स्वादआस्वाद komal's kitchen's

Inspirational Others

4.0  

स्वादआस्वाद komal's kitchen's

Inspirational Others

प्रेम जेव्हा अयशस्वी होते.

प्रेम जेव्हा अयशस्वी होते.

3 mins
252


राजीव आणि सुनंदा एकाच कॉलेज मधले लव्हबर्ड. सुनंदा खूप हुशार सेन्सिटिव्ह. ती राजीव वर जीवापाड प्रेम करत होती. सुनंदा राजीवला जे आवडेल ते त्याच्यासाठी करायची. दोघेही घरच्यांचा विरोधात लग्न करतात. संसार खूप छान फुलतो. अगदी राजा राणीचा दृष्ट लागण्यासारखं संसार होतो . सुरुवातीचे दिवस खूप छान अगदी सुनंदा ने स्वप्नात पाहिल्यासारखं राजीव राजकुमारासारखा वाटतो.


राजीव जे सांगेल, तशी सुनंदा वागत असते. त्याला साडी आवडते म्हणून साडी, टिकली आवडते म्हणून टिकली ,त्याच्या आनंदासाठी सर्व करत. यात स्वतःला मात्र विसरत चालली होती.तिने ड्रेस घालण्याचं त्याच्यासाठी बंद केलेलं होतं. ती रोज साडी घालत होती . तिला आवडणारी जीन्स ही तिने घालणे बंद केलेली होती . तिच्या सर्व मनाविरुद्ध ती राजीवसाठी करत होती.


पण या सर्व गोष्टी चा तिला खूप त्रास होत होता . पण ती कधी एका शब्दाने त्याला काही बोलत नसते. तिने बाहेर जाऊन जॉब केलेला ही त्याला आवडत नसतो. त्याच्यासाठी ती घरी बसते. पुढे काही वर्षांनी तिला दोन मुलं होतात. त्यांच्या संगोपनात ती तिचा वेळ घालवत असते. काही दिवसात राजीव मध्ये खूप बदल झालेला असतो. रात्री उशिरा येणे. तासभर फोनवर बोलत राहणे. कधी कधी घरीच येत नसतो. त्याचं जराही सुनंदा कडे लक्ष नसते.


एक दिवस सुनंदा उशिरा येणाचा जाब विचारते..? तर तिला उडवाउडवीची उत्तरे देतो. राजीव सकाळी अंघोळीला गेला असता, त्याचा फोन टेबलवर राहतो. सुनंदा चहा घेऊन आली असते आणि फोन वाजतो. फोन वर नंबर दिसतो ती उचलते, "आवाज एका मुलीचा येतो.. हाय डिअर कॉल नाही केलास. सुनंदा फोन ठेऊन देते. राजीव आल्यावर त्याला जाब विचारते, तर तिला स्पष्ट सांगतो, ऑफिसमधील प्रिया आणि आम्ही दोघे लग्न करणार आहोत. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. मी तुझ्याबरोबर नाही राहू शकत....!


सुनंदाच्या पायाखालची जमीनच सरकते, आणि ती खाली बसते ऐकून...! "तुम्ही हे काय बोलताय... माझ्याकडून काही चुकला का...? असं नका बोलू. खोटं आहे हे सांगा मला... ! राजीव निघून जातो, " तिच्या डोळ्यातील पाण्याने त्याला काही फरक पडत नाही. सुनंदा रात्रभर रडते. राजीव घरीही येत नाही. या अशा माणसावर प्रेम केले याचा तिला खूप पच्छाताप झालेला असतो.


चार दिवस होतात, तरीही राजीव घरी आलेला नसतो. तिच्या घर नावावर असते पण त्याचे हफ्ते राहिलेले असतात . दोन मुलांना कसं एकटीने सांभाळायचं. सुनंदाला खूप भीती वाटत असते. प्रेम विवाह असल्यामुळे घरच्याकडूनही काही मदत मिळणे शक्य नसते.


       ती घरी बसून क्लास घेण्याचे ठरवते . दोन्ही मुलांकडे लक्ष ही राहत असतं. मुले मोठी झाली कि, " शाळेत शिक्षिका म्हणून रुजू होते. दोन्ही मुलांचं आईवर खूप प्रेम असतं. तिची परिस्थिती सुधारलेली असते. तीने ज्या गोष्टींचा लग्नानंतर राजीवमुळे त्याग केलेला असतो . त्या सर्व ती तिच्या मनासारखी करत असते. साधी राहणारी सुनंदा खूप फॅशिवनेबल झालेली असते. मुलांना आईचा खूप अभिमान वाटत असतो. आईला नेहमी प्रोत्साहित करत असतात. आईच्या परिस्थितीची मुलांना जाणीव असते.


सुनंदा शाळेत चालली असताना तिला त्यावेळेस राजीव दिसतो. सुनंदाला तो बघतच राहतो. ती खूपच छान दिसत असते. त्याची अवस्था मात्र खूप बेकार झालेली असते. सुनंदा मुद्दाम त्याला दुर्लक्षित करते. त्यानंतर तिला राजीव चे खूप कॉल येतात, पण ती घेत नाही. एक दिवस तो तिला भेटतो, "तिची माफी मागतो....! मला माफ कर. प्रियामुळे मी खूप फसलो. मला खूप तिने लुबाडले. मला सोडून गेली ती... तुझ्याशी जसं वागलो, "तसंच माझ्या आयुष्यात घडलं...! फक्त एक चान्स मला दे....!"माझ्याकडून खूप मोठी चूक झाली...!


सुनंदा, "जेव्हा मला गरज होती, तेव्हा मला तू सोडून गेलास, आणि मला आता तुझी गरज नाही....! मला असंच स्वतंत्र आयुष्य जगायचं आहे. पुन्हा मागचे दिवस पुढे नको. तुला खूप उशीर झालाय. मी जेथे जशी आहे. तिथं खूप खुश आहे. मला कोणाचा आधार नको. यापुढे मला कधी कॉल मेसेज ही करू नकोस. तुझं तोंडही बघायची माझी इच्छा नाही...." त्याला बाय बोलते आणि निघून जाते.


आणि तिच्या स्वतंत्र वाटचालीची नव्याने सुरुवात करते...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational