खंत
खंत
सकाळीच ती उठली .. तर किचन मधून शिऱ्याचा खमंग वास येत होता,जाऊन बघते तर ..., सासूबाईनी किचनचा ताबा घेतलेला.. तू रोज किती करतेस आमच्यासाठी.. आज आराम कर हो!
ती मनोमन सुखावली, कचरा काढायला झाडू हाती घेतला तर नवरोबा समोर उभे! मी करतो आज, तस पण माझं वर्क फ्रॉम होम चालू आहे तू आराम कर! मुलं ही सकाळी लवकर उठून त्यांचं आवरत होती..आज सूर्य जणू पश्चिमेलाच उगवला होता.. इतका आनंद तिला आयुष्यात पहिल्यांदाच झाला होता..
.
.
.
इतक्यात पहाटेचा घड्याळाचा अलार्म वाजला तशी दचकून जागी झाली..बघते तर सर्व ढाराढूर झोपले होते.
सुखद स्वप्न ते!
'शेवटी मदत कोणाचीच नाही'! ....
ही खंत तिच्या मनी वेळी अवेळी सलतच राहिली..
