Khushi Dhoke

Drama Crime Thriller

3.8  

Khushi Dhoke

Drama Crime Thriller

नंदिनी!

नंदिनी!

3 mins
194


सकाळी...!


सचिनला एक कॉल आला. कॉल कॉन्स्टेबल ऐश्वर्याचा होता. काहीतरी घडल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आणि एका पत्त्यावर लगेच पोहचायला सांगण्यात आले. सचिन तडक तिकडे जायला निघाला. एश्वर्याने दिलेल्या पत्त्यावर तो पोहचला. एक स्त्री तिथं निर्वस्त्र पडून असल्याची माहिती त्याला कॉन्स्टेबल एश्वर्याने दिली. तो येईपर्यंत कॉन्स्टेबल ऐश्वर्याने सगळं व्यवस्थित सांभाळलं होतं. विचारपूस केली असता, तिला तिथे कोणी तरी टाकून गेल्याचे निदर्शनास आले. तिला लगेच उपचारासाठी रूग्णालयात रवाना करण्यात आले.


तिचा क्रूरपणे सामूहिक बलात्कार करुन तिच्या प्रायव्हेट पार्टला इजा करण्यात आल्याचं डॉक्टरांनी सचिनला सांगीतले. सचिनच्या डोळ्यांपुढे बालपणीच्या अशाच एका घटनेचे दृश्य आले. जिथून प्रेरित होत पुढे पोलिस विभागात एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या रूपात गरजूंना मदत करण्याचं त्याने मनाशी ठरवले होते. पण आज त्याच्या समोर तशीच परिस्थिती उद्भवली! ज्यामुळे स्वतःशी केलेल्या निश्चयांना उजाळा मिळाला.


तपासानंतर सचिन पोलीस स्टेशन निघून आला. सचिनला त्या मुलीशी वेगळीच आपुलकी निर्माण झाली होती. थोड्या वेळाने त्याचा फोन वाजला. सचिनने मोबाईल बघितला तर, जॉलीचे चार मिस्ड कॉल होते. डोक्याला हात लावत तो बाहेर आला आणि तिला फोन लावला. तिने त्याला जवळच्या सीसीडीत यायला सांगीतले. थोड्याच वेळात तो तिथे पोहचला. घडलेला प्रकार ऐकून तिला किळसवाण्या मानसिकतेचा राग आला. दोघांनी काही वेळ गप्पा मारल्या आणि घरी निघून गेले.


नंदिनी केसवर पूर्ण लक्ष देत तो तपास करणार होता. सदाशिव माने यांना नंदिनीचे वकील नियुक्त करण्यात आले होते. माने नंदिनीची बाजू न्यायालयात मांडणार होते.


घरच्यांनी नंदिनीचा स्वीकार न केल्याने उपचारानंतर नंदिनी सचिनकडे राहणार होती. तिला सचिन सोबत बघून लोकं नको ते घाणेरडे तर्क लावत.


न्यायालयाकडून एक तारीख देण्यात आली. ती तारीख नंदिनीच्या उपचारानंतरची होती. ती बऱ्यापैकी सावरली असल्याने सचिन तिला घेऊन न्यायालयात पोहचला. सदाशिव माने यांनी नंदिनी कडून औपचारिकता पार पाडून घेतली. थोड्याच वेळात न्यायालयीन प्रक्रियेला सुरुवात झाली. 


"सदाशिव माने आपण सुरुवात करावी."


सन्माननीय न्यायाधीशांनी ऑर्डर सोडताच मानेंनी सुरूवात केली.


"माय लॉर्ड, पहिला पुरावा म्हणून मी नंदिनीच्या आई श्रीमती सविता यांना समोर बोलावण्याची परवानगी मागतो."


"परवानगी आहे."


परवानगी मिळताच त्यांना समोर बोलावण्यात आले.


"सविता ताई, आपल्या मुली बाबतीत जी क्रूरता घडली; त्याविषयी आपण काय सांगाल?"


"आम्ही काय सांगणार, साहेब? हीच कुलक्षिनी! धंदा करायची साहेब ही; धंदा!"


स्वतः आपल्या जन्मदात्र्या आईने केलेले आरोप! तेही, इतक्या खालच्या पातळीतले! हे सर्व बघून नंदिनी गोंधळून गेली. तिला भोवळ आली आणि ती जागीच कोसळली. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेला त्या दिवसापुरते थांबवण्यात आले. सन्माननीय न्यायाधीशांनी पुढची तारीख दिली.


पुढच्या तारखेवर सचिन नंदिनीला घेऊन न्यायालयात पोहचला. न्यायालयीन प्रक्रियेला सुरुवात झाली. आज आरोपींचे वकील नंदिनिला प्रश्न विचारणार होते.


"तर, मिस नंदिनी! मला सांगा, आपण मिस्टर राज यांना कशा आणि कधी पासून ओळखता?"


"तो माझा आत्ते भाऊ आहे. बालपणापासून ओळखते."


"मग मला वाटतं माय लॉर्ड, ही ओपन अँड शट केस आहे. कारण मिस नंदिनी ह्या मिस्टर राज यांच्या मामे बहीण आहेत. त्यांचे धागे-दोरे आधी पासूनच जुळले असावेत. त्यांचं प्रेम प्रसंग होतं आणि जे झाले दोघांच्या सहमतीनेच! असंच या पूर्ण प्रकरणावरून दिसून येत आहे."


"नाही! असे काहीच नाही. साहेब, मी त्याला ओळखणं आणि आमचं एकमेकांवर प्रेम असणं, याचा अर्थ त्याला माझ्या सोबत इतकं क्रूर वागण्याचं आमंत्रण देणं होत नाही!"


"प्रेम प्रसंगात आजकाल काय घडू शकतं; हे वेगळं सांगायला नको. माय लॉर्ड, माझ्या बाजूने ही केस कुठल्याही पुराव्याशिवाय सिद्धच होऊ शकत नाही आणि म्हणून ही ओपन अँड शट केस असल्याचा निर्णय जाहीर करावा; अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे."


"थांबा मिस्टर खोब्रागडे, एवढी घाई कसली. माय लॉर्ड, मी आपल्या समोर इथे काही तथ्य आधारीत ठोस आणि खरे पुरावे सादर करण्याची परवानगी मागतो."


"परवानगी आहे."


तपासात गुन्ह्याच्या ठिकाणाहून हाती लागलेल्या व्हिडिओ क्लिप्स आणि केस संबंधीत काही पुरावे जसे की, डी. एन. ए. रिपोर्ट्स, ब्लड रिपोर्ट्स, नंदिनीचे प्रायव्हेट काही रिपोर्ट्स हे सर्व सदाशिव माने यांचेकडून न्यायालयासमोर सादर करण्यात आले. नंदिनी सोबत घडलेल्या विकृतीत राज आणि त्याच्या मित्रांचा हात असल्याचे यावरून सिद्ध झाले. तसेच नंदिनीच्या आईने पैशाच्या लालसेपोटी खोटे आरोप नंदिनीवर लावून न्यायालयाची दिशाभूल केल्याचे चार्जेस देखील त्यांच्यावर लावण्यात आले. पुढे सन्माननीय न्यायाधीशांनी त्यांचा निकाल सूनावला.


"राज, विकी, मनसुख, विशाल आणि राहुल या पाच जणांनी मिळून नंदिनी सोबत घाणेरडं कृत्य केल्याचं सदर पुराव्यांवरून सिद्ध होते. या पाचही गुन्हेगारांना आय. पी. सी. कलम ३७६ डी अंतर्गत जन्मठेप तसेच द्रव्यदंडाच्या शिक्षा न्यायालय सुनावत आहे; याची दोन्ही पक्षांनी नोंद घ्यावी."


मानवाधिकार संस्था तसेच महिला व बाल कल्याण विभाग जे एकत्र मिळून नंदिनिला न्याय मिळावा यासाठी रात्रंदिवस झटत होते त्यांना यश आले.


सचिनच्या प्रयत्नांना देखील यश आले होते आणि स्वतःशी केलेले निश्चय पूर्ण झाल्याचे समाधान त्याला होते. 


प्रत्येक जण न्यायालयीन निर्णयाने खूप समाधानी होता.


समाप्त.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama