शब्दसखी सुनिता

Romance Fantasy Others

4.1  

शब्दसखी सुनिता

Romance Fantasy Others

पाऊस आणि अचानक भेटलेला तो

पाऊस आणि अचानक भेटलेला तो

2 mins
437


पावसाच काही सांगता येत नाही. कधी अचानक येईल सांगता येत नाही. असच अचानक पाऊस आला. अस्मीता नेहमी छत्री विसरायची त्यावेळेस नेमक हा पाऊस यायचा. पण आज तिने छत्री आणली होती. खुप पाऊस कोसळत होता. अस्मिताच ऑफीस सुटल ती घरी जायला निघाली. तिच्या घराच्या दिशेने ती चालली असताना एक मुलगा धावत तिच्याजवळ आला. "हाय फ्रेंड, मला तुमच्या छत्रीमध्ये येऊ द्या ना, तिथपर्यंत." तिनेही त्याला छत्रीत घेतल. अस्मिताला काही प्रोब्लेम नव्हता. भर पावसात तो भिजु नये, म्हणून अस्मिता त्याला पावसापासुन वाचवत होती. ती गप्पच होती. त्याला वाटल आपण हिच्या छत्रीत येऊ दे म्हटल, कदाचित हीला वाईट असेल. म्हणून तोच तिच्याशी बोलायला सुरूवात करतो. तिला तिच नाव, कुठे राहते विचारतो. तिही त्याला सांगते. अस्मिता त्याला विचारते. "या भर पावसात हे असे ड्रेस घालून कुठे निघालास?" त्याच नाव अजित तो सांगतो की त्याचा डान्सचा क्लास आहे. त्याला फार आनंद झाला. अस्मिताच घर होत त्याच दिशेला अजितचा क्लास होता. दोघेही सोबत एकमेकांना पावसापासुन वाचवत होते. एकाच छत्रीमध्ये ते दोघे आले.       


दहा मिनिटांनी गप्पा मारत मारत ते दोघे पोहचले. अस्मिताला तो थँक यु म्हणाला आणि जाताना म्हणाला, परत भेटुया याच रोडवर कधीतरी. तिनेही हो म्हणत त्याला बाय करुन ति घरी गेली. तोहि त्याच्या क्लासकडे निघून गेला. अस्मिता आज खूप खुश होती. तिला अजित परत भेटावा अस वाटत होत. तो एका छत्रीतील त्या रोडवरचा प्रवास ती खुप मिस करायला लागली होती. ती कधी कधी त्या वेळेला यायची पण तो तिला भेटतच नव्हत. अचानक एक दिवस समोर आला नि म्हणाला. "अस्मिता, बघ मी म्हटलो होतो ना पुन्हा भेटू आपण बघ आज आपण असे परत भेटू. " तिला खरच खूप छान वाटल त्याला बघुन. तिने त्याला विचारल तु इतक्या दिवस दिसला नाहीस. तेव्हा त्याने तो पंधरा दिवस आजारी असल्याच सांगितल. पण तिला त्याची फार काळजी वाटत होती. पण तिने बोलून दाखवल नाही. अजितला तिच्या मनाची अवस्था समजत होती. त्याने तिला फ्रेडशिप साठी हात पुढे केला. " आपण आजपासून एकमेकांचे फ्रेन्ड्स आहोत आणि नेहमीच भेटत राहू या." 


अजित अगदी अस्मिच्या मनातल बोलला होता. तिलाही हे ऐकून फार आनंद झाला. तिनेही हो म्हटल. त्या दिवसापासून ते दोघे एकमेकांचे फ्रेन्ड्स बनले. मैत्रीच्या सुंदर नात्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला.  


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance