फक्त तू नाहीस ...
फक्त तू नाहीस ...


प्रिये , आठवत का ग तुला ... आपली ती शेवटची भेट .ती गळाभेट थेट अश्रूभरल्या नयनी बिलगलीस तू ...मी कसंबसं सावरलं होत स्वतःला ... (म्हणजे असं दाखवलं फक्त तुला ... ) मी आतून पार कोलमडलो होतो . कसं आहे ना तुम्हा स्त्रियांना रडून मोकळं तरी होता येत . ते आम्हाला कधी कधी शक्य होत नाही ... सारं सार आठवतं अगदी काल- परवा घडल्यागत ... एखाद्या चित्रपटात फ्लॅश बॅक दाखवतात ना तसं...
आपण नेहमी भेटायचो ती टेकडी ... त्या उंच - उंच पर्वत रांगा... तो खळाळता निर्झर ... सभोवतालची हिरवळ अन मनाला मोहवून टाकनारा तो खट्याळ वारा.. भारावलेला तो संबंध परिसर ... त्या तिथे झाडावर विणलेला तो राघू मैनेचा खोपा , ती बहरलेली वृक्ष वेली , फुले फळे , पशु पक्षी , चिमणी पाखर ...अगदी होत तसेच सारं काही आहेत फक्त तू नाहीस .... राघू मैनेचा खोपा पाहून तू म्हणालीस होतीस .. किती छान असत ना रे पक्षांचं जीवन .. मस्त , कलंदर , बिनधास्त .. मनासारखं ...सगळं तो खोपा आहे तसाच आहे ग पण ... खोप्यात ती छोटी - छोटी पिलं हल्ली दिसत नाही ... आणि ती पक्षीणहि का कुणास ठाऊक केविलवाणी वाटते .... गेलास असते का तिचा राघू तुझ्यासारखा तिला सोडून .... कि येईल परत पुन्हा तिच्या ओढीनं ....ती बसलेली वाटते हताश होऊन वाट पाहत बसलेल्या नववधूसारखी ... बेचैन होऊन ..
.येईलही तो परतून आणीन तो पुन्हा काडी - काडी जमवून पुन्हा नवं घरटं विणण्यासाठी ...काय झालं असेल ? कुठं गेला असेल तिचा राघू कि त्यांचीही झाली असेल ताटातूट आपल्यासारखीच ... अशा असांख्य प्रश्नांनी मी वेडापिसा होतो .. तुझी प्रकर्षानं आठवण येत राहते .. म्हणून मीतिकडे जण कमीच केलंय हल्ली... पण एखाद दिवशी तिकडे पावलं आपोआप चालू लागतात .. त्या निर्जन , निवांत स्थळी पुन्हा मनाला बरं वाटत तिथे जाऊन आल्यावर ...अन मनाला उभारीही मिळते .. का कुणास ठाऊक ? आपण भेटायचो तिथे तुझा सहवासात असल्यासारखं वाटत क्षणभर आणि तू नाहीस पुन्हा प्रकर्षानं जाणवल्याने मानलं उदासी येते अन राहून राहून वाटत खरंच सारं काही आहे जीवनात मनासारखं पण तू नाहीस... फक्त तू नाहीस ....