Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Jyoti gosavi

Romance Others


4.0  

Jyoti gosavi

Romance Others


फुलले रे क्षण माझे फुलले रे

फुलले रे क्षण माझे फुलले रे

2 mins 159 2 mins 159

आपल्या आयुष्यात असे कितीतरी फुललेले क्षण येतात, पण ते आपल्याला मुठीत पकडता आले पाहिजेत. डोळ्याच्या कॅमेऱ्यात आणि मेंदूच्या चिप मध्ये कायमचे बंदिस्त करता आले पाहिजेत. हृदयाच्या कुपीत जतन करता आले पाहिजेत. असे कितीतरी फुललेले क्षण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात. आता त्यातले किती आठवायचे ?


लग्नाआधी जेव्हा आपण एकत्र फिरायचो, तेव्हाचा तुझा होणारा निसटता स्पर्श, आपले कितीतरी क्षण फुलवत होता, जेव्हा आपला साखरपुडा झाला आणि  वांॾ:निश्चयाच्या वेळी तू सर्वांसमोर माझा हात हातात घेऊन माझ्या करांगुली मध्ये अंगठी घातली , तेव्हाचा तो खुललेला क्षण, लग्नात सप्तपदीच्या वेळी माझा हात हातात घेऊन तू मनोमन दिलेले आश्वासन, तुझा आश्‍वासक स्पर्श, माझा क्षण फुलवून गेला. त्यानंतर आपण पहिल्यांदा लोणावळ्याला फिरायला गेलो, त्या रेल्वेच्या ट्रॅक मधून हातात हात घालून दऱ्याखोऱ्यात मनसोक्त भटकलो. अगदी रेल्वेच्या बोगद्यात सुद्धा शिरलो, तेही असे आठवणीतले फुललेले क्षण. 


आपल्या संसारवेलीवर उमललेले पहिले फूल, त्याने देखील आपले खुप क्षण फुलवले. ज्या पहिल्या एका क्षणाला मी आई झाले तो क्षण, ज्या क्षणी मला प्रमोशन आले तो क्षण, काही कारणास्तव तुझं काम बंद होतं तू घरात होतास आणि अशा अत्यंत आणीबाणीच्या वेळी आपण एक घराचा व्यवहार केला होता तो पूर्ण झाला आणि नाना लटपटी खटपटी करून झालेलं ते आपलं पहिलं घर ,ते देखील आयुष्यातले कितीतरी क्षण सुगंधी करून गेलं, फुलवून गेल. 


आपण एकदा दार्जिलिंगला फिरायला गेलो असताना, भल्या पहाटे उठलो आणि तिथल्या त्या स्टेशनला कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये जाऊन बसलो. नुकतेच सूर्याचे किरण अगदी हलके हलके बर्फाचे मुकुट घातलेल्या डोंगरांवर ती पसरत होते. आपल्या आजूबाजूला कोणी म्हणजे कोणी नव्हते. स्टेशनच्या थोडेसे बाजूला आपण एका दगडावर ती बसलो होतो, आणि निसर्गाचा तो अविष्कार डोळ्यांनी पीत होतो .नकळत हातात हात गुंफले गेले आणि आपण अक्षरशा त्या दृश्याने भारावून गेलो, तो आयुष्य फुलून गेलेला क्षण,आजही लक्षात राहिलाय जसाच्या तसा. 


नंतर तर आपण भारतभर भटकलो ,काश्मीरमधल्या शिकाऱ्यातले क्षण, पेंगोंग लेक तळ्याकाठी, जसे निसर्गाचे एखादे लँडस्केप असावे असा अप्रतिम नजारा, तिथे देखील आपण निशब्द बसलेलो .असे कितीतरी क्षण आयुष्य फुलवून गेले, सुगंधी बनवून गेले .आणि आत्ता लेटेस्ट गेल्यावर्षी कोविड-19 पॉझिटिव निघाल्याने दहा दिवस हॉस्पिटल ला ऍडमिट होते. जीवा वरच्या दुखण्यातून बरी होऊन घरी आले आणि हातात तबक घेऊन निरांजनाने ओवाळून तू मला घरात घेतलं, तुझ्या हातातल्या निरंजना पेक्षा तुझ्या डोळ्याची दोन निरंजन मला ओवाळत होती ,जीवाची कुरवंडी करत होती. असा तो आयुष्यातला निशब्द तरीही फुललेला क्षण, मी कशी काय विसरु शकते? 


असे खूप सुंदर क्षण आपल्या आयुष्यात पूर्वीदेखील आले आणि पुढे देखील होत यावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

 

एक जुने गाणे आहे, आईच्या तोंडून कधी तरी ऐकलेले गाणे


गाठ ही ऋणानुबंधाची

 पोर कुणाचा, पोर कुणाची,

  एक दिलाने नांदायची चालविती नौका जीवनाची

 गाठ ही ऋणानुबंधाची


 आपल्या बाबतीत अगदी सार्थ वाटते. 


Rate this content
Log in

More marathi story from Jyoti gosavi

Similar marathi story from Romance