मला आई व्हायचय-भाग ६
मला आई व्हायचय-भाग ६


सकाळी सगळे चहा पीत बसले होते, तेवढ्यातच इंदू बोलली,"मला तुम्हाला काही सांगायचं आहे. तुम्ही मला इकडे राहायला जागा दिली, माझी आणि माझ्या बाळाची काळजी घेत आहात त्यासाठी मी तुमची खूप आभारी आहे. म्हणुणच मला असं वाटतं कि, जर मला काही झालं तर माझ्या बाळाची जबाबदारी तुम्ही घ्या". इंदूचं हे बोलणं ऐकून सगळे तिच्याकडे आश्चर्याने बघू लागले. "अगं इंदू, तू हे काय बोलत आहेस? काही होणार नाही तुला.", रियाचे सासू सासरे इंदूला बोलले. "हो, मला माहित आहे, पण..." "आता ह्यापुढे असं काही बोलू नकोस", रिया इंदूला बोलली.
घरचे सगळे इंदूची खूप काळजी घेत होते. रिया आणि नचिकेतला अजून देखील योग्य ती बाई सापडली नव्हती surrogacy साठी. पण ते दोघंही इंदुकडे बघून खुश होते. हळू हळू ते देखील त्या विचारातून बाहेर पडायला लागले. आज , घरी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. इंदूचा नववा महिना सुरु झाला होता. रियाने इंदूला खूप सुंदर सजवले होते. रियाच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. इंदू देखील आज खूप खुश होती. सगळ्यांचं तिच्यावर आणि तिच्या बाळावर असलेलं प्रेम बघून तिचे डोळे भरून आले. कार्यक्रम संपला आणि इंदू तिच्या खोलीत जातच होती कि, तिला तिच्या बाळाची हालचाल जाणवली. तिने लगेच रियाला बोलावलं . रियाने पण, तिच्या पोटावर हाथ ठेवल्यार तिला हि त्या बाळाची हालचाल जाणवली. रिया एकदम भारावून गेली. "चल, खूप उशीर झाला आहे, आता झोप बघू. काही गरज लागली कि हाक मार". एवढं बोलून रिया त्या खोलीतून निघून गेली.
"आई ग...रिया ताई... नचिकेत दादा..", इंदू जोर जोरात ओरडायला लागली. तिला कळा यायला लागल्या होत्या. रिया आणि नचिकेतने लगेच हॉस्पिटल मध्ये फोन केला आणि तिला घेऊन निघाले. डॉक्टरांनी लगेच इंदूला operation theatre मध्ये नेले. जवळ जवळ एक तासा नंतर डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या हातात गोड मुलगी होती. दिसायला एकदम गोरीपान. तिचे डोळे पण मोठे मोठे आणि लाल लाल गाल. नचिकेतने तिला हातात घेतले. त्या मुलीकडे बघून नचिकेत आणि रिया भारावून गेले होते. "डॉक्टर , इंदू कशी आहे?", रियाने विचारले. "तुम्ही जरा माझ्या केबिन मध्ये या. तुमच्याशी काही बोलायचं आहे", डॉक्टर रियाला बोलले. रिया आणि नचिकेत घाबरत घाबरत डॉक्टर कडे गेले. "operation करायच्या पूर्वी थोडे कॉम्प्लिकेशन्स आले होते. तिला आम्ही सांगितलं होतं , पण तिने आम्हाला, तुम्हाला सांगण्यास मनाई केली होती. तिने आम्हाला सांगितलं होतं कि, काहीही झालं तरी या बाळाला वाचवा. माझ्या जीवाची पर्वा करू नका. कारण, हे बाळ तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे". डॉक्टरचं हे बोलणं ऐकून रिया स्तब्ध झाली. "आता ती कशी आहे डॉक्टर?", नचिकेतने विचारले. "I am sorry, she is no more". हे वाक्य ऐकून नचिकेत आणि रियावर जणू काही खूप मोठा आभाळ कोसळला. "आपण राहिलेली formality पूर्ण करून घेऊ या. या मुलीच्या adoption ची प्रोसेस पण आपण सुरु करूया", डॉक्टरने त्या दोघांना सांगितले. त्या दोघांनी स्वतःला सावरलं आणि घरी परतले. घरी , रियाचे सासू सासरे वाट बघत होते. "अगं, इंदू कशी आहे? आणि तिची मुलगी कशी आहे?", सासूबाईंनी रियाला विचारले. "इंदू आता ह्या जगात नाही...". एवढं बोलून रिया जोर जोरात रडायला लागली. तिला नचिकेतने सावरलं.
"रिया ताई, मला खात्री आहे. तुम्ही सगळे मिळून माझ्या मुलीचा चांगला सांभाळ कराल. तुला आई व्हायच होतं ना. बघ, देवाने तुझ्या पदरात किती सुंदर मुलगी टाकली आहे". रिया अचानक जागी झाली. इंदू तिच्याशी स्वप्नात बोलत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी, रिया आणि नचिकेत दोघं लगेच हॉस्पिटल मध्ये गेले, सगळ्या formalities पूर्ण केल्या आणि त्या मुलीला घरी घेऊन आले. रिया जेव्हा एकटीच त्या मुलीसोबत खेळत होती, तेव्हा त्या मुलीने तिचं बोट धरलं. त्याच क्षणी रियाला जाणवलं कि आता ती एक आई आहे आणि तिचा आनंद गगनाला भिडणारा होता.
समाप्त...