Bhagyashree Mudholkar

Abstract

2  

Bhagyashree Mudholkar

Abstract

नवरा म्हणावा आपला

नवरा म्हणावा आपला

3 mins
1.2K


"अगं नीट बंद करते कुलूप नीट लागलेला दिसत नाही. कडी अडकली वाटते."

"अरे करतेच आहे गेले दोन महिने झाले सांगते मी, त्या सुताराच्या मागे लागून त्याला बोलव आणि हे काम करून घे. पण माझं कोणी ऐकेल तर शपथ."

" अगं बोलावतो मी .तोवर अॅडजस्ट कर.छोट्या कामासाठी माणसं लवकर येत नाही."


नेहमीचच आहे अगदी गळ्यापर्यंत आल्याशिवाय हलायचे नाही. अरे गेले पंचवीस वर्ष, तुझा संसार कसा सांभाळत आहे ,माझे मलाच माहीत."

"हो ना भारतरत्नसाठी तुझी शिफारिस करावी म्हणतो."


असे सुखसंवाद आम्हा दोघा पती-पत्नीमध्ये रोजचे असतात. कधी कधी हसून खेळून सोडून दिले जातात. तर कधीतरी थोडासा अबोला आणि आदळआपट अर्थातच फक्त माझी. नवरोबा अशावेळी अगदी शांत असतो काही वेळातच माझा राग निवळणार याविषयी त्याला खात्री असते.

 

खरे तर देव जोड्या बनवताना बहुतेक दोन वेगवेगळ्या स्वभावांच्या व्यक्तींना एकत्र आणतो. अगदी सारखे स्वभाव असणाऱ्या पती-पत्नीचा संसार अगदी मिळमिळीत होईल. याविषयी त्याला खात्री असणार त्यामुळे देवाने लग्नाच्या गाठी बांधण्याचे काम स्वतःकडेच ठेवलेलं आहे. आणि तो वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्तींना एकत्र आणून त्यांच्या संसाराची गंमत वाढवतो हेच खरं.

 

माझ्या संसारात तर मला याचा पदोपदी प्रत्यय येत असतो. एखाद वेळेस चार दिवस शांततेत गेले. तर, अगदी माझ्या मुलालाही चुकल्यासारखे वाटते 

बाबा एवढे शांत कसे तो एखादी काडी करण्याचा प्रयत्न करतोच. भांडण, होण्यासाठी काही फार मोठे निमित्त लागते. असं काही नाही कितीतरी शिल्लक गोष्टी खूप मोठ्या थराला जातात आणि नंतर दहा मिनिटं शांततेने विचार केला की पटते की काय बावळटसारखं म्हणतोय आपण. आमच्याकडे मला फोटो काढण्याची प्रचंड आवड आणि तिकडे अगदी उदासीनता एखादा सेल्फी नवऱ्यासोबत काढायचा किंवा कोणाकडून दोघांचे छान असे फोटो काढून घ्यायचे तर बऱ्याच मिन्नतवाऱ्या कराव्या लागतात.

 

मला फिरण्याची प्रचंड आवड. वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणे, प्रेक्षणीयस्थळे पाहणे आणि अर्थातच त्या ठिकाणची जी खासियत असेल त्याची खरेदी करणे. ह्या अगदी आवडीच्या वस्तू  त्याच्यामध्ये एखाद्या ठिकाणी जावे शांतपणे चार दिवस तिथेच राहावे. काय असेल ते खावे प्यावे फिरावे. आणि, परत यावे खरेदी कशाला झालं ठिणगी पडायला तेवढं निमित्त आम्हाला पुरेसं असतं रिलॅक्स होण्यासाठी गेलेलो. आम्ही थोडीशी वादावादी करतच परत येतो 

अशा वेळी कुठेतरी वाचलेले आठवते,


"देवाला पण मानलं पाहिजे नवरा बायकोच्या जोड्या बनवताना 

दोन अशा व्यक्तीमत्वांना एकत्रित आणतो की जे एकमेकांशी छान जुळवून घेतील. 

अबोल व्यक्तीला बोलकी व्यक्ती देतो , 

गंभीर व्यक्तीला आनंदी व्यक्ती देतो , 

भांडखोर व्यक्तीला शांत व्यक्ती देतो 

आणि खडूस लोकांना थोडीशी मोकळी

आणि जास्त समजूतदार व्यक्ती मिळते, 

ज्या योगे त्यांचही कुठे अडणार नाही...


खरं तर, दोन व्यक्तीमध्ये फरक हा असणारच. परंतु हा जो फरक आहे तो ओळखून तुम्ही कसे निभावता हे जास्त महत्वाचं आहे. अनेकदा आपला दुषित दृष्टीकोन हाच एक मोठा अडथळा असतो. सगळेच सारखे असतील तर आयुष्य किती कंटाळवाणे , नीरस होईल ?उदास व्यक्तीच्या सोबत उदास माणूस 

कसं वाटतं ? प्रत्येकाने आयुष्याचा आनंद पुरेपूर घ्यावा , एकट राहू नये ह्यासाठी  मैत्री , जोडीदार , सहचर अशा गोष्टी उदयास आल्या 

पण आपण मात्र आपल्या व्यक्तीवर टीका करण्यात इतके मशगुल होतो की त्यांच्या वेगळेपणातील सौदर्य बघण्याची तसदी कधी घेत नाही. आपलं माणूस थोडसं वेडगळ आहे ,वेगळं आहे. पण, गोड आणि प्रिय आहे असा विचार करायला सुरवात केली की त्याचं वेगळेपण सहज आपल्यामध्ये सामावून जात. अनुरूप शब्दाचा अर्थ हा कधीच एकसारखे असा होत नाही न ? एकमेकांना अनुरूप म्हणजेच  जिथे एक कमी तिथे त्याची कमतरता दुसरा भरून काढतो. कधी गुणांनी, कधी स्वभावाने, कधी विचारांनी.... म्हणूनच विविधतेत एकता असते. ह्या वेगळेपणातूनच एक सुंदर , संवेदेनशील आणि मोहक नातं निर्माण होतं जे आपल्याला जपते. आणि ज्याला जीवापाड जपण्यासाठी आपण धडपडतो ......"


वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये कितीही वेगवेगळी मतं मतांतरे असली तरी, काही वेळेला एकमेकांसाठी हळवं होणं होतच. एकमेकांचं दुखलं खुपलं, सुखदुःख,आई वडिलांविषयीच्या भावना, यावेळी हळवेपणा येतोच. आणि त्या वेळेला हाच माझा नवरा खूप सांभाळून घेतो. 

कितीही भांडलो तरी, त्याच्या आवडीची एखादी वस्तू दिसली तर पटकन माझ्याकडून घेणं होतच .त्याच्या आवडीचे पदार्थ वेळोवेळी बनवणं होतच .

याबाबतीत तोही कुठे मागे नसतो. माझ्यासाठी अचानक छानसा गजरा आणणं ,खाऊ,चाॅकलेटस आणणं,मला आवडतील अशा पर्सेस ,कुर्ती,कामासाठी बाहेरगावी, गेल्यावर दिसल्या तर आवर्जून आणणार .मी खरेदी खूप करते ,अशी कितीही नावं ठेवली तरी तो आवर्जून एवढं माझ्यासाठी करतोच.

 मैत्रिणींनो कितीही वेळा वादावादी होऊद्या ,भांडणं होऊ द्या, अबोले धरा , पण शेवटी" तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना" हे आपल्या नवऱ्याबाबत नेहमीच खरं ठरतं.


व. पु. काळे म्हणतात, म्हणजे त्यांनी तर यावर पूर्ण पुस्तकच लिहिले आहे ,त्याप्रमाणे 

'नवरा म्हणावा आपला '


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract