Shwetal Deshmukh

Tragedy

2  

Shwetal Deshmukh

Tragedy

चूक

चूक

3 mins
1.3K


गेल्या आठवड्यात मला शेजारचा माझा एक मित्र अक्षय भेटायला आला , तसा तो माझ्या पेक्षा वयाने खूप लहान आहे पण आम्ही त्याला मित्राच म्हणतो आणि त्याच्याशी तसेच वागते म्हणून असेल बहुतेक तोही आमच्याशी मोकळेपणे काही गोष्टी शेयर करू शकतो. नुकताच तो नोकरीला लागला असल्यामुळे त्याच्याकडे सांगायला बरच काही असतं. 

आल्यापासून तो मला थोडा डिस्टर्ब वाटत होता, त्याच्याकडे बघून त्याला काहीतरी सांगायचं आहे हे मी ओळखलं. 

कामाची आवराआवर झाल्यावर संध्याकाळी आम्ही गच्चीवर गप्पा मारत बसलो, माझी कामवाली ताई चहा घेऊन वर आली आणि जरा घरी जाऊन येते म्हणाली कारण विचारल्यावर नवरा मुलाला तो खोटं बोलला म्हणून मारतोय आहे म्हणाली, "जास्त शिक्षा करू नका रे, लहान आहे लेकरू, समजवा त्याला" अस म्हणून मी तिला घरी जाऊ दिलं.

 "ताई, लहानांना तुम्ही शिक्षा करू शकता पण मोठ्याने चुका केल्यावर काय करायचं" त्याच्या ह्या अचानक आलेल्या प्रश्नांनी मी चमकले, काय झालं मी अक्षयला विचारलं "ताई दिवाळीची खरेदी करायला मी आणि आई मॉल मध्ये गेलो होतो, लक्ष्मीपूजन असल्यामुळे त्यांना दुकान लवकर close करायचं होत. 

आम्ही शेवटचे customer होतो, मी bill payment counter वर होतो आणि आई मागून आणखी काही सामान घायच आहे का ते बघत येत होती, ती माझ्याकडे आली तेव्हा मी तिला आणखी काही घ्यायचं का विचारलं आणि ती नाही म्हणाली म्हणून मी final payment केली. 

मॉलमधून बाहेर पडत असताना security alarm beep झाला आणि मी चक्रावलो, तिथला representative पुढे आला आणि "सर किसी चीज का लेबल रह गया होगा वापिस दिखा लो" म्हणाला, मी पुन्हा कॉउंटरकडे गेलो आणि सगळ्या bags चेक केल्या पण त्यात काहीच नव्हतं, पुन्हा चेकिंग door कडे आलो,पुन्हा door beep झाला; मात्र एक गोष्ट आमच्या लक्षात आली की door आई पास होतानाच beep होतोय, इतक्यात त्यांचा manager तिथे आला आणि त्याने आईला " मॅडम गलतीसे कुछ रह गया होगा तो चेक कर लो" असं सांगितलं तर आई मेरे पास कुछ नही, तुम्हारा system बिघड गया होगा असं काहीसं म्हणाली पण manager "मैडम आपका पर्स चेक करना पडेगा" असं insist करू लागला आणि आईचा आणि त्या मेनेजरचा वाद सुरू झाला. 

मी आईला करू दे बॅग चेक म्हणालो, तर त्यात माझी सगळी कॅश आहे, दागिने आहेत ती बॅग मी ह्यांच्या हातात का देऊ, म्हणून ती माझ्याशी देखील वाद घालू लागली. शेवटी मी जवळजवळ तिच्या कडून पर्स खेचून त्या manager कडे दिली आणि त्याने ती काउंटर वर रिकामी करायला सुरुवात केली. आईच्या बॅगेत एक छोटी परफ्यूम ची बॉटल सापडली जी बिल मध्ये नव्हती. "५००० ची ती बॉटल मी फक्त बघायला घेतली होती, मला ती नको होती, मी ती पुढच्या काउंटरवर ठेवणार होतो, पण ती बहुतेक राहून गेली असेल" आई manager म्हणाली ह्यावर तो इतकचं म्हणाला "होता है कभी कभी ऐसा मॅडम, अभी इस्का payment कर दो सिर्फ, that's all", "हमको नहीं चाहिए, तुम रखलो वापिस", "मॅडम, नही चाहिए थी, तो पहिले हि याद से निकाल देते, अब ये आपके बॅग मे मिली है तो आपको खरीदनी पडेगी" manager आणि आई मध्ये पुन्हा वाद सुरू झाला, आई bottle ची किंमत भरायला तयार नव्हती आणि manager bottle परत घ्यायला तयार नव्हता. शेवटी मी पेमेंट करायला कार्ड मेनेजरकडे दिलं आणि सामान घेऊन बाहेर पडलो. 

ताई त्या दिवसा पासून मी आईला चुकवतोय. "ताई, सांग न मला, मोठे चुकल्यावर काय करायचं" त्याच्या ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही, मी जरी त्याला एकदा आईशी ह्या विषयावर मोकळेपणे बोल असं जरी सांगितलं असेल तरी मला माहित आहे ते सोप्प नाही. लहानांची चूक झाल्यावर आपण त्यांना रागावतो, मारतो, शिक्षा करतो किवा समजावतो, पण मोठे चुकल्यावर खरंच काय करायच असत ?........



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy