पुनर्विवाह
पुनर्विवाह
सत्तरी पार केलेल्या कामिनीबाई जून्या विचारसरणीच्या होत्या.
परंतु विजयच्या अपघाती निधनाने जेव्हा नातसुनेला वैधव्य आले तेव्हा त्यांनीच पुढाकार घेऊन तिचा पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला. चकित झालेले सर्वांचे चेहरे पाहून त्या एवढेच म्हणाल्या,"तिचं पुढील आयुष्य सुकर होईल."
