन, त्याची हवस मिटवून तो काही पैसे फेकून निघून गेला, आणि हा अता त्याचा नेहमीचाच क्रम झाला,,,,,!


निराधार म्हणून समाजात वावरायचे होते, नाविलाजे तिला हे दूख आणि त्या वासनाधीन चा तो गलिच्छ स्पर्श सहन करण्याखेरिज पर्याय नव्हता,,,, रोज रात्र तिला खायला ऊठायची, दारूच्या आणि वासनेच्या नशेने माखलेला तो, रोजच येवून तिच शरीर चाखून चूरगाळून जात, कधी ऊगाचच हक्क गाजवत मार हान ही करत,,, खूप दिवस तीने सहन केले, हळूहळू गावभर चर्चा पसरत चाल्ली, बाकीचे लोक ही तिला त्याच नजरेने पाहू लागले, कधी तरि कोणी टोमने देवून बोलू लागले, बायका हि हिनतेच्या नजरेने पाहत, कोणी काम द्यायला तयार नव्हते, तो एक नशेत धूत असलेला येवून ऊगाचच हक्काने लचके तोडून जात,हळूहळू तो तर लचके तोडतच पण सोबत्याला ही घेऊन येवू लागला, गावात चर्चेला ऊधान आल, कोणि तीला जवळ करेना, वासनेचे ऊपासक तेवढे आपल काम फत्ते होईपर्यंत तिच्याकडे जात,


हळूहळू तिला शेवटी निर्णय घ्यावा लागला, तिचा एकटेपणा आणि तिच सौंदर्य तिच्या जिवणाच शत्रू बनल, आणि परिणामी तिला एक वेश्या म्हणून समाजात नाव मिळाल,,,,, मित्रांनो काही एखादा शब्द फारच स्पष्ट आणि अशोभनीय बोल्लो असेल तर माफ करा, तशि चूक झालेली बिंधास्त कळवा,,, आणि एक कळकळीची विनंती आहे कि स्रि जिला भोगायच तिला जरूर भोगा, पण तिच्या मर्जीने भोगा,,शेवटि काम वासना हि सर्वांनाच आहे,ईश्वर निर्मित भावना आहे हि,पण त्या भावनेला मर्यादित ठेवायला शिकल पाहिजे,,,, कूणाचा आधार बनता आल तर नक्कीच बना, आणि नाही जमल तर कूणा निराधाराचा गैरफायदा तरी घेवू नका,,,,,!

शेवटी आयुष्य हे प्रत्येकाला एकदाच मिळत, आपल्या सुखासाठी दुसऱ्याचं सुख हिरावून त्यांना दुःखात लोटू नका, गरजेचे नाही कि तूम्ही मदत कराच, आलि करता तर नक्की करा, पण फायदा, वासना म्हणून नाही एक माणूस म्हणून, एक माणूसकीची जाणिव ठेवून करा,,, ,,,


Rate this content
Log in