दिवाळी गिफ्ट
दिवाळी गिफ्ट
सकाळी दारात एक 14-15 वर्षाचा मुलगा हाती दोन कंदील घेऊन उभा होता. सकाळीच आलेला पाहून वैतागून बोललो, काय विकायला आलास बाबा!
तो : कंदील! हाताने बनवलेत मी। दोन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, पण किमत सारखीच ठेवलीय, घ्या ना! 150 रुपये ला एक , कोणताही घ्या।
मी: हो घेईन ना! किती खर्च आला बाळा तुला ? आणि विकुन कीती नफा मिळणार?
त्याने अगदी निरागस पणे उत्तर दिले, 'काका, 50 रुपये आला खर्च, आणि विकले तर 100 रुपये नफा मिळेल , पण जास्तीत जास्त दहाच बनवणार आहे म्हणजे 1000 रुपये जमा होतील.
मी: वा! अगदी बिझिनेस माईंड आहे तुझं! अरे जास्त कंदील बनव, तुला जास्त नफा नको का? (मीही त्याची खेचायला हसत बोललो)
तो: नको काका , जास्त नाही पण मी फक्त दहाच बनवू शकतो, माझी परीक्षा चालू आहे म्हणून. मिळणाऱ्या माझ्या पहिल्या कमाईची दिवाळीत आईसाठी चांगली साडी घेणार आहे, दरवर्षी माझे बाबा घायचे दिवाळीत आईला. या जानेवारीत ते गेले, म्हणून आता मी दिवाळी गिफ्ट घेणार आईला!
त्याचे बोलणं ऐकून आणि डोळ्यातील चमक पाहून नकळत मलाही भरून आले। ही खरी दिवाळी।
