पुस्तकात नसलेल्या पानाची......
पुस्तकात नसलेल्या पानाची......
आयुष्याच्या त्या अवघड, निसरड्या वळणावर तू येऊन गेलीस, थोडंसं अंतर का होईना सोबत केलीस, माझ्या जगण्याचाच भाग झालीस ती कायमचीच. मी नाहीच विसरू शकलो तुला. मनाच्या खोल कप्प्यात घर करून बसलीस तू .एवढं मात्र नक्की. हा शाप की वरदान माहित नाही. तुझ्या आठवणी छळतात नित्यनेमाने ...कधी कधी तर जीव नकोसा करून टाकतात.तुला विसरू म्हणावं तर तसही घडत नाही. पुन्हा पुन्हा आठवतेस मानगुटावर बसलेल्या भुतासारख .. व्यापून टाकलंय तू माझं समग्र जीवनच . तझी आठवण म्हणजे अवघड ठिकाणच दुखणं सांगताही येईना अन सहनही होईना. अव्यक्त , मनाच्या खोल कप्यात कायमच साठवून ठेवलेलं असतानादेखील चार चौघात कबूल न केलेलं प्रेम आहेस तू ... म्हणून तर आयुष्याचं पुस्तकात नसलेलं पान आहेस तू ... किती सोपं झालं असतं नाही .कौम्पप्यूटर सारखं मनाला फॉरमॅट मारता आलं असत तर?
घटित नकोशा असलेल्या घटना मिटवता आल्या असत्या मनाचा खोल कप्प्यातील आठवणी. अन पुन्हा नव्याने रिफ्रेश होता आलं असत आणि कामाला लागता आलं असत नव्या जोमानं, म
नानं ताजतवानं होऊन .पण अजून तरी ते शक्य नाही किंवा असा ब्रेन वाॉश कायदा संमत नाही . म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझी आठवण सोबतीला असणारच. कधी कधी ना खूप राग येतो तुझा. असं वाटत याचा तुला तडक जाब विचारावा, आणि नंतर माझ्या वेडेपणाचं मलाच हसू येत तू कुठं सांगितलंय माझी आठवण काढ म्हणून? तुझी आठवण केवळ भास म्हणू की अनिवार्य श्वास म्हणू?. तुझं प्रेम म्हणू की तुझा दुःसाहस म्हणू . हा शाप म्हणू की उ :शाप म्हणू . तुझी आठवण म्हणजे असून अडचण नसून खोळंबा. तू सदैव मला सावलीसारखी सोबत करते. अनिवार्य छळते, कधी वाकोल्या दाखवून खिजवावं तस पुन्हा नाहीशी होतेस. कधी तरी स्वप्नात येऊन जातेस. जगण्याचाच भाग होते. असून नसते, नसून असते रोमा - रोमात , -ह्दयाच्या खोल कप्यात . माझ्या प्रत्येक श्वासात जीवनाचा अर्ध्यवायू होऊन. तर कधी नसानसात भिनतेस रक्तवाहिन्या होऊन ...आयुष्यात नसलीस तरी असतेस सदैव सोबत पण पुस्तकात नसलेल्या पानासारखी...आठवणीतली