Ajay Nannar

Romance

3  

Ajay Nannar

Romance

निस्वार्थ प्रेम

निस्वार्थ प्रेम

3 mins
920


प्रेम.... हा एक सुखद एहसास आहे... ही एक ताकद ही आहे... प्रेमात आणी युद्धात सर्वकाही माफ असते... काही प्रेम कहान्या सफल होतात..आणि काही अधूरे देखील राहतात... पहिले प्रेम देखील एकदाच हाेते. 

प्रेम म्हणजे काय? तर हा एका इश्वराने दुसय्रा इश्वरातील पाहिलेले सुंदर रुप. पण प्रेम हे अचानक हाेते... अशीच एक कहानी रवीची आणि स्वरा ची... 


        रवी हा एकदम गरीब मुलगा. आई चार घरात धुनी भांडी करुन पैसा कमवायची. बाप आईला रोज पैशासाठी मारायचा. रवी सगळे पहायचा पन तो काहीच करू शकत नव्हता. एक दिवस आई रवीला म्हणाली.. तु खूप शिक.. चांगला अभ्यास कर.. खूप मोठा हो.. आपले नाव कमव.. आईचे हे शब्द रवीसाठी फार मोलाचे होते. रवी आता लहानाचा मोठा झाला. आईचे स्वप्न होते रवीने मोठ्या कॉलेजात शिकावे... त्यासाठी तिने अपार कष्ट करुन पैसे कमविले व मोठ्या कॉलेजात त्याला दाखल केले. रवी खूप मेहनती आणि अभ्यासू होता.

         कॉलेजचा पहिला दिवस होता. वर्गात खूप जन होते. रवीला काेणच मित्र नव्हते कारण रवी गरीब होता. नंतर नंतर रवीला एक दोन मित्र झाले. 

एक सेम. झाले. रवी वर्गात तिसरा आला. पहिले दोन तर मुलीच होत्या. रवीचे कौतुक झाले. पन रवीची नजर आजकाल अभ्यासावर नव्हती . रवीचे जीवन कॉलेज मध्ये आल्यावर बदलले... रवीचे लक्ष कॉलेजात कमी आन् स्वरात जास्त असायचे. स्वरा ला ही कळाले होते. नजरेतुन नजर एकमेकांना मिळायला लागली पन पुढाकार कोनच घेत नव्हते. शेवटी मुलांनी रवीला आणि मुलांनी स्वरा ला तयार केले... दोघेही एकांतात आले व मनातले एकमेकांना सांगून टाकले. स्वराने रवीशी मैत्री केली... नंतर नंतर त्यांच्यात हळू हळू प्रेम बहरू लागले.. मैत्रीचे रुपांतर कधी प्रेमात झाले कळालेच नाही.. निस्वार्थ प्रेम हाेते ...पन भरपूर स्वप्ने होती... स्वरा ने रवीला खूप मदत केली... शेवटी स्वरा ही रवीची ताकद बनली.. रवीने मोठे होऊन स्वतःची एक मोठी कंपनी शहरात उभी केली. रवी एक मोठा बिझनेसमेन झाला. ... नंतर कालांतराने रवी व स्वराच्या प्रेमात भांडण झाले व ते एकमेकांपासुन दूर निघुन गेले. दूर राहूनही त्याला व तिला एकमेकांची आठवण येतच होती. स्वरा रवीच्या डोळ्यांपासून लांब गेली होती, पन ह्रदयापासुन नाही व म्हणून न राहवून दोघे पुन्हा एकत्र आले. स्वरा च्या घरी हे अमान्य होते .घरच्यांनी दूसरे स्थळ पाहून ठेवले व त्याच्याशीच लग्न करायचे ठरले होते . नंतर रवी सगळे सोडून स्वरा कडे गेला व म्हणाला मी सगळे सोडून तुझ्यावर प्रेम करतो म्हणजे माझ्या आयुष्यात काही नाही असे नाही तर तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात महत्वपूर्ण असे काहीच नाही.. तुझ्याविना माझे जगणे अधुरे आहे.. मी तुझा हात धरला तर शेवटपर्यंत आयुष्यभर कधीच सोडणार नाही... रवीला स्वराच्या डोळ्यांत त्याच्याबदद्लचं प्रेम दिसत होते ...शेवटी रवी निघून गेला ... (काही दिवसानंतर)... पन... काही काळानंतर रवीला स्वरा घर सोडून गेल्याचे व सापडत नसल्याचे कळाले.. रवी अमेरिकेवरून भारतात आला व तिला सगळीकडे शोधत फिरु लागला... सगळी मिडीया रवीच्या मागे होती .रवी सगळीकडे शोधत वणवण फिरत होता. नजर जिकडे जाईल तिकडे पाहत होता. रवीला त्याच्या प्रेमावर पूर्ण विश्वास होता. नंतर रेल्वे स्टेशन वर त्याला बाकावर एक मुलगी दिसली. रवी न राहवत तिथे गेला व नेमकी तिच स्वरा होती. रवीने जग पालथे घालून तिला शोधले व शेवटी त्याच्या जिवात जीव आला. दोघांचाही जीव एकमेकांत होता. विश्वास ही प्रेमाची व नात्यांची अतूट जोड आहे व दोघांच्या एकमेकां वरील विश्वासामुळे... शेवटी स्वरा रवीला सापडली. दोघांचेही प्रेमाचे बंध जुळले होते. रवीने शेवटी त्याचे प्रेम जिददीने व स्वतःच्या दमावर मिळवले. शेवटी सगळ्यांना आनंदाश्रू् आले.....व हे सगळे मिडीयावर लाईव दिसत होते. शेवटी दोघे एकत्र आले व धुमधडाक्यात लग्न केले


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance