Shobha Wagle

Inspirational

3  

Shobha Wagle

Inspirational

प्रवासात भेटलेली माणसे

प्रवासात भेटलेली माणसे

4 mins
267


आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपल्याला अनेक माणसें भेटतात. त्यांतल्या काहीना आपण थोड्या दिवसात विसरून ही जातो तर, काही माणसें आपल्या मनात घर करून राहतात. अशा भेटलेल्या माणसांच्या बऱ्याच आठवणी माझ्यााकडे आहेत. काही गोड तर काही कडू पण, गोड आठवणींचा साठा जास्त आहे.

गेल्या २०१७ जानेवारीतली घटना. फलश्रुतीचे लेक्चर संपवून मी गोरेगांव पाटकर कॉलेजहून विरारच्या गाडीत माझ्या मैत्रिणी सोबत अपंगाच्या डब्यात घुसले. रविवारचा दिवस त्यात मेगा ब्लाँक मग गर्दी काही विचारायलाच नको! पण अपंगाच्या डब्यात आल्याने आम्हाला बसायला आरामशीर जागा मिळाली.(अफाट गर्दी बघूनच आम्ही ह्या डब्यात शिरलो होतो. वेळेत पोचायचे होते नाईलाज होता म्हणून, नाहीतर शिस्त भंग करणारे आम्ही नव्हतो.)

हळुहुळु एक एक स्टेशन येवू लागलं तशी गाडीत गर्दी ही वाढू लागली. माझी मैत्रीण माझ्याशी गप्पा मारत होती पण माझं तिच्याकडे लक्ष नव्हते. मला थोडे बैचन वाटायला लागले. अगांला दरदरून घाम फुटला. मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण, माझ्या तोंडातून शब्द फुटेना. समोरची माणसे फिरत असल्या सारखे वाटले व माझ्या डोळ्यां समोर अंधारी आली. समोर उभी असलेली माणसें ओरडली "अहो बाईना चक्कर आली."एवढ्या गर्दीत सुध्दा लोकांनी आपली सीटस खाली करून मला झोपवले. डोळ्यांवर पाण्याचा शिडकाव केला. प्यायला पाणी दिले. मला लगेच बरं वाटलं मी उठायचा प्रयत्न केला पण सर्वांनी झोपूनच राहायला सागितले. माझी आस्थेने चौकशी केली. मला माझ्या घरी सुखरूप पोचवण्याची जबाबदारी ही एका दोघांनी दाखवली. त्या डब्यात 202 बस चा कंडक्टर होता,"मेडम मी बस काढतो बोरीवलीहून व तुम्हाला घरी पोचवतो."तर दुसरा एक जण बोलला "बोरीवली ला ऊतरू फळांचा रस प्या बरं वाटेल मग घरी सोडतो".

मुबंई महानगरात अशी माणसें आपला वेळ परक्या करता देऊ शकतात ?

मी एकून होते,मुंबईकर खूप घाई -गर्दीत असतात. त्यांना दुसऱ्यांची पर्वा नसते,ते आप- आपलेच बघतात! पण माझं भाकित चुकले. हे सगळेच खूप प्रेमळ माणसे मला प्रवासात भेटली.

   गाडी विरार पर्यन्त पोचली. आम्ही उतरलो. एका लहान मुलीला पकडावे तश्या प्रकारे माझ्या मैत्रिणीने मला स्टेशन बाहेर आणले. एका मिनिटाच्या अतंरावर शाळा होती. ती रिक्षाने जाऊ म्हणत होती. मीच नको म्हणाले. माझी पर्स वगैरे तिनेच घेतली होती.

   आम्ही शाळेत पोचलो. वर्ग तिसऱ्या माळ्यावर होता. आमचे वरिष्ठ वर्गात बसून मुलांना मार्गदर्शन करत होते. आम्हाला खूपच उशीर झाला होता. आम्ही जाऊन आमच्या जागेवर बसलो. मला खूप थकायला झाले होते. पाण्याची बाटली काढून मी घटा घटा पाणी पिऊन घेतले. मला बघतांच विद्यार्थांनी माझ्या भोवती घोळका केला. प्रत्येकाला आप आपल्या पेपरांतल्या शंका माझ्याकडून समजाऊन घ्यायच्या होत्या. मी ही तत्पर झाले. पण मला तोंड उघडूुन बोलताच येईना. ओठ चिकटल्या सारखे झाले होते. मी परत पाणी प्यायले. डोके भयंकर ठणकायला लागले होते. मुले तात्कळत उभी राहिली होती.

      नेहमी मी ट्रेन मधून उतरल्यावर हाँटेल मधून चहा घेऊनच वर्गात बसत असे. मला चहाची तल्लफ आली. माझा चेहराही फिका पडला होता. मला बऱ्याच पालकांनी सांगितले . मेडम तूम्हाला बरं वाटत नाही ना तुम्ही बोलू नका आराम करा आम्ही दुसऱ्या टिचर कडे जातो. दहावीच्या मुलांबरोबर त्यांचे पालक ही येत असे वर्गात . मी माझ्या मैत्रिणीला म्हटले ,'मला चहा हवा होता गं." तेथे बरेच पालक होते त्यांनी ऐकले. त्यातल्या एक म्हणजे, "सविता देशमूख" "मी आणते हं' चहा तूमच्या करतां ". असे म्हणून तिने आपल्या मिस्टरनां खाली पाठवून चहा मागवला. तीन माळे उतरून ते गेले व पटकन माझ्या करता चहा आणला. मी ही लगेच तो पिऊन टाकला व जादूची काडी फिरवावी तशी माझी स्थिती झाली. मला स्पष्ट बोलता येऊ लागले व नंतर मी मुलांना विषयाचे मार्गदर्शन करू लागले.

    थोड्या वेळाने आम्हाला चहापाणी करता पहिल्या माळ्यावर बोलावा आला. मी माझ्या मैत्रिणीनां सांगितले मला नको. तुम्ही घेऊन या. त्या गेल्या व थोड्या वेळाने "मनीषा "आमची विरारची क्लार्क माझ्या करता चहा नाश्ता घेवून आली व मी कितीही नाही म्हटले तरी, जबरदस्तीने तिने मला थोडे खायला भाग पाडले. आई किंवा मोठ्या बहिणीने आग्रह करावा तसा तिने केला व मला खायला लावले. तिने दाखवलेली ती माया मी जन्मात विसरणे शक्य नाही.

  खाली सगळयां स्टाफला मला बरं वाटत नाही हे कळले होते. माझे सहकारी व सगळे वरिष्ट सरांनी वरती येऊन माझी आस्तेने विचारपूस केली.व घरी परत जाताना त्याच्या टँक्सिनेच यायला सांगितले.

    थोड्या वेळाने सविता आपला मुलाला  घेवून माझ्याकडे आल्या."कस वाटतंय मेडम,बरं वाटत ना?" हो आता बरं आहे. व मी तिच्या मुलाला बोलावले तर तो म्हणाला,"मेडम आज असू द्या. मी पुढच्या वेळेला शंका विचारीन तुम्हाला. तुम्ही काळजी घ्या स्वतःची" अरे ! एवढसं हे मूल,मोठ्या माणसा सारखा मला सल्ला देतं!

‌ नंतर त्याची आई , बोलली "मेडम,

‌ तूम्ही माझं एकतां,आज तूम्ही आमच्या कडे रहा. एवढ्य लांब जोगेश्वरीला जाऊ नका. उद्या सकाळी आम्ही तूम्हाला आमच्या गाडीने पोचवतो." मी सांगितले तिला, आमचे सर मला घरी पोचवणार. तरी ती व तिचा मूलगा मला आग्रह करत होते.मला त्यानां नाही म्हणायला खूपच जड गेले.

‌नंतर सगळी मुले येऊन गेल्यावर सरानी गाडीने मला घरी पोचवले.

‌     रात्री घरी सगळे आटपून मी गादीवर पडले,तेव्हा सहज मनात विचार आला. "बापरे आज मला काही झालं असतं तर?" व त्या मूलांची आई मला घरी बोलवत होती! मी वयस्कर बाई ,चक्कर आल्या सारख झालं होतं. हिला काय दुखण असेल ? रात्री हिला काही कमी जास्त झालं तर? आपली शिक्षक व विद्यार्थी एवढी जुजबी ओळख व एवढ्यावर ही बाई मला तिच्या घरी न्यायला तयार!!! मी स्वतः सुध्दा कुणाला माझ्या घरी आणायला तयार झाले नसते. खरंच धन्य गं बाई सविता, तूझ्यासारखी दुसऱ्यांवर माया ,प्रेम ,वात्सल्य ,ममता करणारी देवरूपी माणसं आहेत म्हणून हे जग चाललंय.

‌तूझ्याा सारख्या विचार करणाऱ्या माणसांना देव सदैव आनंदात व सूखात ठेवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना. असे देवाला हात जोडून प्रार्थना केली व झोपेच्या स्वाधीन झाले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational