Bharati Sawant

Tragedy Others

3.1  

Bharati Sawant

Tragedy Others

प्र प्रेरणेचा - गुणी मधू

प्र प्रेरणेचा - गुणी मधू

4 mins
568


आजही सावत्र आईने मधूला खूप मारले आणि गाई म्हशी घेऊन राहणार पिटाळले. मधूचे बाबा दूरच्या देशात कामानिमित्त राहत होते. मधू लहान असताना त्याची आई मरण पावली. मधूची देखभाल करायला त्याच्या वडिलांनी दुसरे लग्न केले नि मधूची सावत्र आई घरात प्रवेशली. सुरुवातीला तिने मधूला खूप छान सांभाळले परंतु तिला एक मुलगा झाला नि तिच्या स्वभावात बदल झाला. आता ती मधूचा द्वेष करू लागली. इतक्या दूरवरून दोन वर्षे भेटायला येऊ शकत नव्हते परंतु त्यांना खोटे सांगायची मधून सुखात आनंदात आहे असे सांगत असे बाबा त्याच्याशी बोलण्यासाठी आईला सांगत, "अगं, जरा मधूला फोन दे मला त्यांच्याशी बोलायचे आहे". तेव्हाही ती कांगावा करायची आणि म्हणायची, "मी मधुची सावत्र आई ना म्हणून तुमचा माझ्यावर विश्वास नाही. आत्ताच जेवण करून तो खेळायला गेला आहे". मधूचे बाबा शांत स्वभावाचे होते त्यांचा मग निरुपाय होत असे. दर वेळी असे वेगवेगळे कारण सांगून ती बाबांना बाहेर गेल्याचे सांगत असे. आता मधु आठ वर्षाचा झाला होता. त्याला आई शाळेलाही जाऊ देत नव्हती, परंतु मधूची शाळा शिकण्याची खूप इच्छा होती. त्यामुळे मधु गाई गुरे चरायला शाळेजवळ घेऊन जाई. गाईगुरे चरेपर्यंत शाळेच्या खिडकीतून तो गुरुजींचे सारे काही ऐके. घरी जाऊन तो त्या अभ्यासाचा, गणिताचा कोळश्याचा तुकडा घेऊन सराव करत असे.आई त्याला वह्यापुस्तकांना हातही लावू देत नसे. वह्यापुस्तके बाबांना दाखवण्यासाठी तिने विकत आणले होते पण त्याला हात लावायचा नाही अशी मधूला सक्त ताकीद होती.

       एकदा आई घरात नाही असे पाहून मधुने आईच्या कपाटातून हळूच पुस्तक बाहेर काढले पण कुठून कसे त्याच्या सावत्रभावाने ते पाहिले नि आई घरी आल्यावर तिला सांगितले तेव्हा आईने त्याच्या हातावर गरम तव्याचे चटके दिले तेव्हापासून मधु त्यावर त्या वही पुस्तकांना हातही लावत नसे. आईला कळू नये म्हणून तो गाईच्या पाठीवर कोळशाच्या तुकड्याने अभ्यास करी.तो कापडाचा तुकडाही आईच्या नकळत सोबत घेऊन जाई. घरी परत येताना गाईची पाठ ओल्या फडक्याने स्वच्छ पुसून काढी.उगाच आईच्या नजरेला पडायला नको नाहीतर अजून शिक्षा करेल. त्याच्या आजूबाजूच्या बायकांना मधुविषयी फार वाईट वाटे. परंतु त्याच्या आईच्या तापट स्वभावामुळे त्या तिच्या नादालाही लागत नसत पण आईपारख्या मधूचे हाल त्यांना पाहवत नसे.

      आजही मधू गुरांना घेउन रानात गेला. तिथे त्याचा मित्र सदू आला.सदूने विचारले," अरे मधू शाळेत का येत नाहीस?गुरूजी तुझ्याविषयी विचारत होते".मधू काहीच बोलला नाही कारण आईला कळाले तर ती शिक्षा करील ही भीती त्याच्या मनात होती. त्याने सदूला थातुरमातुर कारण सांगून घालवले. परंतु त्याला आपल्या जीवनाचे फार वाईट वाटत होते. आपले सर्व मित्र शाळा शिकणार नि आपण अडाणीच राहणार मग आपण साहेब कसे बनणार ?बाबा घरी येतील तर त्यांना किती वाईट वाटेल ?आता तो जिद्दीने जास्त अभ्यास करू लागला .त्याला वाटत होते शाळेत जाऊन बसावे. परंतु आईच्या भीतीने तो बाहेरूनच गुरुजींचे सारे ऐकत असे ,समजून घेत होता. कसे कोण जाणे एके दिवशी गुरुजींना मधू खिडकीत उभे राहून ऐकत असल्याचे दिसले.ते खिडकीतून वाकुन पाहु लागले आणि त्यांना मधू खाली लपून बसल्याचे दिसले. त्यानी दोन मुलांना मधूला घेऊन येण्यासाठी पाठवले, परंतु तोवर तो पळून गेला. गुरुजींनी मुलांना विचारले ,"अरे कोणाला मधूच्या घराचा पत्ता माहित आहे का?" तसे सदू उठून उभा राहिला आणि म्हणाला," गुरुजी तो आमच्या घराजवळच राहतो, पण त्याची सावत्र आहे. ती त्याला खूप मारते".गुरूजींनी "बरे" म्हणून त्याला खाली बसवले. दुसऱ्या दिवशी सकाळीच गुरूजी सदूच्या घरी आले नि म्हणाले,"सदू चल मला मधूच्या घरी जायचे आहे, मी बोलतो त्याच्या आईशी". तसे सदू थरथर कापू लागला नि म्हणाला,"नको गुरूजी. मी तुम्हाला सांगितले असे जर त्याच्या आईला समजले मला खूप ओरडेल नि मधूला खुप मारेल". पण गुरुजी काही निश्चयच करून आले होते. ते म्हणाले," बाळा, तू घाबरू नकोस असेच काही झाले तर मी पोलीसात वर्दी देईन. तू लांबूनच मला त्याचे घर दाखव".सदूने लांबूनच गुरुजींना मधूचे घर दाखवले आणि तिथेच लपून सारे पाहू लागला.कडी वाजवताच मधुची सावत्र आई "कोण आहे"? म्हणत दार उघडायला आली. समोर गुरुजींना पाहताच ती थोडी बिथरली पण सारवासारव करत म्हणाली," गुरुजी तुम्ही का आलात? मधूला शाळा शिकायची नाही तुम्ही जाऊ शकता".असे बोलून तिने गुरुजींच्या तोंडावर धाडकन दार आपटले.आता मात्र गुरूजींनी काय ते सारे जाणले. डोक्यावरून पाणी गेले होते. गुरुजी समजावण्याच्या इराद्याने येथे आले होते. परंतु इथले चित्र पाहून त्यांनी थेट पोलिस स्टेशन गाठले.

        मधूच्या आईची तक्रार पोलिसात केली. इन्सपेक्टरनी पोलीसाला गाडी काढायला सांगितली.गुरुजींना आत बसायला सांगून पोलीस इन्स्पेक्टर म्हणाले, "चला गुरूजी आजच त्या बाईला चांगला धडा शिकवू. हे सर्व पाच मिनिटात मधूच्या दारात आले. पोलिसांना दारात पाहून मधूच्या सावत्र आईची बोबडीच वळवुन.तिचे सारे आव्हानच गळून पडले. ती सर्वांच्या हातापाया पडू लागली. तशी इन्स्पेक्टर म्हणाले ,"पुष्कळ झाले हे सोंग. मला मधूच्या बाबांना फोन नंबर हवाय तो फोन नंबर द्या मग काय ते बोला". तिने निमूटपणे मधूच्या बाबांचा नंबर दिला तसे इन्स्पेक्टरनी ताबडतोब फोन लावला आणि त्यांना लगेच तिथे येण्यास सांगितले. मधूचे बाबा अचंबित होऊन म्हणाले,"अहो,तो तरी रोज शाळेत जातो तो छान आहे असे त्याची आई नेहमु मला सांगते आणि मी हे काय ऐकतोय?!" त्यांनी ताबडतोब निघतो हे सांगतात पोलिसांनी त्या बाईला सूचना केल्या. दुसऱ्या दिवशी मधूला घेऊन त्याचे आई-वडील पोलीस स्टेशनला आले. साहेबांनी सविस्तर सांगण्याविषयी सांगताच मधूच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा गळू लागल्या.बाबांनी त्याला जवळ घेतले नि म्हणाले,"आईवेगळ्या या लेकराला आईचे प्रेम मिळावे म्हणून मी दुसरे लग्न केले होते. त्याचा या आईने त्याला कैदाशिनीप्रमाणे सांभाळले. ते पत्नीकडे वळून म्हणाले," तू स्त्री जातीला कलंक आहेस. निघून जा डोळ्यासमोरून आत्ताच". तशी ती हाता पाया पडू लागली. मधूला चांगले सांभाळण्याचेही कबूल केले.पण इतके दिवस इवल्याशा लेकराने कसे सहन केले असेल हे आठवून मधूचे बाबा त्याला पोटाशी घेऊन कितीतरी वेळ गदगदत राहिले आणि तो ही त्यांना कोकरासारखा बिलगून आसवे गाळत राहिला. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy