Shwetal Deshmukh

Inspirational

4  

Shwetal Deshmukh

Inspirational

नाती

नाती

6 mins
16.5K


प्रियाला आणि तिच्या घरच्यांना समीर खूप आवडला होता. तो एकदम परफेक्ट लाईफ-पार्टनरच्या चौकटीत बसत होता. लग्नाला होकार देण्यासाठी फक्त एकच अडचण होती, ती म्हणजे समीरची joint family ची अट. हो नाही हो करत प्रिया अडली होती कारण ती स्वतः nuclear family मध्ये वाढली होती. शेवटी प्रियाच्या मैत्रिणीने मार्ग सुचवला "अग आता हो म्हण, आणि लग्न झाल्यावर काही महिन्यानीे separate रहाण्याचा हट्ट कर, बस्स कि झालं, मी देखील हेच केलं" प्रियाला हे suggestion पटलं.

दोघांच लग्न जोरात झालं, लग्नात प्रियाचे दोन्ही घरातून सगळे लाड पुरवले गेले. घरात प्रियाचे सासू-सासरे, नणंद स्वाती नी दीर नितीन, आणि आता समीर नी प्रिया मोजून 6 लोक रहात होती. घरात कामासाठी बाई असल्यामुळे विशेष काही कामं अंगावर पडणार नव्हती. हनिमूनहून जाऊन आल्या-आल्या दुसऱ्या आठवड्यात दोघे ऑफिसला पुन्हा जॉइन झाले. मध्ये आठवडा गेला असेल, तेच सासूबाईनी जाहीर केलं कि त्या आणि बाबा 15 दिवसांसाठी गावी रहायला जाणार आहेत. प्रियासाठी ते नॉर्मल होत आणि गप्प मारता मारता तिने तस् मैत्रिणींना सांगितलं "मुद्दाम जात आहेत त्या, तुझी पंचाईत व्हावी म्हणून, तू नवीन असल्यामुळे गोंधळशील आणि तुझं हसं होईल, हाच डाव असेल बघ, तू काही घाबरू नकोस काही लागलं तर आम्ही आहोत."

नसलेल्या गोष्टीच बीज मैत्रिणीने मनात पेरलं.

गावून परत येतांना सासूबाई प्रियाच्या आईसाठी आवर्जून कडवे वाल आणि आंबे घेऊन आल्या आणि स्वतः जाऊन प्रियाच्या घरी ते सगळं देऊन आल्या.

होता होता असे २ महिने गेले, संद्याकाळपासून प्रियाच्या पोटात खूप दुखत होत, महिन्याचे ते पाच दिवस तिला नेहमी त्रास होई आणि त्यामुळे तिची नेहमी चिडचिडी होई, त्यांत आज होळीची सुट्टी म्हणून सगळे घरातच होते. दुपारी समीरची आत्या सहकुटुंब जेवायला येणार होती म्हणून घरात लगबग सुरु होती.

प्रियाने पटापट आवरलं नी ती किचनमध्ये मदत करायला शिरणार इतक्यात सासूबाईने तिला थांबवलं "अग आज सण आहे आणि तुझा पहिला दिवस आहे, तू आत येऊ नकोस, तू आपल्या खोलीत जा." प्रियाला थोडं विचित्र वाटलं पण ती काही न बोलता खोलीत जाऊन बसली. जेवणाची वेळ झाली दोन कुटुंब मिळून घरात भरपूर लोक जमा झाली. संद्याकाळी प्रियाचे आई वडील देखील आले. नको नको म्हणत असतात प्रियाला जबरदस्तीने २ पुरणपोळ्या खाऊ घ्यातल्या सासूबाईनी. प्रियाच्या आई बाबांना लेकीचे चाललेले लाड पाहून खूप बर वाटलं. जेवणामध्ये हि अगदी पंचपक्वान्न बनली होती आणि मोदक तर खूपच चविष्ट झाले होते, उरले तर ऑफिसला नेईन अस प्रियाने ठरवलं आणि सासूबाईंना ती तस्स म्हणाली. सासूबाईने तिच्या नकळत 8 मोदक फ्रिजमध्ये ठेवून दिले.

ऑफिसमध्ये मैत्रिणींना मोदक खूप आवडले "काय घातलं आहे गं, एकदम मस्त झालेत" "मला नाही माहिती, समीरच्या आईने केले आहेत. मला त्या monthly cycle चालू असल्यामुळे किचनमध्ये येऊ नको म्हणल्या" "What? are you serious, Are they so orthodox?" "इतके बुरसटलेले विचार आहेत, शी Too Much." मग बराच वेळ जॉइंट फॅमिली मधले त्रास ह्या विषयावर गप्पा रंगल्या.

दुसऱ्या दिवशी समीरचा वाढदिवस होता, नितीन ट्रिपसाठी बाहेर गेला होता. आईबाबांना बाहेर येता येणार नाही म्हणून संद्याकाळी घरीच काहीतरी करू असा समीरने बेत केला होता, पण स्वातीने हट्टाने संद्याकाळच्या 6 शोची तीन तिकीटं बुक केली होती आणि मग डिनरसाठी तिघांच बाहेर जायच ठरलं. प्रियाने हा बेत मैत्रिणींना सांगितला "बहीण कशाला हवी आहे?, कबाबमध्ये हड्डी, सांभाळूण ग बाई" प्रिया काही बोलली नाही.

ऑफिस सुटल्यावर समीर प्रियाला घेऊन स्वातीला थिएटरला भेटणार होता, शोची वेळ झाली तरी स्वातीचा काहीच पत्ता नव्हता. समीरने फोन लावला तर स्वातीने फोन कट केला नी तिचा मेसेज आला कि कॉलेजमध्ये सरांनी थांबवून घेतलं आहे तिला उशीर होईल ती त्यांना डिनरसाठी हॉटेल मध्ये भेटेल. दोघे picture बघून ठरलेल्या हॉटलमध्ये गेले. स्वातीने टेबल आधीच बुक करून ठवलं होत, पण तिचा पत्ता नव्हता. तिचा फोन हि लागत नव्हता. तिचा फक्त ",Going home" इतकाच मेसेज होता. समीरने घरी फोन केला तेव्हा त्याला कळलं कि स्वातीला बर नसल्यामुळे ती घरी आली होती. दोघे जेवून रात्री उशीरा परत आले. घरी आल्यावर प्रियाचे आई बाबा येऊन गेल्याच त्यांना कळलं. दोघांचा दिवस सुरेख गेला होता.

भांडणाच कारण तसं शुल्लक होत. प्रियाला मैत्रिणीच्या घरी समीरला घेउन पार्टीसाठी जायच होत आणि समीरला आत्याकडे पूजेसाठी. घरातले सगळे आधीच जाणार होते प्रियाच मत होत कि सगळे गेले आहेत तर मग आपण नाही गेलो तरी चालण्यासारखं होत आणि इतकंच जर गरजेच असेल तर आपण पार्टीहुन रात्री उशीर आत्याकडे जाऊ. समीरला हे मान्य नव्हतं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये तिने तस्स मैत्रिणींना सांगितलं "शी काय ग प्रिया, how do you manage with this orthodox family?, किती महिन्याने आपण सगळे एकत्र भेटणार आहोत, you are spoiling all the fun." मैत्रिणींने दिलेल्या कानपिचक्या प्रियाच्या डोक्यात फिरू लागल्या, तिने बाहेर येऊन समीरला फोन लावला आणि फोनवर तरातरा बोलू लागली, "प्रत्येकवेळी तुझं आणि तुझ्या घरातल्याच्या मनासारखं का झालं पहिजे?, मला हि मन आहे, हौस-मौज आहे, वाटलं नव्हतं तू हि तुझ्या घरातल्यानंसारखा बुरसटलेल्या विचारांचा असशील, useless" आणि तिने फोन आपटला, डोक दुखतंय सांगून ती हाफ-डे घेउन ती तडक ऑफिसमधून माहेरी निघून आली. प्रियाला अचानक दारात बघून घरातले थोडे चकरावलेच, पण तिच्या मूडवरून काही तरी बिनसलं आहे हे त्यांना कळलं थोडावेळ कोणी काही बोललं नाही. आईने हातात चहाचा कप आणि पोहे दिले "असा वेगळा का लागतोय चहा, पांचट एकदम" "पोह्यात बटाट का नाही टाकलस", " बाळा आपल्या घरात चहा आणि पोहे वर्षानुवर्ष असेच बनत आले आहेत, तूझी चव फक्त बदलली आहे आता. तुला फक्त आता तिकडचं अन्न चविष्ट लागत" आई नी बाबा हसायला लागले. " मी नाही जाणार तिकडे पुन्हा, मला नाही रहायच त्याच्यात" "का ग ताई काय झालं" आईने मायेने पाठीवर हात ठेवला तस्स प्रिया सगळं सांगू लागली. कसं तिची फजिती करायला सासूबाई लग्न झाल्या-झाल्या गावी गेल्या, नी कसं त्यांनी तिला होळी असताना किचन मध्ये येऊन नाही दिल, नी कस समीरची बहीण मध्येमध्ये लुडबुड करते आणि समीरच्या birthday डिनर काय झालं ते, मनात जे जे होत ते सगळं तिने सांगून टाकलं.

" बाळा जे दिसत तेच प्रेत्येक वेळी खरं असत असं नाही, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात", " लग्नानंतर तुला आणि समीरला एकमेकांना समजायला थोडा वेळ मिळवा म्हणून त्या गावी गेल्या होत्या. आंबेे घेऊन आपल्या घरी आल्या होत्या तेव्हा त्या म्हणाल्या होत्या आम्हाला तसआणि होळीच्या वेळी तुला आधीच त्रास होत होता, त्यात इतक्या पाहुण्याचं जेवण करायचं म्हणजे तुला आराम मिळणार नाही, आणि तू नवीन सून तुला जाऊन आराम कर सांगितलं, तरी तू भिडेपोटी जाणार नाहीस, हे त्यांना माहित होत म्हणून त्यांनी ते तसं कारण दिल, तुमच्याकडे आम्ही आलो होतो तेव्हा आमचा हा विषय झाला होता", "आणि राहिला प्रश्न स्वातीचा, अग वेडे, समीर घरी वाढदिवस साजरा करू म्हणत होता आणि तुम्हाला वेळ मिळवा म्हणून तिने ते सगळं केलं होत, आम्ही रात्री तुमच्या घरी आलो होतो तेव्हा स्वातीच खूप कौतुक केलं होत ह्या साठी आम्ही".

"बाळा माणसं, त्याच्या भावना ओळखायला शिक.

प्रियाला तिची चुक कळली तिने समीरला फोन केला आणि सॉरी म्हणून खूप रडली, त्याला नेमकं ती का चिडली आणि आता का रडली ते कळलंच नाही, त्यांच संद्याकली आत्याकडे जायच ठरलं.

आत्याकडे सगळ्यांनी नवीन सूनेकडे उखाणा घे असा हट्ट धरला,

"सासूबाईंच्या रूपाने मिळाली आई नी नणंदेच्या रूपाने बहीण,

समीरच नाव घेते आशीर्वाद द्या अशीच अखंड सौभाग्यवती राहिन"

आत्याकडे घेतलेल्या ह्या उखण्यात उद्या पासून समीर आणि प्रिया चा खरा संसार सुरु होणार हे सगळ्याना जाणवलं..

माणसं आणि नाती तोडणं खूप सोप्प आहे, कठीण आहे ते त्यांना जोडणं आणि जपणं, सगळ्याच गोष्टी काही सांगून करायच्या नसतात, काही समजून आणि उमजून करायच्या असतात..


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational