STORYMIRROR

Jyoti gosavi

Fantasy Others

2  

Jyoti gosavi

Fantasy Others

मला पडलेली स्वप्ने

मला पडलेली स्वप्ने

2 mins
95

मला नेहमी छान छान स्वप्ने पडतात. माझ्या स्वप्नात मी एकदा हनुमान जन्म होताना बघितला आहे. म्हणजे प्रत्यक्ष हनुमान उगवत्या सूर्याला पकडायला जातो, हे दृश्य मी स्वप्नात बघितले आहे. माझ्या स्वप्नात मी नेहमी स्वतःला विमान चालवताना बघितले आहे. हवेमध्ये उडताना बघितले आहे. तसेच मला नेहमी गूढ स्वप्ने पडतात. काही सांकेतिक आणि सूचना देणारी स्वप्नदेखील पडतात. माझ्या स्वप्नात नेहमी न पाहिलेला समुद्राचा भाग दिसतो तो अगदी लांबून उसळलेला पिसाळलेला असतो आणि मी खूप दूरवरून त्याला बघत असते. हे स्वप्न मला कमीत कमी सात ते आठ वेळा पडलेले आहे. मला इतर लोकांच्या बाबतीत घडणाऱ्या घटना बऱ्याच वेळा स्वप्नांमध्ये सूचकपणे दिसतात.


जेव्हा लातूरचा भूकंप झाला त्याच्या महिनाभर आधी मला स्वप्नात दिसले होते. एका बिल्डींगखाली दबलेला एका मोठ्या माणसाचा, आणि लहान मुलाचा एकमेकांत अडकलेले दोन सांगाडे मला दिसले होते, आणि खरोखरी लातूर भूकंपानंतर कधीतरी महिन्याभराने पेपरला एक फोटो आला होता, त्यामध्ये खरोखर एक आई आपल्या बाळाला वाचवण्यासाठी त्याच्या अंगावरून ओणवी झोपली होती आणि खरोखरी त्यांचे सांगाडे झाले होते. जसे मला स्वप्नात दिसले तसेच चित्र पेपरला आले होते. अक्षरशः ते चित्र पाहून माझ्या अंगावर काटा आला होता. खूप दिवस मी तो प्रसंग विसरू शकले नव्हते. कदाचित कोणाला अतिशयोक्ती वाटेल परंतु खरोखर हा प्रसंग घडलेला आहे आणि बरेच वेळा मला अशा सूचना मिळतात. जेव्हा त्सुनामी झाली तेव्हादेखील मला खूप उंचउंच लाटा स्वप्नात दिसल्या होत्या.


माझ्या वडिलांना अध्यात्मिक बेस होता त्यांना हे माहित होते. परंतु ते म्हणाले तुझ्यातील अतिंद्रिय शक्ती जागृत करू नकोस कदाचित दुसरे कोणी त्याचा गैरफायदा घेईल. त्यामुळे मी त्या भानगडीत पडले नाही.


आता उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्ना बाबत


माझ्यावर परमेश्वराची खरोखर खूप कृपा आहे. आयुष्यामध्ये ज्या ज्या इच्छा केल्या किंवा जे जे उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिले ते ते सर्व पूर्ण झाले. नर्सिंगला जातानादेखील मी विचार केला होता कोणत्याही क्षेत्रात गेले तर त्या क्षेत्रातल्या उच्च पदावर जायचे आणि ध्यानीमनी नसताना मी मनोविकृतीतज्ज्ञ परिचारिका याचा डिप्लोमा ऍडव्हान्समध्ये केल्यावर आज मी मेट्रन या पदावर नर्सिंगच्या सर्वोच्च पदावर आहे. ओपन कॅटेगरीमध्ये असून मला वरील पद मिळाले. माझ्यापेक्षा दोन्ही असणाऱ्या मोठ्या बहिणी स्टाफ नर्स या पदावर रिटायर झाल्या ,परंतु खरोखरी प्रत्येकवेळी परमेश्वराने त्यावेळी तसेतसे करण्याची बुद्धी दिली आणि आयुष्यातील सारी स्वप्ने साकार झाली. काहीही बाकी राहिले नाही. त्या परमेश्वराची मी कायम ऋणी राहीन


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi story from Fantasy