STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

मला आवडलेले पुस्तक

मला आवडलेले पुस्तक

2 mins
458

मला आवडलेले पुस्तक हा उपक्रमच मला खूप खूप आवडला...मला आवडलेले पुस्तक आहे.. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली 

' फकिरा ' ही कादंबरी.

    मी म्हणेन ही कादंबरी प्रत्येकानेच वाचायला हवी.. आवर्जून वाचायला हवी. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केलेली, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त कादंबरी ,ज्या कादंबरीवर 'फकीरा' चित्रपट ही निघाला आहे..मी ही कादंबरी पाचवेळा वाचली.. माझ्याकडे असलेली ही कादंबरी मी नऊ जनांना वाचायला दिली.. त्यांनीच सांगितलं की, ही कादंबरी म्हणजे जगाला माहित नसलेला इतिहास आहे... वंचीत समाजाचा फार मोठा पराक्रम या कादंबरीत असून.. पारतंत्र्याच्या काळात इंग्रजांविरुद्ध या समाजाने फार मोठा पराक्रम गाजवला पण त्यांची दखल कुण्या इतिहासकारांनी घेतली नाही हे वास्तव ही यातून दिसून येते..

यातील पात्रे ही महापुरूषच होती हे नाकारता येत नाही..

   फकिरा फकीराच होता ... त्यांच्यासाठी कोणती उपमाच नाही..हे एवढंच मी म्हणेन..

विष्णुपंत कुलकर्णी सारखी माणसं या कादंबरीत पहायला मिळतात.. फकिरा,फकीराचे वडील,आई,पत्नी,दौला यांच्या आदर्श.. आदर्शच आहे.. फकिरा फकीराचे स्वंगडी म्हणजे शिवरायांचे मावळेच..!

   बेडसगावच्या रघुनाथरावच्या वाड्यावर रात्री फकिरा जेव्हा चालून जातो तेव्हा.अर्ध्यारात्री रघुनाथरावाची पत्नी आपल्या उपवर मुलींच्या आब्रुची रक्षा करतान फकिरा समोर लोळन घेऊन हात जोडून उभी राहून गयावया करताना म्हणते," तुला जे हवं ते घेऊन जा पण माझ्या या उपवर मुलींच्या अंगाला हात लावू नको.., "त्यांच्या आब्रुची ती भीक मागते तेव्हा फकिरा म्हणतो," आब्रू लुटून कुणाची पोटं भरत नसतात.. आम्हाला ही आई बहीण कळते..आब्रूची किंमत श्रीमतापेक्षा गरीबांना कितीतरी पटीने अधिक कळते..मी इथे अब्रू लुटायला नाही जे अन्न अन्न म्हणून तडफडून मरत आहेत, ज्यांच्या चुली कितीतरी दिवसांपासून पेटल्याच नाहीत.. जे नुसते पाणी पिऊन जगत आहेत... ज्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही.. त्यांना जगवण्यासाठी मी आलोय..."

    एवढा महान विचार या कादंबरीत अण्णाभाऊंनी दिलाय.. अजूनही कुण्या साहित्यिकांना ते जमलं नाही एवढे मात्र नक्की...

म्हणून मी म्हणेन. सूर्य सूर्यच असतो त्याच्या प्रकाशाची महती शब्दात कशी वर्णावी..! म्हणून मी म्हणेन फकिरा मला जीवापाड आवडली.. तुम्ही ही ती वाचा.. आवर्जून वाचा इतरांना वाचायला सांगा, खूप खूप आवडेल... अण्णाभाऊंचे समग्र वाङमय तुम्ही वाचाल..एवढी मी तुम्हाला हमी देतो... कारण मी ते वाचलय.. अजूनही वाचतोय..

  आण्णाभाऊंची फकिरा जगायला नी जगवायला शिकवतेय एवढं मी म्हणेन...

त्या फकिरांना माझा कोटी कोटी प्रणाम...

अण्णांच्या लेखणीस सलाम...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational