मिठी!
मिठी!
"वेद.....! वेद......! कुठे आहेस.....?"
क्लासरूम मधून बाहेर फुटबॉल ग्राउंड पर्यंत ती धापा टाकत पळत सुटली आणि एकदाची ग्राउंडच्या मेन गेटवर येऊन थांबली. तिला समोर कधीचा दिसला होता तो! पण तिला आवाज द्यावा वाटला नाही. त्याला ती निरखून पाहत राहिली. कधी जवळ येत भानावर आणायला त्याने तिच्या डोळ्यांसमोरून हात फिरवला हे ही तिला समजले नाही.
"हे......! व्हॉट्स राँग? कुठे हरवलात मॅडम? मी तुमच्या समोर ऊभा आहे."
"ओह्ह.....! नथिंग जस्ट....! छड ये सब, चल."
"नॉटी....! देवांशला बघत होतीस ना?"
"ह्ममम्मम!!! (मनात: वेड्या तुला बघतेय कधीची. बट तू कधीच माझ्या फिलिंग्ज समजून घेतल्या नाही ना.)
"डीड यू से समथिंग?"
"नो, हे वेद लिसन ना! आज पार्टी करायला जाऊया ना कुठे बाहेर, प्लीज?"
"बेब्स.....! नो वेज.....! विसरलीस, लास्ट टाईम नाईट आऊट वेळी किती प्रॉब्लेम झालेली? अँड धीस टाईम, नो."
तो त्याच्या जागेवरून उठला आणि दोन्ही हात बाजूला करत नकार देऊ लागला. लास्ट टाईम त्यांना नाईट आऊट करताना पोलिसांनी पकडून फाईन ठोकली असल्याचं वेदला आठवलं. म्हणूनच त्याचा तिच्या या प्लॅन साठी नकार होता.
"यू डोन्ट लाईक माय कंपनी! हो ना?"
"नॉट लाईक दॅट! बट, इट्स नॉट सेफ आऊट साईड. लेट्स डू वन थिंग, कम ऍट माय प्लेस."
"ऍट युअर् प्लेस! ओके, शार्प @०६:०० पी. एम. सी यू."
एकमेकांचा निरोप घेत दोघेही घरी परतले. इवनिंग पार्टीसाठी किती तरी ड्रेस चॉईस करून शेवटी तिने एक छान ड्रेस निवडला. शॉवर घेऊन मस्त तयार झाली आणि जायला निघाली. थोड्याच वेळात ती वेदच्या घरी पोहचली. त्याने हसतंच दार उघडला.
"वेलकम बेब, यू आर लुकिंग गॉर्जियस."
"रिअली.....? थँक्यू सो मच."
थोडा वेळ दोघेही गप्पा मारत बसले.
"वूड यू लाईक टू डान्स विथ मी?"
दिव्यांका जी स्वभावाने मनमोकळी होती. तिला तिथे खूप अन् कंफर्टेबल वाटत होतं. सतत तिची नजर तिथे ठेवलेल्या फ्लॉवर पॉटच्या दिशेने जात होती. तिथे काही असल्याचा; कोणी तरी नजर ठेऊन असल्याचा भास तिला झाला. तिला घाबरलेली बघून वेदने तिचा डावा हात स्वतःच्या हातात हलकेच पकडून त्यावर ओठ टेकवले. तसेच तिने दचकून त्याच्याकडे पाहिले.
"हे.....! व्हॉट हॅप्पंड....??"
"नथिंग!!"
ऊसनं हसू चेहऱ्यावर आणत त्याच्यासोबत डान्स करायला ती जागेवरुन उठली. कपल डान्स करता-करता तिची नजर किती तरी वेळा त्याच फ्लॉवर पॉटवर येऊन थांबत होती. सतत कोणी तरी नजर ठेवून असल्याचा तिला भास होत होता. थोडा वेळ डान्स करून दोघेही डायनिंग टेबलवर येऊन बसले.
"वेट फॉर ए व्हाईल! आय'ल जस्ट कम बॅक!"
तिला सांगून तो आत निघून गेला. तो गेल्यावर ती जागेवरून उठली आणि हळूच त्या फ्लॉवर पॉट जवळ जाऊन इकडून तिडकून तपासून पाहू लागली. तिथे तिला कॅमेरा नजरेस पडला!
"व्हॉट द हेल?"
खिशातून फोन काढत तिने कोणाला तरी मॅसेज पाठवला आणि परत डायनिंग टेबलवर येऊन बसली. आतून वेद डीशेस घेऊन परत आला.
"हे.....! लूक, डीलिशिअस यम्मी."
ती पूर्ण घाबरली असल्याने,
"वेद लिसन ना, आय हॅव टू गो! फिलिंग नॉट वेल. सो, कॅन यू प्लीज ड्रॉप मी?"
हे ऐकून त्याच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. चांगल्या वेदचे रूपांतर एका नराधमात व्हायला वेळ लागला नाही.
"व्हॉट.....? वाँट टू गो....! अँड आय ड्रॉप यू....? हे मिस, आय एम नॉट यूअर् सर्वंट! ओके? अँड हाऊ कॅन आय ड्रॉप यू इजिली! विदाऊट!"
तो तिच्याकडे बघत किळसवाणा हसला. तिला कळून चुकलं, ज्या चार्मिंग मुलासाठी तिने एका साध्या मुलाचा हार्ट ब्रेक केलेला ते चुकीचे होते. तिला अनिकेत आठवला, जो कॉलेजमध्ये हिच्या मागे-पुढे करायचा. ज्याचं हिच्यावर जीवापाड प्रेम होतं. मात्र हिलाच चार्मिंग अँड हॅण्डसम मुलं आवडत असल्याने बिचाऱ्या अनिकेतला तिने भर कॉलेज ग्राउंडवर अपमानित करून रडायला मजबूर केले होते. हे सर्व आठवून ती स्तब्ध होती.
समोरून वेद तिच्या दिशेने वेगळंच किळसवाण हसू चेहऱ्यावर आणत हळू-हळू पुढे पाऊलं टाकत होता. ती मागे-मागे सरकत होती. त्याचा वेग वाढलेला बघून तिने आपली गती वाढवली आणि पळत सुटली.
"दिव्यांका.....! आर यू ओके? मी अनिकेत! घाबरु नकोस. मी आलो आहे."
"अनिकेत! प्लीज हेल्प मी."
तिचा रडण्याचा आवाज ऐकून अनिकेतचा जीव कासावीस झाला.
"सर, तो माझ्या दिव्यांकाला काही करण्याआधी, प्लीज तुम्ही काही तरी करा."
"राणे, जा एक रॉड बघा लवकर. दार तोडावा लागेल!"
इकडे वेद एखाद्या नराधमासारखा तिच्या मागे पळत होता. ती अजून तरी त्याच्या हाती आली नव्हती.
काही वेळातंच शिपायांच्या प्रयत्नाने दार तोडण्यात पोलिसांना यश आले. शिपायांनी वेदला ताब्यात घेतले.
"मॅडम जसं की आपण सरांना मॅसेज केला. तर आम्हाला सांगाल का, तो कॅमेरा तुम्ही कुठे बघितला होता?"
"हो! तिकडे, त्या फ्लॉवर पॉटच्या आत."
कॅमेरा डिस्कनेक्ट करून ताब्यात घेण्यात आला. वेदला सायबर क्राईम गुन्ह्यांतर्गत अटक करण्यात आली. त्याला लगेच पोलीस स्टेशन रवाना करण्यात आले. इकडे अनिकेत दिव्यांकाला आइस क्रीम पार्लरमध्ये घेऊन आला.
थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. आइस क्रीम संपवून ते एका बागेत जाऊन बसले. तिथे सगळीकडे शांतता होती. दोघेही शांतच होते. थोड्या वेळाने तिने अबोला संपवत बोलायला सुरुवात केली.
"आय एम एक्स्ट्रिमली व्हेरी सॉरी अनिकेत!"
"हे.....! शू......! डोन्ट से धिज!"
"थँक्स फॉर एव्हरीथिंग! एका मॅसेजवर धावून आलास."
"दिव्यांका, तूच काय तर कोणतीही मुलगी असती; तरी, मी हेच केलं असतं ग."
"मे आय आस्क यू वन थिंग?"
"या श्युअर्!"
"आय ब्रोक यू, स्टील यू लव्ह मी?"
"मग त्यात काय? तुला नसेल आवडत म्हणून तू नकार दिलास. पण मला तर तू तेव्हा ही आवडत होतीस आणि आताही! इन्फॅक्ट दिवसेंदिवस जास्तच आवडू लागली आहेस."
"मी तुझा इतका इन्सल्ट करून सुध्दा!"
"आपण एखाद्याला ओळखत नसलो! 'ओळखत' म्हणतोय मी! म्हणजे, ती व्यक्ती कशी आहे? आणि आपल्याला जर त्याला बघूनच राग येत असेल; तर मग आपण आयुष्यभर त्याला समजून न घेताच राग करत असतो. पण मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास होता! कारण, मी कधीच बाहेरच्या सौंदर्यावर प्रेम केला नाही. मला आतली सुंदरता जास्त आवडते. तू होतीस फ्रँक मुलांसोबत पण, तू तुझ्या लिमिट्स कधीच क्रॉस केल्या नाहीस. हे मी बघत होतो. सहज प्रेमात पडलो ग! नकळत घडलं सर्व. स्टील आय लव्ह यू."
"काय आवडतं रे माझ्यात? का इतका प्रेम करतोस?"
"तुझं मन!"
थोड्या वेळा नंतर ती त्याच्या मिठीत हरवून गेली.
समाप्त!

