पदर
पदर


आज बऱ्याच वर्षांनी ती त्याला दिसली, पावसात अंग चोरून दुकानाच्या आडोशाला उभी होती, त्याला वाटलं जाऊन तिच्याशी बोलावं पण मग तिच्या डोक्यावरचा पदर त्याला दिसला आणि तो तिथेच थबकला, शेवटची भेटली होती तेव्हा पुन्हा कधी भेटू नकोस म्हणाली होती ते आठवून तो मागे फिरला.
आज बऱ्याच वर्षांनी तो तिला दिसला, पावसात छत्री घेऊन चालला होता, तिला वाटलं तो येऊन बोलेल, पण तो ओळखही न दाखवत निघुन गेला, तिला वाटलं बहुतेक तिच्या डोक्यावरचा फाटलेला पदर त्याला दिसला होता...