# नणंदभावजय
# नणंदभावजय
आर्या दिसायला सुंदर समजदार मुलगी चारचौघात उठून दिसणारी होती. ती मेकॅनिकल इंजिनीर होती.देवाने तिला सर्वगुण संपन्न बनवले होते. ती जॉब करत होती. घरच्यांनीही लग्नाचं वय झालं म्हणून लग्नाचा निर्णय घेतला. तिलाही तिच्यासारखाच शिकलेला उच्चशिक्षित मुलगा हवा होता. तिनेही घरच्यांना तशी अट सांगितली. तिला एक स्थळ चालून आले. मुलगा वेलसेटल दिसायलाही खूप सुंदर, तोही सिविल इंजिनीर होता. शहरात फ्लॅट, गावाकडे शेतीवाडी बंगला त्यामुळे नकार देण्यासारखे काही नव्हते.
लग्न होऊन आर्या घरी आली. सुरुवातीचे दिवस खूप छान होते. हळूहळू तिला घरातील लोकांच्या स्वभावाचा अंदाज येऊ लागला. तिच्या सासरकडचे लोक खूप जुन्या विचारांचे होते. मालतीताई (सासूबाई )ताट सरकवून बाजूला होत. त्यांचं एकच मत होतं की,मी माझ्या सासूचं जशाप्रकारे सगळं केल तसंच माझ्या सुनेने माझीही देखभाल करायला हवी.
घरातील सगळं कामं करून, ती जॉब करत होती, घरातील सर्व काम आवरून जातं. घरातील सर्वजण जेवण झालं कि हात धुवून बाजूला होत. त्यामुळे तिची खूप चिडचिड होत. तिला कोणाचा सपोर्ट नव्हता. नवऱ्याला काही बोलायला गेली कि नवरा बोलत माझ्या आईने ही आतापर्यंत हेच केले, पण तिला घर आणि जॉब सांभाळून करताना तिची खूप ओढतान होतं. तीनरूमचा प्लॅट आवरताना तिला तारेवरची कसरत करावी लागत. त्यात घरातील भांडी, धुणं, केर फरशी, नाष्टा,स्वयंपाक हे सगळंच एकटीने करून जॉब करणं तिला अवघड जाई.
आर्याने एक निर्णय घेतला तिने घरातील कामासाठी कामवाल्या मावशी ठेवल्या,कारण तिला त्यांची थोडीफार मदत होईल म्हणून, तर सासूबाईंची किरकिर चालू झाली. घरात अजिबात स्वच्छता नसते. त्या कामवाल्या बाईला सासूबाईनी काढून टाकले, आणि स्वतः काम करू लागल्या पण तेही करत असताना तिच्या मागे किरकिर सुरूच होती , त्या तिला सारखं बोलून दाखवत.आम्ही पण संसार केले आमचं आयुष्य गेलं, पण आम्हाला कामवाली असते हेही माहित नव्हतं . तिला आता हे सगळं असहाय्य झालं होत. समजूतदार असणारी आर्या आता पूर्ण आतून तुटून गेली होती.
एक दिवस तिची नणंद साक्षी रडतच घरी आली. आईच्या गळ्यात पडूनच रडू लागली. कोणालाच काही कळत नव्हते. आर्या ने साक्षीला लगेच पाणी दिले, आणि चहा ठेवायला गेली.
साक्षी बोलू लागली..." घरातील सगळे मंडळी जमली होती.
आई मला घरातील रोजच्या कामाचा कंटाळा आलाय..,! घरात कोणीही जराही मदत करत नाही. रोज बाहेर जाऊन जॉब करायचा,आणि घरातही सगळं करायचं खूप दमछाक होते माझी... !
मी आज राकेशला बोलायला गेले, तर खूप भांडण झालं दोघांच्यात. सासूसासर्यांना ही माझी काही किंमत नाही. रोज सगळ्यांच्या मागे पळण्याचा खूप कंटाळा आला आहे मला. म्हणून मी घर सोडून आले. ज्या घरात माझी किंमतच नाही.... मी का राहू त्या घरात मोलकरीण म्हणून.. ? मला नाही जायचं परत त्या घरात.
आई तुमचा काळ वेगळा होता. आम्ही शिकलेलो असल्याने आम्हाला पण वाटणार ना स्वावलंबी आयुष्य जगावं चार पैसे कमवावेत. मी कामाला बाई लावली तेही मी माझ्याच पगारातून पैसे देत होते, तरीही घरातील मंडळीना खटकले तू सांग आई माझं काय चुकलं....?
आता आर्याच्या सासूचे डोळे उघडले होते. आपण आपल्या सुनेशी किती वाईट वागलो याचाही त्यांना पच्छाताप झाला होता .
सासूबाईंनी आर्या ला बोलवून घेतले, खूप समजदार मिळाली सून मला...!
पण मी तिची किंमत केली नाही. तुला हवं तसं राहा आणि संसारही चांगला कर माझी तुझ्यावर कसलेही बंधन नाहीत.
आर्या साक्षीला थँक्स बोलली, कारण आदल्या दिवशी आर्याने साक्षीला फोन करून घरातील सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामुळे तिची नणंद साक्षी आर्याच्या मदतीसाठी धावून आलेली होती.
साक्षी आणि आर्या दोघीही बहिणीसारख्या राहत. दोघींचे विचार एकमेकींना पटत. उलट आईचे आर्यावर खूप बंधने पाहून साक्षीला आईचा कधी कधी खूप राग येई. आज तिच्या नणंदेमुळे म्हणजे साक्षीमुळे संसार ही आर्याचा सुखी झाला होतो.
