SWATI WAKTE

Inspirational Others

3  

SWATI WAKTE

Inspirational Others

मुन्नाभाई आणि कोरोना

मुन्नाभाई आणि कोरोना

2 mins
265


मुन्नाभाई कोरोना वॉर्डात डिग्री नसताना डॉक्टर म्हणून जातो. तो अश्या वॉर्डात काम करतो तिथे रात्रन्दिवस कोरोना बाधित पेशन्ट येतात. कोरोना ने सगळीकडे थैमान घातले असते. कोरोना पॉझिटिव्ह टेस्ट आल्याचे समजताच लोक मानसिक दृष्टया हादरून जातात. कारण कोरोना म्ह्टल्यावर लोक त्यांना अशी वागणूक देतात की जसे त्यांनी खुप मोठे पाप केले. सर्व घरच्या लोकांची टेस्ट केली जाते. त्यात तेही पॉझिटिव्ह आपल्यामुळे होतील का? ह्या आजारामुळे काही लोक मरण देखील पावतात. आपणही मेलो तर ह्याची काळजी त्या पेशन्ट ला असते? ह्या सर्व काळजीमुळेच त्यांची तबेत अजून खराब होते.

मुन्नाभाई जसा पेशन्ट त्याच्या वॉर्डात येतो. तसे मास्क लावून चांगले म्युझिक लावून डान्स करून त्या पेशन्ट चे स्वागत करतो आणि त्यांना हे पटवून देतो की इथे तुम्ही पेशन्ट नाही हॉलिडे मनवायला आले म्हणून कोरोना झाला, पहिले हे विसरून जा आणि इथे असे पर्यंत एन्जॉय करा. कोरोना किंवा कुठलाही आजारातून लवकर बरे व्हायचे असेल तर हे मनाने खम्बिर रहावे आणि मी ह्या दुखण्यावर मात करेलच असा सकारात्मक विचार करावा. सकरात्मक राहिल्या मुळे आपले अर्धे दुखणे कमी होते. शक्यतोवर स्वतःही पॉझिटिव्ह राहावे आणि दुसऱ्याला ही पॉझिटिव्ह ठेवावे हे तो सर्व पेशन्टला पटवून द्यायचा. सर्व पेशन्ट ला त्यांच्या न आवडते पौष्टिक पदार्थ गोष्टी गोष्टीत खाऊ घालतो. प्रत्येकासाठी सुंदर त्यांच्या आवडीच्या कलर्स चे मास्क देतो. प्रत्येकाची चौकशी करून त्यांच्या चिंता मिटविण्यासाठी जोक सांगतो. 

मुन्नभाई दवाखान्यात सर्व पेशन्ट ला सकाळी उठल्यावर स्वतः सोबत प्रत्येकाला प्राणायाम जमेल ते आसन करायला सांगतो ओंकाराचा जप करायला सांगतो. ध्यान लावायला सांगतो. हेच तो सर्वांकडून संध्याकाळी ही करवून घेतो.. सर्वांना पौस्टिक खाण्याचे महत्व पटवून सांगतो. आणि हे सर्व करता करता पेशन्ट चे दवाखान्यातून घरी जाण्याचा दिवस कधी येतो हे त्या पेशन्ट लाही कळत नाही. 

घरी सोडताना पेशन्ट जवळून प्रॉमिस घेतो की हे सर्व नियम ते घरीही पडतील.. 

एखादा पेशन्ट कोरोनाने गेला तर त्याची वेळ आली होती म्हणून तो गेला हे सर्वांना पटवून सांगतो आणि त्या धक्यातून बाकीच्यांना काढतो.  असा हा मुन्नभाई लोकांच्या मानसिकतेवर इलाज करून त्यांना बरे करतो....


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational