अपेक्षांचा अंत
अपेक्षांचा अंत
कोमल मुंबई विद्यापीठात शिकणारी एक विद्यार्थिनी! एका नावाजलेल्या महाविद्यालयातून ती वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. देखणी, हुशार, महत्वाकांक्षी या गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशीच ती होती.
कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली असल्याने तिची आर्थिक परिस्थिती साधारण होती. बाबांचा व्यावसाय होता आणि आई गृहिणी. भावंडांमध्ये तिची एक छोटी बहिण सृष्टी ही खोडकर स्वभावाची!
कोमल ज्या विद्यापीठात तिचं पदवीचं शिक्षण घेत होती; त्याच विद्यापीठात एक मुलगा होता. त्याचे सतत कोमलकडे लक्ष असायचे! का कोण जाणे त्याच्या मनावर कोमलने प्रेमाची छाप पाडली होती. नेहमीच तो तिच्या मागे पुढे असायचा. पण तिचे त्याच्याकडे लक्ष नसायचे.
एके दिवशी महाविद्यालयाकडून "प्रोफेशनल टूर" जाणार असल्याचे ठरले. प्रत्येक विद्यार्थ्यांना हजर राहणे बंधनकारक होतेच.
ठरलेल्या दिवशी सर्व जमले. विद्यार्थ्यांना काही महत्वपूर्ण सूचना देत सर्वांना बस आत प्रवेश करण्यास सांगण्यात आले. एक एक करून सर्व विद्यार्थी आत शिरले आणि बघता बघता बस पूर्ण भरली.
कोमल खिडकीतून बाहेर बघत कानात इअर फोन्स घालून शांत डोळे मिटून बसून होती. कोणीही तिला त्रास देणार नाही याची शहानिशा करून घेत तिने जागा निवडली होती. तिच्या शेजारी जागा खाली बघून तो मुलगा तिकडे जाऊन बसला.
तो शेजारी बसलेला तिला जाणवले; माञ तिने त्याच्याकडे बघणे टाळले आणि स्वतःच्या फोन मध्ये डोके खुपसले.
तिला व्यस्त बघून त्याने मागे डोके टेकवले आणि डोळे बंद करून तसाच बसून राहिला.
साधारण काही वेळ गेला असेल. जोरजोरात ओरडण्याचा आवाज आल्याचे त्याला जाणवले आणि तो दचकून जागा झाला.
त्याने बघीतले तर कोमल मोठ्याने ओरडून बस थांबवण्यासाठी विनवणी करताना त्याच्या नजरेस पडली. त्याला काहीच सुचेना!
"काय झाले?"
त्याने बिथरून विचारणा केली.
"माझा फोन खिडकीतून बाहेर पडला!"
असं म्हणत ती परत मोठ्याने "बस थांबवा, बस थांबवा" असे ओरडू लागली.
त्याने बघीतले तर कोणीच या गोष्टीकडे लक्ष देत नसल्याचे त्याला समजले आणि रागाच्या भरात तो पुढे निघून आला.
"ओ बस थांबवा!"
शिवम ने चालकास चांगलेच खडसावले.
"बस थांबणार नाही!"
चालकाने स्पष्ट उद्गरले.
"का थांबणार नाही?"
"त्यांनी स्वतःच्या फोनची काळजी घ्यायला हवी होती. असा कसा पडला फोन?"
"तुम्ही बाहेर पडलात तर थांबेल ना बस?"
त्याच्या या बोलण्यावर माञ चालक मोठ्याने हसू लागला. त्याला काही कळण्याआतंच शिवमने त्याला धक्का दिला. त्याचा तोल जाऊन पडण्याच्या भीतीने त्याने जोरदार ब्रेक मारला आणि एकदाची बस थांबली. जोरदार मारलेल्या ब्रेकमुळे सर्व पुढच्या सिटवर धडकले.
शिवमने कोमलला इशारा केला आणि पुढे येण्यास सांगीतले.
"शिवम ही काय वागणूक तुझी? अपघात झाला असता तर, तू त्याची जबाबदारी घेतली असती का?"
"तिचा फोन बाहेर पडला; तिच्या घरचे तिची काळजी करत असतील याची जबाबदारी तुम्ही घेतली असती का?"
त्याच्या उलट प्रश्नाने प्रोफेसर थबकले आणि त्यांनी त्या दोघांना बाहेर पडण्याची परवानगी दिली.
कोमलचा हात पकडत तो बाहेर पडला. तिच्यासाठी शिवमचा तो स्पर्श सुखावणारा होता; पण तिला ते चेहऱ्यावर दाखवायचे नव्हते. तिने त्याचा हात झटकून दिला आणि फोन शोधत पुढे निघाली.
"हॅलो?"
शिवमने तिला मागून आवाज दिला.
"काय आहे?"
तिने वैतागून विचारले.
"मला तुझा नंबर दे, फोन शोधण्यात मदत मिळेल."
"No Ways!"
चेहऱ्यावर वेगळेच हावभाव आणत ती बोलली!
"जा शोध मग तूच!"
तो चिडून बोलल्याचे जाणवताच तिने त्याला फोन मागायला हात पुढे केला.
"काय?"
"नंबर!"
"What?"
"अरे माझा नंबर देऊ ना?"
"नक्की ना?"
"देतोस का आता?"
"हा घे!"
असं म्हणत त्याने खिशातून फोन काढत तिच्याकडे सोपवला. तिने त्यावर स्वतःचा नंबर लिहिला आणि फोन मिळवला. फोनच्या शोधात दोघांनी बरेच अंतर पार केले. शेवटी जवळपास वीस प्रयत्नानंतर त्यांना एक रिंगटोन ऐकू आली.
"Hey!"
असं म्हणत तिने त्याचा हात धरला. तिच्या त्या स्पर्शाने तो गालातंच हसला. तिला वाईट वाटू नये म्हणून त्याने चेहऱ्यावर एक गांभीर्य आणत पुढे विचारणा केली.
"ऐकू तर येतंय! पण आवाज येतोय कुठून?"
"शोध!"
असं म्हणत तिने परत परत फोन मिळवला आणि शोधायला सुरुवात केली. दोघांच्या शोधानंतर शिवमच्या पायाखाली काहीतरी असल्याचे जाणवले. त्याने बघीतले तर फोन तिथे पडून दिसला.
"Hey, look!"
"Thank God!"
तिने तो उचलला आणि कुठे काही नुकसान तर झाले नाही ना! हे चाचपडून पाहिले. फोन अगदीच चांगल्या स्थितीत असल्याचे समजताच तिच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली.
"Thanks yaar!"
"Why?"
"तू नसतास तर माझा फोन मला मिळाला नसता!"
"Okay!"
तेवढ्यात शिवमच्या फोनची घंटी वाजली.
"Hello!"
"शिवम, आणखी किती वाट बघायची? तुमच्या मागे ओंकार सरांना पाठवलं आहे. तुम्ही लवकर परत या."
पलीकडून प्रोफेसर करिश्मा बोलल्या. शिवमने सहमती दर्शवत फोन ठेवला आणि ते दोघे बसच्या दिशेने निघाले. समोरून ओंकार सर त्यांच्या दिशेने येताना डोळ्यास पडले. त्यांनी हातवारे करत दोघांना बोलावून घेतले आणि शेवटी ते बस आत शिरले.
परत त्यांचा प्रवास सुरू झाला.
यावेळेस शिवम खिडकी जवळ तर कोमल त्याच्या बाजूला बसली. दोघांमध्ये गप्पा चांगल्याच रंगल्या.
हळू हळू शिवमच्या स्वभावाची प्रत्येकच बाजू कोमलला उलगडू लागली आणि ती कळत नकळत त्याच्यात हरवत गेली.
ठरलेल्या ठिकाणी ते पोहचले. सर्वांनी आपापल्या डायऱ्या घेतल्या आणि आत प्रवेश केला. तिथे देण्यात येणारी प्रत्येकंच माहिती ज्याने त्याने आपापल्या परीने नोंदवून घेतली. त्यांची भेट संपली आणि सर्व बाहेर येऊन फोटोशूट करू लागले.
कोमलने सुद्धा शिवम सोबत फोटोशूट करवून घेतला. थोडा वेळ तिथे थांबून परत त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला.
रात्री उशिरापर्यंत ते महाविद्यालयात पोहचले. सर्व विद्यार्थ्यांकडे त्यांची साधनं होतीच त्यामुळे जाण्याचा प्रश्नच नव्हता. एक एक करत जो तो आपापल्या घरी निघून गेला.
कोमलने तिची दुचाकी काढली आणि महाविद्यालया बाहेर येऊन शिवमची वाट पाहत उभी राहिली. थोड्या वेळा नंतर शिवम बाहेर आला. त्याला कोमल रस्त्याकडेला थांबलेली नजरेस पडली.
"का थांबली आहेस? घरी जायचे नाही का?"
"कॉफी?"
"What?"
"कॉफी रे! माझ्याकडून तुला पार्टी!"
"For what?"
"तू माझं ३५,०००/-₹ चं नुकसान होण्यापासून वाचवलं त्यासाठी."
"मग फक्त कॉफी का? डिनर प्लॅन करू ना!"
"Why not! Let's go!"
दोघेही जवळंच असलेल्या एका रेस्टॉरंट मध्ये पोहचले. दिवसभराच्या टूर नंतर कोमलला थकवा जाणवत होता. ती आत जाऊन फ्रेश होऊन आली.
स्वतःचे केस कानामागे अडकवत ती समोरून येताना त्याला दिसली. तिला पाहून त्याच्या हृदयाचा ठोका चुकला!
"Hey!"
तिने त्याच्यासमोर हात भिरकावत विचारणा केली. तसाच तो भानावर आला.
"कुठे हरवला होतास?"
"तुझ्यात!"
"What?"
"हो, तुझ्यातंच!"
"What are you talking about?"
"मला तू आवडतेस!"
"काय?"
"हो!"
असं म्हणत स्वतःच्या गुडघ्यांवर बसून त्याने तिला मागणी घातली.
"अरे हे काय करतो आहेस? उठ!"
"आधी तुझा होकार आहे असं बोल!"
"तू आधी इथून उठ! नाहीतर मी घरी निघून जाईल!"
असं म्हणत तिने स्वतःची बॅग उचलली आणि मागे फिरून घरी जायला निघाली. तोच जागेवरून उठत त्याने तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे ओढून घेतले. ती त्याच्या छातीवर येऊन धडकली.
"काय करतोय तू हे? सोड मला जाऊदे!"
"मी तुला आवडतो की नाही?"
"आवडतोस……! नाही…..! म्हणजे…..! मला नाही माहिती…!"
नजरेला नजर भिडवत त्याने परत तिची विचारणा केली.
"हो की नाही?"
"हो!"
तिचा होकार ऐकताच त्याने तिला उचलून धरले आणि ओरडतंच गोल फिरवले.
"I'm so happy baby! Love you so much!"
असं म्हणत त्याने तिला खाली उतरवले. नंतर दोघे जेवण करून बाहेर पडले. पार्किंग लॉट मध्ये पोहचून कोमल तिच्या गाडीच्या दिशेने जाणार तोच शिवमने तिला स्वतःकडे ओढून घेत ओठांवर ओठ टेकवले.
त्याच्या स्पर्शाने ती मोहरली आणि बिनातक्रार तिने प्रतिसाद दिला.
तिच्यासाठी शिवमचा तो स्पर्श सुखावणारा होता. त्याच्या पहिल्याच स्पर्शाला विरोध न करता तिने स्वतःस त्याच्या नावे केले होते.
असेच दिवसामागून दिवस जात होते. दोघांमधील प्रेम दिवसेंदिवस वाढतंच गेले.
अशातंच दोघांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. पदवी अभ्यासक्रमा नंतर कोमलने नोकरी शोधायला सुरुवात केली. तर शिवमने स्पर्धा परीक्षा क्षेत्र निवडले.
दोघांच्या अधून मधून भेटी गाठी व्हायच्या. कोमल शिवमला समजून घेत असे. नोकरी करत असल्याने त्यांच्या बाहेर घुमण्या-फिरण्याचा, खाण्या-पिण्याच्या खर्चाचे नियोजन स्वतः कोमल करायची. तिने याविषयी कधीच त्याच्याकडे तक्रार केली नव्हती. उलट ती त्याचे तिच्यावर असलेले प्रेम कसे टिकवून ठेवता येईल यावर भर देत होती.
असेच दिवस गेले आणि शिवमने तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. त्याचा तिरस्कार सहन करावा लागू नये म्हणून तिने होकार कळवला. ठरलेल्या दिवशी त्यांनी एक खोली आधीच बुक करवून घेतली. सर्व खर्च कोमल करणार हे ठरले होतेच.
दोघे तिथे पोहचले. वेळ न घालवता शिवमने तिला विश्वासात घेत स्वतःच्या बाहुपाशात घट्ट कवटाळले. तिच्या काळजात धडकी भरली. न राहवून तिने विचारलेच!
"शिवम, आपण करतोय हे बरोबर तर आहे ना?"
"तुझा माझ्यावर विश्वास तर आहे ना?"
"विश्वास आहे अरे….. पण!"
"मग बस! शेवटी आपण लग्न ही करणार आहोतंच. त्यामुळे तू काळजी करू नकोस!"
"आपण लग्न करणार आहोत!" या त्याच्या एका आश्वासनाने तिने स्वतःचे तन मन त्याला सोपवून दिले आणि दोन्ही आत्मा स्वतःची तहान भागवण्यासाठी धडपडू लागल्या!
त्याच्या प्रत्येक स्पर्शाला तिने कामुक प्रतिसाद दिला. दोघांनी एकमेकांच्या शरीराला भूक भागवण्याची परवानगी देऊ केली आणि शेवटी सर्व मर्यादा तोडून त्यांनी स्वतःच्या कामुक भावनांना वाट मोकळी करून दिली.
तीन तास ते एकमेकांत आकंठ बुडाले होते. कोमलसाठी हा सुखावणारा अनुभव होता. ती पहील्यांदाच कोणाचे तरी प्रेम अनुभवत होती.
"Love you Shivam!"
"Love you too baby!"
"आपण नक्की लग्न करणार ना?"
"हो ग!"
लग्नाच्या स्वप्नात हरवून तिने त्याला घट्ट कवटाळले आणि झोपी गेली.
त्या दिवसानंतर अधून मधून दोघे भेटत. कधी तरी अशाच रात्री कामुक भावना अनावर होत आणि बघता बघता त्या रात्री दिवसात बदलल्या. त्यांच्या प्रेमाला चांगलाच ऊत आला होता.
इकडे शिवम स्पर्धा परीक्षा तयारी करण्यात व्यस्त असल्यामुळे तो कुठलीही नोकरी करण्याच्या भानगडीत पडू इच्छित नव्हता. म्हणून त्यांच्या भेटी गाठी वेळी कोमल स्वतःच खर्च करायची. तिला त्याचे वाईट वाटत नव्हते. उलट वाटायचे की, शिवम परीक्षा पास होऊन एक अधिकारी होणार आणि त्यांचं भविष्य सुनिश्चित होईल.
असेच दिवस गेले.
एके दिवशी दोघांचे बाहेर जाणे ठरले. कोमल जवळचे पैसे संपले होते. म्हणून तिने शिवमला सांगून दुचाकी रस्त्याकडेला थांबवून घेतली. जवळच एटीएम मशीन शोधून ती पैसे काढायला निघून गेली.
आत काही तांत्रिक बिघाडामुळे पैसे काढणे अवघड होऊन बसले. तिला काहीच सुचेना! कारण जवळपास दूर अंतरापर्यंत तिला एटीएम दिसत नव्हते.
ती शिवम जवळ आली आणि तिने तिची समस्या बोलून दाखवली.
"चल निघूया!"
"अरे पण पैसे नाही काढता आले ना!"
"त्यात काय मग मी देतो ना!"
"नाही, नको….! म्हणजे तू कमावत असतास तर मी हक्काने मागीतले देखील असते. असू दे पुढे एटीएम शोधू चल."
तिच्या या बोलण्यावर शिवमला राग आला. त्याने दुचाकी थेट तिच्या घरी आणून थांबवली.
"अरे हे काय? आपण फिरायला जाणार होतो ना?"
"आज नंतर आपण भेटायचं नाही."
"अरे असा का बोलतो आहेस?"
"माझ्याकडे नोकरी नाही हे सांगण्यासाठी तुझे आभार! येतो मी."
"अरे ऐक तर! माझा तो अर्थ नव्हता!"
"हात सोड….! आजपासून तुझं आणि माझं जमणार नाही."
"शिवम…!"
तो निघून गेला आणि त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत ती तशीच स्थब्ध राहिली. क्षणात होत्याचं नव्हतं झालं!
खांद्यावर हात ठेवत तिच्या बहिणीने तिला धीर दिला.
"सृष्टी!"
असं म्हणत तिने तिला घट्ट कवटाळले आणि हंबरडा फोडला.
"रडू नकोस. जाऊदे त्याला."
"अग पण!"
"येईल तो, त्याला तुझी किंमत कळली की!"
असं म्हणत सृष्टीने तिची समजूत काढली.
दिवसामागून दिवस जात होते. पण तिच्या मनातून शिवम जात नव्हता.
ती महत्वाकांक्षी असल्यामुळे नेहमीपासूनच तिला स्वतःच्या जोरावर काहीतरी करून दाखवावे असे वाटायचे. ही वेळ स्वतःला सावरण्याची असल्यामुळे तिने स्वतःचे हॉटेल टाकायचे ठरवले. त्यात ती इतकी व्यस्त झाली की जवळजवळ शिवमचा तिला विसर पडला होता.
अशातंच एक दिवस तिला त्याचा मॅसेज आला. न राहवून तिने त्याच्या मॅसेजचा रिप्लाय केलाच.
"हॅलो, बोल."
"कोमल, मला भेटायचं आहे."
"बोलायला उरलंच काय आता?"
"हे बघ, भेट तू!"
"मी नाही भेटणार!"
"मी पत्ता पाठवतो आहे. तिकडे उद्या सकाळी ठीक १०:०० वाजता पोहच!"
"मी येणार नाही!"
"तू येते आहेस!"
असे म्हणत त्याने फोन ठेवून दिला. ही परत विचारात हरवली.
दुसरा दिवस उजाडला आणि विचारात असताच सकाळचे ०९:०० वाजले. जायचे की नाही या गोंधळात असताच ती तयार झाली. तिचे तिच्या मनावर नियंत्रण नव्हते आणि ती ठरवलेल्या पत्त्यावर पोहचली.
शिवमने एक खोली त्यांच्यासाठी आधीच बुक केली होती. नेहमीप्रमाणे दोघांनी एकमेकांच्या शरीराला बंधमुक्त केले.
यावेळेस कोमलला खूप अस्वस्थ वाटू लागले. शिवम आधीसारखा वागत नव्हता. शरीर संबंधावेळी नेहमी काळजीपूर्वक वागणारा शिवम आज तिच्या मनात असुरक्षितता निर्माण करण्यास कारणीभूत ठरला होता.
तिने लगेच अंगावर कपडे चढवले आणि जायला निघाली.
"शिवम, आपण यानंतर भेटायचे नाही."
"का?"
"त्यादिवशी माझ्या बोलण्यामुळे तू दुखावला गेलास. याची खंत मनात होतीच. पण त्यानंतर सहा महिने तू मला एक मॅसेज किंवा कॉल करून विचारणा सुद्धा केली नाही! आणि आज जेव्हा तुला शारीरिक संबंधांची गरज भासली; तू मला बोलावून घेतले. हेच का तुझे प्रेम? सांग! आजवर तू फक्त माझा शारीरिक दृष्ट्या वापर करवून घेतलास; जे मला जाणवत होते. पण मी टाळायचे कारण माझे तुझ्यावर खरे प्रेम होते. माझ्या खूप अपेक्षा होत्या तुझ्याकडून! आयुष्यात कुठली गोष्ट जर त्रास देत असेल ना; तर ती अपेक्षांचा भंग असते. मी तुझ्याकडे कधीच आर्थिक अपेक्षा केली नाही. तू एक अधिकारी व्हावा हीच अपेक्षा होती माझी! जी माझ्या हिताची असेल असे मला वाटत नाही! तुझ्या उज्वल भविष्यासाठी त्या अपेक्षा होत्या माझ्या! पण आता त्या ही असणार नाहीत. इथून पुढचा निर्णय मी घेतला आहे. आणखी अपेक्षांचा चुराडा होण्यापेक्षा आपण इथेच थांबलेलं बरं! Good bye!"
समाप्त!

