kanchan chabukswar

Drama

4.6  

kanchan chabukswar

Drama

पळवाट सौ. कांचन चाबुकस्वार.

पळवाट सौ. कांचन चाबुकस्वार.

4 mins
384


कर्नाटकातील हसन या या टुमदार गावा मध्ये वेणू आणि सिताराम या म्हाताऱ्या जोडपे बरोबर त्यांची तरणीताठी सून वरदा, राहत होती. राहत होती. वरदा चा नवरा जर्मनीमध्ये ट्रेनिंगसाठी गेला होता आणि हल्ली आलेल्या महामारी मुळे त्यामुळे तिथेच अडकून पडला. गेले पाच सहा महिने अतिशय कंटाळवाणी झाले होते .


  त्यांच्या लग्नाला जेमतेम सहा महिने झाले होते, कर्नाटकातील रीतीप्रमाणे ठरवूनच लग्न केले होते, त्यामुळे वरदा आणि गोपाल यांना एकमेकांची काही माहिती व्हायच्या आतच गोपाल जर्मनीला निघून गेला.


  पोलीस इन्स्पेक्टर श्रीनिवासन यांच्या डोक्याला एक नवीनच ताप झाला होता.

 कारण वेणू आणि सीताराम यांनी वरदा हरवल्याची तक्रार नोंदवली होती.

 एवढी मोठी लग्न झालेली वरदा अशी कशी हरवेल?

 श्रीनिवासन यांना सीताराम वरती संशय येत होता, मध्यमवर्गीय जोडपे वरदा कडून भरपूर काम करून घेत होते. सकाळ-संध्याकाळ स्वयंपाक, भांडी घासणे झाडलोट, कपडे धुणे, नुकतंच लग्न झालेल्या वरदा अगदी त्रासून गेली होती. माहेरची बेंगलोर ची चांगली शिकलेली मुलगी होती. फेब्रुवारीपासून गोपाळ जर्मनीला गेला तो परत झाला नाही त्याच्यामुळे फक्त घरातली काम करून वरदा अतिशय त्रास होऊन गेली होती.


 श्रीनिवासन यांनी तपास करण्यास सुरुवात केली, वरदा चा फोटो मिळवला, गोपाल ला फोन केला, वरदा च्या नातेवाइकांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. पण सीतारामन यांच्यासांगण्यानुसार

वरदा ॲम्बुलन्स मध्ये बसून गेली होती. आता आश्चर्य करायची पाळी श्रीनिवासन वरती आली.

  त्याचं असं झालं की कॉलनी मध्ये काही डॉक्टर आणि नर्स आले होते त्यांनी सगळ्यांची कोविंड चाचणी केली .

दुसऱ्या दिवशी दोन नर्स, 2 वIर्ड बाय सिताराम यांच्या घरी आले आणि वरदा रुग्ण आहे असं सांगून , तिला तिचे कपडे घेऊन आणि काही जुजबी सामान घेऊन त्यांच्याबरोबर यायला सांगितले आणि तिला घेऊन ते बंगलोरच्या हॉस्पिटल कडे रवाना झाले.

   सितारामला काही बरोबर वाटलं नाही म्हणून त्यांनी हॉस्पिटल. डॉक्टर यांचं नाव गाव पत्ता सगळं लिहून घेतलं, तरणीताठी वरदा उगीच काही वेडंवाकडं व्हायला नको म्हणून ते स्वतः ऍम्ब्युलन्समध्ये तिच्या बरोबर निघाले. पण नर्स आणि वॉर्डबॉय यांनी त्यांना येऊ दिले नाही.

 जाताना मात्र दीड लाख रुपयांचा चेक आणि काही कॅश बरोबर द्यायला त्यांनी सांगितले.

   तरीही सिताराम आणि वेणू फार काळजीत होते त्यांनी ताबडतोब वरदा च्या आई-वडिलांना कळवले आणि हॉस्पिटल ला फोन लावला, फोनवरती डॉक्टरांनी त्यांना रिपोर्ट बद्दल सांगितले आणि तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पाठवायला सांगितले.


 वरदा हॉस्पिटल मध्ये पोहोचल्या चा फोन आला, दोन दिवस ती सकाळ-संध्याकाळ सगळ्यांना फोन करून तिच्या ट्रीटमेंट बद्दल माहिती देत होती, त्यामुळे वेणू आणि सिताराम हे निर्धास्त झाले.

 तिसऱ्या दिवशी दीड लाखाचा चेक वटल्यास निरोप सीताराम ला मिळाला.


वरदाने घरी कळवले की तिला हॉस्पिटलमध्ये निदान दहा दिवस तरी राहावे लागणार आहे.

 रोजचा फोन, आणि सगळी खुशाली कळत असल्यामुळे सासर-माहेर दोन्हीकडची मंडळी वरदा च्या बाबतीत अगदी निर्धास्त होते होती.


 आणि आज दहा दिवसानंतर आता ते पोलिस स्टेशनमध्ये येऊन बसले होते.

 अँब्युलन्स कुठल्याही हॉस्पिटलची नव्हती, त्यांनी फोन केलेला हॉस्पिटल अस्तित्वातच नव्हतं. वरदा चा फोन बंद येत होता, इतका डोक्याला ताप. म्हणून गोपाल त्यांच्यावरती ओरडत होता, गोपालचे पण बरोबर होतं आई-वडिलांच्या भरोशावर की त्यांनी वरदा ला भारतामध्ये ठेवलं होतं.

    वेणू आणि सिताराम यांना जसे तोंड दाबून बुक्क्याचा मार मिळत होता.

 सिताराम ब्लडप्रेशर दणादण वाढू लागलं, वरदाचे  आई वडील पण हसनला वेणू आणि सिताराम यांच्या घरी आले, पहिल्यांदा काळजी आणि त्यानंतर मात्र भांडाभांडी होऊन मारामारी पर्यंत वेळ आली.


     तरुण लग्न झालेली वरदा जाईलच कुठे? तिच्याबरोबर कोणत्या हॉस्पिटलची ॲम्बुलन्स कशी होती? काहीच उलगडा होईना.   नर्सने तर वरदा रक्त तपासणी ची रिपोर्ट फाईल देखील सिताराम कडे दिली नव्हती.

 श्रीनिवासन यांनी पण    वेणू आणि सिताराम यांना वेड्यात काढले."कोण कुठले डॉक्टर येतात आणि तुमच्या सुनेला घेऊन जातात."


   वरदा चे आई वडील अतिशय काळजीपोटी परत परत सगळ्या हॉस्पिटलच्या चकरा मारू लागले. हसन, चिकमंगळूर, बेंगलोर, सगळे हॉस्पिटल्स पालथे घालून झाले तरीपण वरदा चा पत्ता लागला नाही.


 दिवसांवर दिवस, आठवा आठवड्यावर आठवडे, महिन्यावर महिने जाऊ लागले तरीपण वरदाच काही पत्ता लागला नाही.


 सगळीकडे पोलीस खात्याची बदनामी व्हायला लागली, हॉस्पिटलच्या कारभारावर सगळेजण बारीक नजर ठेवून राहू लागले, वर्तमानपत्रे टीव्ही, आणि सामाजिक वाहिन्या यांनी वरदा प्रकरणावरून जणू काही एक गदारोळ उठवला.


 

 असे करता करता दोन महिने झाले, वरदाचे पत्र तिच्या आई-वडिलांकडे आले.सोबत दीड लाखाचा चेक पण होता.

 मजकूर वाचताच वरदा च्या आई-वडिलांना आभाळ फाटल यासारखे वाटले.

वरदा ने सगळ्यांची माफी मागितली होती, सासु-सासरे आई-वडील आणि नवरा, तसेच आजूबाजूचे लोक पोलीस इन्स्पेक्टर आणि ज्यांना कोणाला तिच्या नाहीश्या होण्याने त्रास झाला होता त्या सगळ्यांची माफी तिने मागितले होते.


 वरदा स्वतः पळून गेले होती, दुबईमध्ये तिच्या प्रियकराबरोबर आनंदाने राहत होती.

वरदा चा प्रियकर केवळ दुसऱ्या जातीचा म्हणून तिच्या आई-वडिलांनी तिचे लग्न जबरदस्तीने गोपाल बरोबर लावले होते. एकविसाव्या शतकात जात पात बघण्यापेक्षा मनाचे मिलन बघणे योग्य नाही का?

वरदा ने स्वतः व्यवस्थित रित्या पळण्याचा कार्यक्रम आखला, त्यामध्ये अर्थातच तिचा प्रियकर सामील होता.


 नाजूक वेळेला सोडून गेलेला गोपाल, सासरी होणारा कामाचा जुलूम, आणि आई-वडिलांनी दाखवलेला कोरडेपणा, विसा असूनही तिकीट न पाठवणारा गोपाल, वरदा जणू सगळ्या बाजूंनी कोंडीत सापडली होती. त्यातून आधी चा प्रियकर तिच्याशी गोड बोलून, आधार देऊन, तिला आपल्याकडे येण्याचे आमंत्रण करत होता. वरदा आणि गोपाल यांच्या लग्नाला तसा फारसा काहीच अर्थ नव्हता, लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी गोपाल जर्मनीला रवाना झाला होता. त्याच्याविषयी प्रेम, ओढ, वरदiला वाटण्याचे काही कारणच नव्हते. यामुळे त्रासलेली वरदा स्वतः निघून गेली होती. तिने रीतसर गोपाल कडून घटस्फोट पण मागितला होता

आई-वडिलांचे मान सन्मान, मुलांना कसे भोवतात, आई-वडिलांचा हट्ट, जातीपातीचे संस्कार, आणि मुला-मुलींचा अगोचरपणा.असले प्रकार कोणी करू नयेत, आणि काहीही झालं तरी आई आपल्या आई-वडिलांना म्हातारपणी मानसिक त्रास देऊ नये म्हणून ही गोष्ट.Rate this content
Log in

Similar marathi story from Drama