पर्यावरण विषयी इतर काही
पर्यावरण विषयी इतर काही
दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.
पर्यावरण (Environment) हा शब्द मूळ फ्रेंच शब्द Environ या शब्दापासून तयार झाला आहे. Environ म्हणजे Surrounding or encircle. सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय.सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील आघाताचे परिणाम शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे औद्योगिक क्रांतीच्या फळांबरोबर त्याचे दूरगामी गंभीर परिणाम मानवाला भेडसावू लागले. म्हणून इ. स. १९६० मध्ये पर्यावरणशास्त्र किंवा पर्यावरण विज्ञान हे विषय अभ्यासासाठी स्वतंत्रपणे लागू करण्यात आले.मानव हा पर्यावरणाचाच एक कुशाग्र घटक आहे. मात्र पर्यावरणाच्या प्रत्येक घटकात मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. म्हणून पर्यावरणीय आपत्तीचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन व त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण बनले आहेपण ,कुठेतरी मानवाला ह्या सगळ्याचा विसर पडत चालला असल्यामुळे झाडांची संख्या इमारती उभ्या करण्याच्या नादात फार प्रमाणात कमी करून टाकली आहे.
सगळीकडे सिमेटच कॉक्रीट झाल्यामुळे आपल्याला कुठे निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायला मिळतच नाही.पण ही झाडच राहिली नाही तर आपल्याला शुध्द हवा श्वासाकरता मिळणार नाही. त्याचप्रमाणे पुरेश्या प्रमाणात पाऊस पडला नाही तर पिण्यास पाणी, खाण्यास अन्नधान्य मिळणार नाही. आणि ह्या दोन्ही गोष्टीमुळे आपण जगूच शकणार नाही. हे बहुतेक मानव कुठेतरी विसरत चालला आहे. ह्या असलेल्या नैसर्गिक गोष्टी अजून तरी मानवाला तयार करता आलेल्या नसल्यामुळे आपण प्रकृतीवर अवलंबून आहोत याचं भान ठेवायला हवं. कारण,यंदाची भीषण परिस्थिती बघता आपण सगळ्यांनी किमान एक तरी झाड लावलंच पाहिजे. कारण, जेव्हा आपण त्याना जागवू तेव्हांच आपण जगू हे ध्यानांत घेतलंच पाहिजे. आणि अस मग प्रत्येक एक कुटुंब म्हणून एक झाडं जेव्हा आपण लावत जावू तेव्हा आपली सृष्टी पुन्हा टवटवीत झाल्याने तो निसर्गदेखील मग आपल्याला हव्या असणा-या गोष्टी भरभरून देण्यास मागे पुढे कचरणार नाही. चला मग आजच्या पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आपण खूप प्रमाणात झाड संकल्प करून एक तरी झाड लावून त्यांची सुरुवात करू या!
