STORYMIRROR

Vaishali Wanjari

Inspirational

3  

Vaishali Wanjari

Inspirational

नलिनीअम्मा (रिअल हिरो) सत्यकथा

नलिनीअम्मा (रिअल हिरो) सत्यकथा

1 min
153

माझी ऑफिसची मैत्रीण नलिनी. नोकरीच्यानिमित्ताने पार केरळ वरून मुंबईत स्थायिक झाली. भाषेचा प्रोब्लेम असूनही तुटक्या फुटक्या हिंदीत स्वतःला मुंबईत सामवून घेतले, घरच्या गरिबीमुळे स्वतःला नोकरीत वाहून घेतले त्यामुळे लग्नाचे वय कधी निघून गेले कळलेच नाही। शेवटी भावाचेही लग्न झाल्यावर कोणी नातेवाईकांनी पदरी एक लहान मुलगी असलेल्या दूजवराचे स्थळ आणले. ऑफिसच्या बॉस नि स्टाफ नि एकत्र येऊन तिचे थाटामाटात लग्न पार पाडले। 

सुट्टी संपवून ऑफिसला आल्यावर ती बोलली," मेरा कभी शादी होयेगा ऐसे सपनेमे भी नहीं सोचा था।" आप सब लोग मेरे मायके वाले हो।" तिच्या डोळ्यांतुन आनंदाश्रू वाहत होते।

मे तो खुश हु। मुझे रेडिमेड बच्ची मिली, इतना छोटा बच्ची माँ के सीवा कैसा रहा होगा। में मेरा बच्चा नहीं होने देगी। वो बच्ची ओर मेरा पती मेरा वर्ल्ड हे।".

तिच्या तुटक्या फुटक्या हिंदीतही प्रचंड भाव सांगून गेला नंतर ती जे बोलली त्यामुळे तिच्याबद्दल सर्वांच्या मनात आदर निर्माण झाला।

नलिनीने नुसते बोलून दाखवले नाही तर खरे करून दाखवले, खऱ्या आईच्या मायेने नलिनीअम्माने श्रीजाला वाढवले. आज श्रीजा(नलिनीची लेक) उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर आहे गेल्या वर्षीच नलिनीने तिचे धुमधडाक्यात लग्न लावले. मुलीसाठी तिने कधीच नोकरी सोडली होती पण लग्नासाठी साऱ्या ऑफिसला निमंत्रण होते।

'आईही आईच असते,सावत्र वैगरे कोणीच नसते', हे नलिनीने सिद्ध करून दाखवले।

श्रीजाच्या जीवनातील रिअल हिरो ठरली नलिनी..


मातृ देवो भव!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational