प्रेम
प्रेम
अभिजीत आणि देव दोघेही मित्र पण सख्ख्याभावांसारखेच राहत अगदी एका विचाराने चालणारेम्हटल तरी हरकत नाही... एकाच काॅलेजमध्ये आणि एकाच क्लासमध्ये शिकत होते. त्यांची ही दोस्ती...काॅलेजमध्ये फेमस होती. त्यांच्या सोसायटीत तरत्यांना सगळे करण - अर्जुनच म्हणत ! कुठलीही वस्तु, शुज , बॅग, वाॅच, बर्याचश्या गोष्टी सारख्याचखरेदी करत. दोघांची इतकी मैत्री होती की एकमेकांशिवाय ते राहूच शकत नव्हते. अभिजीतची आईलता आणि देवची आईही सरीता दोघीही चांगल्यामैत्रीणी होत्या. अभीची आई आणि वडील प्रकाश देवलाही आपल्या अभिप्रमाणे जीव लावत, कारणत्याला वडील नव्हते. तो आईसोबत राहत असे.त्याची आई शिक्षिका होती. सरीतासाठी ही अभि आणि देव सारखेच लाडके होते. या दोघांना खुप सारे फ्रेंड्स काॅलेजमध्ये मिळाले होते. त्यांचा एकग्रुपच तयार झाला होता. त्यांची बसण्याची एक जागा काॅलेज कट्टा ठरलेली होती. तिथेच सर्वजण जमत आणि गप्पा मारत. ते दोघे मित्र काॅलेजचेदिवस मस्त enjoy करत होते.
एक दिवस सगळेमित्र गप्पा मारत बसले होते. अभिही त्यांत सामील होता. अचानक त्याची नजर एका मुलीकडे गेली...रंग गोरापान, मोठे केस, स्काय ब्ल्यु रंगाचा पंजाबीड्रेस आणि चेहर्यावर गोड स्माईल आणि हातातब्रेसलेट हा तिला बघतच राहीला.... ती निघून गेली. पण अभि मात्र ती जाईपर्यंत तिच्यातच हरवला होता... आजपर्यंत एवढ्या मुली बघितल्या पणअस कधीच झाल नाही... त्या दिवशी पासुन अभि नकळत तिच्या प्रेमात पडला होता... Love at first site वाल्या प्रेमात.... त्याच्यात बदल झालाहोता. स्वतःकडे जास्त लक्ष देऊ लागला. अगदीअभिची लहान बहीण मिराही त्याला चिडवायची." दादा , तु नक्की काॅलेजला जातोस की फिरायला...ये तुला काय करायच ग... मिरा तुझा दहावीचाअभ्यास कर ना ! दोघांमध्ये रोज भांडण व्हायची.तुझ - माझ जमेना तुझ्यावाचुन करमेना अशी गतहोती... दोघा बहीण भावाची ! अभिजीत आणि देव काॅलेजला एकाच बाईकवरजायचे. अभिजीत रस्त्याने तर ती दिसते की नाहीम्हणून इकडे तिकडे बघत राहायचा. ती दिसलीअभिच्या चेहर्यावर एक वेगळच तेच असायच ....नाही दिसली की नाराज व्हायचा. अभिच हे बदललेल वागण देवच्या लक्ष्यात आल होत. प्रत्येकगोष्ट ते एकमेकांना शेअर करत. ती जात असतानाअभिने देवला दाखवल.... अभि, तु तर छुपा रूस्तमनिघाला... आज सांगतोस मला ...अभिजीत - नाही रे मित्रा आधी तर तुलाच सांगितल.चल... चल .... तुला मनापासुन आवडते ना तीमग अभि तु तिला लवकरात लवकर सांग. ओके.देवला त्यादिवशी खुप आनंद झाला. त्याने सर्वफ्रेंड्सला पार्टी दिली. अभिच त्याच्या मनातीलप्रेम अजुन तिच्याजवळ व्यक्त केल नव्हत पणमनापासून तिच्यासाठी रोज प्रार्थना करायचा.हीच्या चेहर्यावरची ही स्माईल 😊 अशीच राहो...अस देवाला म्हणायचा.
त्याला कित्येक दिवसांनीतीच नाव माहीत झाल... ऋतुजा किती छान नावआहे. ती फर्स्ट इयरला शिकते हे ही समजल. हारोज तिला बघत असायचा... हे तिच्या मैत्रीणीच्यामनिषाच्या लक्षात आल होत. तस तिने ऋतुजालासांगितल होत. मग एक दिवस पार्कींगमध्ये बाईकचस्टार्ट होत नव्हती... ऋतुजा आणि मनिषा दोघीहीप्रयत्न करत होत्या... हे अभि आणि देवच्या लक्ष्यातआल. अभिजीत स्वतःहुन ऋतुजाला म्हणाला...एक मिनीट काय झालय, मी बघतो... त्याने थोडाप्रयत्न केला आणि बाईक चालू झाली तेव्हा मनिषाआणि ऋतुजाने त्याला thank you म्हटल ....तो निघून गेला. त्या दिवसानंतर त्यांची ओळख झाली, त्यांच्यात रोज थोड थोड बोलण्यामुळेमैत्री झाली. अभिची गाडी पुढे जातेय हे पाहून देवखुश होता. अभिने ऋतुजा ला देव आणि इतरग्रुपमधल्या सर्वांची ओळख करून दिली. ऋतुजाहीहळूहळू अभिच्या ग्रुपमध्ये मिसळू लागली. सगळेतिला ओळखायला लागले अभिची मैत्रीण म्हणुनतिलाही अभिजीतचा स्वभाव कळला होता. ती त्यालाप्रेमाने अभि च म्हणत. तो इतर मुलांपेक्षा खुप वेगळा आहे याची जाणीव तिला झाली होती. हळूहळू दोघांना एकमेकांची सोबत आवडू लागलीहोती. दोघेही मोबाईलवर काॅल, मेसेजवर बोलूलागले होते. ते कधीकधी ग्रुपपासुन दुर जाऊनदोघेच गप्पा मारत असत. ते एकमेकांना ओळखुलागले होते.
देवने आणि मित्रांनी सांगितल्यामुळे अभिनेऋतुजाला प्रपोझ केल... तिनेही त्याला होकारदिला. त्या दिवशी त्याला खुप आनंद झाला...त्याला फक्त ती हवी होती... आणि तिच्यासाठी तोकाहीही करायला तयार असायचा. तिचे सगळे हट्टपुरवायचा... खुप लाड करायचा. ती रागवली तरकधी जोपर्यंत तिच्या चेहर्यावर स्माईल येत नाहीतोपर्यंत मनवत राहायचा... ऋतुजाही त्याला लगेचस्मितहास्य देऊन माफ करायची. तो तर कधी तिच्यावर रागवत नसायचा... समजुन घ्यायचा.देवही त्या दोघांचा बेस्ट फ्रेंड होता नेहमी त्या दोघांनासपोर्ट करायचा. अभि आणि देवच काॅलेजचे वर्षसंपत आले तेव्हा ऋतुजा शेवटच्या वर्षाच शिक्षणघेत होती. त्यांच भेटण - बोलण सूरूच होत. कधीसुट्टी असेल तेव्हा ऋतुजा आणि अभिजीत फिरायलाजायचे. देवला आणि अभिजीतला जाॅब लागला.दोघांच्या घरी खुप आनंद झाला. अभिजीत आताजबाबदारीने वागायला शिकला होता. देवला दुसर्याशहरात चांगला जाॅब लागल्यामुळे त्याला दुसर्या शहरात जाव लागल. याच दोघांनाही थोड वाईटवाटल पण त्यांच फोनवर बोलण व्हायच. अभिलाआईने लग्नाच विचारल तेव्हा त्याने ऋतुजाविषयीआईला सांगितल. त्याने थोडा वेळ हवा अस घरीसांगितल. आईला तर खुप आनंद झाला त्या थोडथांबायला तयार झाल्या. अभिजीत परीस्थीतीनेमध्यमवर्गीय होता. त्याच छोट आणि सुखी कुटुंबहोत. अभिजीतला नोकरी करत असल्यामुळे जराकमी वेळ मिळायचा. पण वेळ भेटेल तेव्हा तो तिलाकाॅल, मेसेज करायचा. पण ऋतुजाच अचानक वागणच बदलु लागल होत. ती अभिला समजुनघेत नव्हती. छोट्या छोट्या गोष्टींवरून रागवायची,भांडायची तरीही अभिजीत तिला समजुन घ्यायचा. ती पहील्यासारख अभिला बोलत नव्हती. रीप्लायवेळेवर देत नव्हती. कधी कधी तर काॅल केले तरीघेत नसत आणि काॅलबॅकही करत नसे. अभिला काही कळत नव्हत ऋतुजा अस का वागते. तीभेटायलाही टाळाटाळ करायची. त्यांच नातं पहील्यासारख राहील नव्हत.
अभिजीत कामात खुप बिझी झाला. तरीही तो वेळ काढायचा पण ऋतुजा त्यालाइग्नोर करू लागली. अभिला नेमक काय झालयहेच कळत नव्हत, ऋतुला विचारल तर ती पणनीट बोलत नव्हती. तो एकटा पडला होता. पण त्याचा ऋतुवर खुप विश्वास होता. इकडे देव मात्रअभिला न चुकता काॅल करायचा. देवलाही आतामैत्रीण मिळाली होती. तो अभिला सगळ त्यांच्याबद्दल विचारायचा. अभि सगळ छान चाललय आणिठीक चाललय असच सांगायचा. एककीडे ऋतुजाचवागण बदलल होत आणि अभि मात्र ऋतुच्याप्रेमात वेडा झाला होता. तिच्याशी लग्न करूनआयुष्यभर साथ द्यायची हे स्वप्न तो बघत होता.ऋतुजाला मात्र आपल्यावर जिवापाड आणि खरप्रेम करणार्या मुलाची आता पर्वाच नव्हती. अभिजीत जाॅब करायचा. पण तो ऋतुजाच्यावागण्यामुळे खुप दुखावला होता. पण तिच्यावरमनापासुन त्याच प्रेम होत. त्याला काॅलेजचे दिवसआठवले तेव्हा किती छान होत. ऋतुजा मलाएक दिवस बोलल्याशिवाय राहत नव्हती... आणितीच ऋतु आता अस का करते हेच त्याला कळतनव्हते. ती काॅलेजमध्ये अभिजीत होता तेव्हाखुप छान राहीली. ऋतुजा ला एकदा त्यांच्या फॅमिली पार्टीमध्ये अजय भेटला. तिच्या बाबांच्यामित्राचा मुलगा. तो वडीलांचा बिझनेस सांभाळतहोता. पण त्यादिवशी पासून ऋतुजा आणि अजय नेहमी भेटायचे. त्यांच एकमेकांच्याघरी येण जाण असायच. ऋतुजाच्या बाबांनाही अजय आवडत होता. त्यांच्यात छान मैत्री झालेलीपाहून पुढे त्यांच लग्न करण्याच ठरल. ऋतुजानेही होकार दिला. त्यामुळे अजय आणि ऋतुजा यांचभेटण - बोलण सूरू झाल.
अभिजीतच्या मित्रांनी एकदा ऋतुजाला एका मुलाच्या गाडीवर बघितल्याच सांगितल , पण अभिजीत तसा मुलगा नव्हता...जो कुणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवेल. त्याचा ऋतुवर खुप विश्वास होता. तो असा विचारही करू शकत नव्हता. अभिजीतने सगळ विसरून ऋतुला भेटायच ठरवल. तिलाही अभिला एकदा आणि शेवटच भेटायच ठरवल होत. तिला आता अजय आवडू लागला होता. इकडे अभि तिला बोलायचा प्रयत्न करायचा. पण ती बोलण्याच टाळू लागली.अभिला ऋतुच्या अश्या वागण्याचा खुप त्रास व्हायचा.... पण त्याच मनापासुन प्रेम असल्यामुळे तो तिला दुखावू शकत नव्हता. ते दोघे पहीले नेहमी भांडायचे पण भांडण लगेच मिटायच. अभि तिला मनवायचा ऋतुही लगेच त्याला लगेचमाफ करून टाकायची. हे सगळ त्याला आठवतहोत. त्यांच प्रेमाच नात खुप घट्ट झाल आहे जे कधीही तुटू शकत नाही अस अभिजीतला वाटायच. अभिजीतला ऋतुजाला भेटायच होत त्यासाठी तिला आज काॅल करणार तेवढ्यात तिचाच काॅलआला.... " अभि , मला तुला आज संध्याकाळीभेटायच आहे. त्याला खुप आनंद झाला कायबोलाव तेच क्षणभर कळेना.... ऋतुजाने तिकडून अभि.... काय रे भेटायला वेळआहे ना आज.... अभिजीत - ऋतु हो हो आहे वेळ मला पण भेटायचआहे.... ऋतुजा - ओके address मेसेजवर पाठवते... byअभिला खुप आनंद झाला. तिच्या तोंडातुन आज त्याच नाव ऐकून खुप छान वाटल त्याला आणित्याची ऋतुजा त्याला परत भेटली अस वाटल.
अभिजीत ऋतुजाला भेटण्यासाठी खुप excitedहोता. तो दिवस त्याला खुप छान वाटत होत... तोसारख घड्याळ बघत होता.... कधी एकदाचे सहावाजतात, अस त्याला झाल होत. तो आज लवकरनिघाला. त्याने तिच्यासाठी एक गिफ्ट आणि बुकेघेतला. अभि खुप आनंदात होता पण त्याचा आनंदफार काळ टिकू शकला नाही. तो त्या ठिकाणीपोहचला. खुप छान बाग होती. त्याने आपल्यानेहमीच्या स्टाईलने ते गिफ्ट आणि बुके तिलादेऊ केला... पण तिने थांब म्हटल्यावर अभि जागीच थांबला. तो काही बोलायच्या आत तिनेसांगितले की ही आपली शेवटची भेट आहे. अभिजीत - ऋतु अग काहीतरीच काय बोलते.काय झालय तुला ? तुला माझा राग आलाय का ?माझ काही चुकतय का सांग ? आपण यावर बोलूनसगळ पहिल्यासारख करूया ना ! प्लीज , मलाखरच एकदा माफ कर.... तिने त्याचा हात झटकलारागाने, आणि सांगितले की मी तुला नाही भेटुशकत कारण आता माझ लग्न ठरलय, अजयशी.हे ऐकल्यावर अभिला डोक्यात मुंग्या आल्यासारखचझाल. त्याच हृदय काचेप्रमाणे तुटल होत.अभि - ( डोळ्यातील अश्रु लपवत ) ऋतु हे कधीआणि केव्हा झाल आणि तु मला आज सांगतेसआणि माझ्या प्रेमाच काय ?ऋतुजा - अभि हे सगळ अचानक आता आठदिवसांतच ठरल. अजय माझ्या घरच्यांनाहीआवडतो आणि मलाही आवडतो. थोड्याच दिवसांतआम्ही लग्न करणार आहोत. ती एका क्षणात बोलून मोकळी झाली पण अभिला हे सगळ ऐकूनखुप मोठा धक्का बसला. त्याच हृदय तुटल होत.ऋतुजाने माझ तुझ्यावर काॅलेजमध्ये प्रेम होतआणि आता लग्न पण तुझ्यासोबत केल पाहीजेअस नाही ना ! तु मला यापुढे कधीच भेटु नकोआणि विसरून जा.... ही आपली शेवटची भेट.अभिजीत - हो ऋतु मी नाही तुला त्रास देणारकधीच.... पण मी काॅलेजमध्ये असल्यापासुन तुझ्यावरप्रेम करतो आणि तुझही प्रेम होत ना ! ऋतुजा - तेव्हा माझ प्रेम होत पण मी आता अजयसोबत लग्न करणार आहे.
त्याने ऋतुजाला खुपसमजावल. विनवण्या केल्या, काॅलेजमधील त्यादिवसांची आठवण करून दिली. पण तिने नाहीऐकल. तिचा निर्णय झाला होता. तिने अभिच्याप्रेमाला नाकारल होत. कदाचित तिला खर्या प्रेमाचा अर्थच समजला नसावा. ती हे सगळबोलून निघून गेली. अभि मात्र तिच्याकडेच बघतराहीला.... पण तिने एकदाही मागे वळून बघितल नाही. अभिला खुप वाईट वाटल होत. पण काय करणारतिच आता त्याच्यावर प्रेमच राहील नव्हतं तो एकटाच खुप रडत होता. जिच्यासाठी इतके दिवस तो थांबला होता, जिच्यासोबत आयुष्य घालवायच, आयुष्यभर तिच्यावर प्रेम करायच आणितिच्या कायम सोबत राहायच.... अस त्याच स्वप्नांचाचुराडा करून ती निघून गेली होती. अभिला खुपवाईट वाटल. तो आतुन पूर्ण तुटला होता. त्याचामित्र देव आणि घरच्यांनी त्याला सावरल, धीर दिला.पण त्याला प्रेमात कुणी असाही टाइमपास करतआणि आपण त्याला खर प्रेम समजतो हा धडामिळाला.कथा काल्पनिक आहे. आपण सगळेच म्हणतोप्रेम हे गरीब - श्रीमंत, उच्च - नीच, रंग, रूप हे भेदप्रेमात नसतात.... मित्रांनो प्रेम ही समजली तरखुप सुंदर भावना आहे. खर्या प्रेमाचा आदरकेला गेला पाहीजे. पैशाला प्रेमापेक्षा जास्त कींमतआहे का ? हा प्रश्न पडतो. आपण कुणावरही प्रेमकरा ..... पण मनापासून करा... प्रेम हे टाइमपासम्हणुन कधीच करू नका... कारण खर प्रेमकरणार्याला याची फार मोठी किंमत चुकवावी लागते. आयुष्यात प्रेम करा पण कुणाच्या भावनांसोबत खेळू नका. उगाच प्रेमात टाइमपास करूनकोणाच आयुष्य बरबाद नाही करायच. प्रेमातआपल्या आवडत्या व्यक्तीसाठी त्याग करणे, तीआनंदात राहावी त्यासाठी प्रार्थना करणे हे खरप्रेम होय.

