Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Meenakshi Kilawat

Tragedy Action


4.3  

Meenakshi Kilawat

Tragedy Action


निबंध

निबंध

2 mins 1.5K 2 mins 1.5K

कोळसा उद्योगाचा होणारा जीवनसृष्टीवर होणारा परिणाम व उपाय:--


    "मानव इतर सजीवांपेक्षा बुद्धीमान असला तरी व्यवहारीदृष्ट्या कमजोर होतो". जागतिक उलाढाल असल्यामुळे सुटका मिळत नाही. आमच्या वणी तालुका व आसपासची संपुर्ण छोटीमोठी गावे, खेडी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. कोळसा वाहतुकीमुळे सडकेवर असंख्य खड्डे पडले आहे. वातावरणात धुळीचे साम्राज्य असल्यामुळे त्यातुन मार्ग काढणे म्हणजे अपघातास निमंत्रण देणे आहे.तसेच या भागात अनेक अपघाताची नोंद आहे. पुर्णतया स्वास्थाचा समतोल बिघडलेला आहे. कोळशाधुळीने कानात, नाकात, अन्नात, पाण्यात ,नदी-नाल्यात, तलावात, विहिरीत, शेतीमातीत हे कण रुजले आहेत. त्यामुळे जीवसृष्टी धोक्यात आलेली आहे. कितीतरी दुर्धर आजाराने जनता त्रयस्त आहेत. जमिनीत रोपलेले वृक्षाची वाढ होत नाही. फुलझाडांना फुले लागत नाही.आणि काही वसलेल्या गावांना स्फोटकांच्या हादऱ्यामुळे घरात राहणे बे-भरवश्याचे झाले आहे. पावलोपावली प्रदूषणाचे थैमान आहे. गावांच्या खाली कोळसाखाणी आहेत. गावचे गाव पोखरून पोकळ झालेले आहे. कधीही पुर्ण गाव जमिनि==नीत दफन होईल सांगता येत नाही. या परिसरातील प्रत्येक नागरिक चिंतेने व्यापलेला आहे. नित्यच गंभीर समस्यांना समोरे जावे लागते आहे. यामध्ये कोणतेही दुमत नाही.

ही गोष्ट महाभंयकर रूप घेऊन विनाशाला कारणीभूत ठरते आहे. आणि शासन या गोष्टीला उपहासात्मक पद्धतीने हाताळतो आहे.


उपाय:- प्रत्येक गोष्टीला पर्यायी साधनं असतात हे विसरून चालणार नाही. विचारपुर्वक निर्णय घेऊन उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर मानवाने केला पाहिजे. आपल्या बरोबरच इतर सजीव घटकांचा विचार केल्यास या गोष्टीवर मात करू शकतोय. सर्वात उत्तम व सुलभ मार्ग हरितक्रांतीचा आहे. प्रत्येकाने मनापासून वृक्षारोपणाला हातभार लावने खुपच आवश्यक आहे. पर्यावरणाला जपावे मानावे व करावे. स्वच्छता मोहिम राबवावी तरच भविष्यात येणार्‍या समस्यांना कमी करून आपण स्वास्थवर्धक राहू शकतोय.आजची सद्दस्थिती लक्षात घेता पर्यावरणाची रेलचेल करून या समस्येचे निराकरण करायला पाहिजे. पर्यावरणातील प्रत्येक सजीव घटकाचे संवर्धन करणे ही आपली एक सामाजिक जबाबदारी आहे हे विसरुन चालणार नाही. जनजागृती करणे व प्रत्येकाने सहभागी होऊन संघटन स्थापले पाहिजे. अथवा पर्यावरण सामाजिक संस्थामध्ये सहभागी होऊन आपले कर्तव्यलक्षीत सहकार्य केल्यास पर्यावरणावर मात करू शकतोय. जनकल्यानार्थ कार्य करून सुरक्षित वलय निर्माण होण्यासाठी आपला काही वेळ देवून मदत करू शकतोय. आणि सुदृढ राहू शकतोय.

हातभार लावा पर्यावरणाला

फायदा त्याचा घेण्यासाठी

निसर्गाची निगा राखा डोळसपणे

करूया गाव स्वच्छता स्वास्थासाठी ।। 


Rate this content
Log in

More marathi story from Meenakshi Kilawat

Similar marathi story from Tragedy