Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Shwetal Deshmukh

Others


3  

Shwetal Deshmukh

Others


नक्षी असलेली पेटी

नक्षी असलेली पेटी

3 mins 16.1K 3 mins 16.1K

लहानपणी दर दिवाळीला माळा साफ करायचा कारेक्रम असायचा आणि मी अंगाने काटक असल्यामुळे मला माळ्यावर चढवल जायच (Ya ya, don't laugh, I was actually a skinny kid don't go on my current pictures😊). माळ्यावर चढून एका मागून एक बॅग खाली दिली जायची, मग कोपऱ्यात ठेवलेली जुनी पुस्तकं, खेळणी, सामान बरंच काही खाली यायचं. कधी कधी तर अभ्यास केला नाही किंवा पप्पांच ऐकलं नाही म्हणून कचऱ्यात फेकून दिली अशी आमची समजूत असलेली माझी बाहुली किंवा भावाची गाडी हाताला लागायची आणि मग कोण आंनद व्हायचा. सुट्टी असल्यामुळे निदान काही दिवस तरी हि खेळणी खाली राहतील ह्यातच आम्ही खुश असायचो.

जश्या आमच्या बॅगा खाली यायच्या तश्याच आई पप्पांचा जुना संसारहि खाली यायचा, आणि मग नकळत खाली यायच्या त्या जुन्या आठवणी, एका एका वस्तू मागचा इतिहास, ती कोणी घेतली?, का घेतली?, किती वापरली?, नी आणखी बरंच काही. ह्यांतल्या बऱ्याच वस्तू वापरण्यात पलीकडच्या होत्या, पण त्याच्यात जुन्या आठवणी गुंतल्या होत्या आणि म्हणून त्या आईकडून टाकल्याहि जात नव्हत्या, तेव्हा मला आईचं वागण विचित्र वाटायच, पण आता जेव्हा माझं माझ्या माळ्याकडे लक्ष गेलं कि हसू येतं, आम्ही बायका न जरा जास्तीच emotional असतो. आम्ही माणसांबरोबर वस्तुंमध्येहि अडकून पडतो.

त्या सगळ्या वस्तुंमध्ये विशेष लक्ष्यात राहिली. ती एक २ x २ ची एक पेटी. त्या पेटीची चावी आई कडून हरवली होती. वजनाला ती पेटी थोडी जड होती आणि हलवली कि आत काही तरी वस्तू वाजत होती. त्या पेटीच प्रचंड कुतूहल होत आम्हा भावंडाना. आईला लग्नात ती पेटी तिच्या मैत्रिणीने दिली होती. त्याच्यात काय होत हे आईला आठवत हि नव्हतं, आणि त्यामुळे आमच कुतूहल नेहमीच शिगेला पोचलेला असायच. ताईला त्यात जुने दागिने म्हणजे कानातले डूल किंवा ठुशी असेल असं वाटायच तर मला आणि माझ्या लहान भावाला त्या काळी आलेल्या Jumanji movie सारखा काही तरी खेळ असेल असं वाटायच. (ह्या Jumanji च्या वेडा पायी कित्येक रात्री आम्ही जागून माळावरून 'ठक ठक' आवाज येतोय का ऐकण्यात घालवल्या आहेत. ती पेटी दर दिवाळीला खालती यायची आणि पुन्हा चावी नसल्यामुळे वरती जायची. एका वर्षी आम्ही भावंडांनी ठरवलं कि नक्की काय आहे त्या पेटीत ते पहायचचं. आम्ही पेटी घेऊन चावी वाल्याकडे गेलो तर तो आम्हाला म्हणाला कि इतकी छोटी चावी बनवता नाही येणार पेटी तोडायला लागणार.

आम्ही हिरमुसलो आणि परत घरी आलो आणि ह्या वर्षीहि पेटी तशीच वरती चढली. पेटीला बाहेरून सुंदर नक्षी होती म्हणून आई काय ती तोडून देणार नाही ह्याची आम्हाला खात्री होती. दुसर वर्षहि असंच गेली, तिसऱ्या वर्षी आम्ही हिंमत करून आईकडे पेटी तोडण्याचा विषय काढला, आणि अपेक्षेप्रमाणे ती चिडली "पेटी तोडायची आहे तुम्हाला, काय दरिद्री लक्षणं आहेत तुमची, काय करायच आहे तुम्हाला आत काय आहे?, बाहेरून सुंदर आहे तेवढ पुरे नाही का तुम्हाला?", रागाच्या भरात एक धपाटा देखील पडला आणि मग मी आणि भावाने जे भोकांड पसरलं कि विचारू नका. आईचा माझ्या लहान भावावर थोडा जास्त जीव होता आणि काही करून आम्हाला पेटी उघडायची होती त्यामुळे रडायच थांबलास तर याद राख हि ताकीद बिचाऱ्याला आधीच दिली होती. शेवटी हो-नाही करत दिवाळी संपली कि पेटी तोडू ह्याला आई तयार झाली (एरवी सुट्टी लवकर संपली म्हणून नाराज असणारे आम्ही ह्या वर्षी दिवस इतके हळू का चालले आहेत हा विचारत करत होतो).

शेवटी पेटी तोडण्याचा दिवस उगवला. पप्पा चावीवाल्याला घरीच घेऊन आले आणि शेवटी पेटीच झाकण त्याने फोडलं आणि आत काय आहे ते पाहण्यासाठी आम्ही धावलो. आत काही Jumanji नव्हता किंवा ताईचे डूल किंवा ठुशी हि नव्हती, आत पप्पाचे जुने बंद पडलेले चार-पाच पेन नी बंद पडलेली दोन घड्याळ होती, ते पाहून मला नी ताईला रडूच आलं, "झालं समाधान, काय मिळवळत पेटी तोडून" आई इतकंच म्हणाली आणि आत निघून गेली. ती सुंदर नक्षी असलेली पेटी आता काहीच कामाची नव्हती.

आपलं आयुष्य हि थोड्या फार फरकात असंच असतं नाही का? आज जे आपल्या हातात आहे, आपल्यासमोर आहे त्यापेक्षा उद्या काय असणार आहे ह्या विचारात आपण सगळे गुंग होतो आणि त्या उद्याच्या मागे धावू लागतो आणि त्या धावण्याच्या वेगात आजची सुंदर नक्षी असलेली पेटी, त्या मोडक्या पेनांसाठी किंवा घड्याळासाठी गमवून बसतो........


Rate this content
Log in