The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Shwetal Deshmukh

Others

3  

Shwetal Deshmukh

Others

बुजगावनं

बुजगावनं

2 mins
16K


सुट्टी पडली कि आजी बरोबर गावाला पळायचं हा क्रम दर वर्षी न चुकता पाळला जायचा त्याची दोन कारण होती, एक तर गावाला खेळायला भरपूर मुलं होती आणि दुसरं कारण म्हणजे आजी. तिच्याकडे सांगायला भरपूर गोष्टी आणि वेळ असायचा, ती रोज नवीन काही तरी शिकवायची.

गप्पांच्या माध्यमातून ती बरंच काही समजवायची हे तेव्हा नाही जाणवलं पण आता जेव्हा केव्हा अडचण येते तेव्हा ते आठवत.

आज तिची अशीच एक गोष्ट आठवली शेतातल्या बुजगावन्याची (scare crow) मला बुजगावन्याला बघून नेहमी वाटायच कि प्राणी ह्याला थोडीच घाबरणार आहेत हा हलत नाही कि पळत नाही नुसता एका जागी उभा असतो ह्यात काय घाबरण्या सारखं. मी एकदा आजीला हे विचारलं तर त्यावर ती म्हणाली कि "भीती पोटी ब्रम्हराक्षस आपण नाही का अंधारात काही नसत तरी अंधाराला घाबरतो, तसेच ते प्राणी हे बुजगावनं उठेल ह्या भीतीने घाबरून शेतात नाही शिरत, माणसांच देखील असच असत ते कधी कधी उगाच घाबरतात, जो पर्यंत तुम्ही जवळ जाणार नाही तुम्हाला कळणार कस, कि हा माणूस आहे कि बुजगावनं"

नवीन project हातात घेताना माझं अगदी असंच झालं होत, गेले 8 वर्ष एका project मध्ये राहून जेव्हा opportunity मिळाली नवीन काही करण्याची तेव्हा मी घाबरले, नवीन रोल आहे, नवीन फील्ड, नवीन माणसं मला हे जमेल का? आधी फक्त एक project with limited scope तर इथे इतके projects, I was really confused मला कसं जमेल, जाउ दे नाही म्हणते तेव्हा आजीच वाक्य आठवल जवळ गेल्या शिवाय कळणार कस, प्रयत्न केल्या शिवाय मिळणार कस.

थोड्याफार प्रमाणात अस आपल्या सगळ्यांच होत, आपण खूप लवकर घाबरतो, थोडा जरी problem आला तर धीर घालवून बसतो, कधी कधी तर उपाय अगदी simple असतो पण तो विचार करण्या आधीच आपण हार मानतो आणि मला जमणार नाही म्हणून मागे फिरतो आणि चांगल्या opportunities घालवून बसतो पण शेवटी आजी म्हणते तेच खरं जवळ गेल्या शिवाय कळणार कसं कि माणूस आहे कि बुजगावनं....


Rate this content
Log in