STORYMIRROR

Sonam Rathore

Tragedy

3  

Sonam Rathore

Tragedy

मला आई व्हायचय-भाग २

मला आई व्हायचय-भाग २

2 mins
2.1K


"रिया.. रिया.. अगं उठ आता. सकाळ झाली बघ. " रियाची सासूबाई तिला उठवत होती. रिया घाई घाईने झोपेतून जागी झाली आणि सासूबाई कडे बघताच तिला रडू कोसळले. " आई.. अहो आम्ही असा काय गुन्हा केला कि देवाने आम्हाला इतकी मोठी शिक्षा दिली.." सासूबाईंच्या पण डोळ्यात पाणी दाटून आलं , पण त्या धीर देत रियाला म्हणाल्या " रिया.. झालं गेलं ते विसरून जा आता. बघूया काय करता येईल ते. तू उठ आता आणि ऑफिसला जा." रिया कशी बशी उठून ऑफिसला जाण्यासाठी तयार झाली. बाहेर नचिकेत आणि सासू सासरे नाष्ट्या साठी तिची वाट बघत होते. तीने एक घास तोंडात घेतला आणि पुन्हा तिला रडू कोसळले. ती स्वतःलाच यासाठी गुन्हेगार मानत होती. नचिकेतने तिला गप्प केले आणि ते दोघे जाण्यासाठी निघाले. जाताना दोघेही एकमेकांशी काही बोलले नाही. दोघांच्या मनात विचारांचा गोंधळ उडालेला होता. नचिकेतने रियाला ऑफिसला ड्रॉप केले आणि म्हणाला, " रिया.. I love you . सगळं ठीक होणार आहे" रियाच्या चेहऱ्यावर थोडं हसू आलं आणि ती निघून गेली.

संध्याकाळी जेव्हा रिया आणि नचिकेत घरी परतले तेव्हा बघतात तर काय.. त्यांच्या घरात कसली तरी पूजा मांडलेली होती आणि घरात पंडित आले होते. " आई.. अगं हे काय आहे.???" नचिकेतने आईला विचारले. नचिकेतची आई त्याला कोपऱ्यात घेऊन गेली आणि म्हणाली, "आता एक शब्दही बोलू नकोस. त

ुझ्या मनू आत्यानेच हा पूजेचा घाट घातला आहे. तुम्ही दोघं चुपचाप इकडे बसा. " "अगं आई.. पण.." . मोहिनी (मनू) हि नचिकेतच्या वडिलांची एकुलती एक बहीण. खूप धार्मिक स्री. तिला वाटत होते कि रिया आणि नचिकेत बरोबर जे काही घडलं ते या पूजेने सगळं नीट होऊन जाईल. अर्थात नचिकेत, रिया आणि तिच्या सासू सासऱ्यांना हे सगळं पटत नव्हतं, पण ती मोठी होती आणि तिचा मान म्हणून सगळ्यांना ऐकावं लागलं. पूजा संपली आणि आत्याने रियाला स्वतः जवळ बोलावून घेतले, " बरं का रिया.. पूजा झाली ना.. आता बघ , सगळं कसं नीट होऊन जाईल. थोड्याच दिवसात या घरात पाळणा हलेल " रियाला मात्र काय बोलावं ते कळत नव्हते. तिने आत्याचा निरोप घेतला आणि रूम मध्ये गेली. नचिकेतपण तिच्या मागे रूम मध्ये आला.

रिया रूम मध्ये बसून होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. नचिकेत तिच्या जवळ आला आणि तिला मिठीत घेतलं,"रिया.. कसला विचार करत आहेस ? " रियाने वर बघितले आणि बोलली, "नचिकेत आपण Surrogacy साठी जाऊया का? मला माहित आहे हा खूप मोठा चर्चेचा विषय होणार आहे , पण मला बाळ हवं आहे. " नचिकेतने लगेच रियाकडे बघितले आणि म्हणाला " आपण या विषयावर उद्या सकाळी बोलूया " त्या रात्री दोघांच्याहि मनात विचारांचा गोंधळ उडालेला होता.

तुम्हाला काय वाटतं, त्यांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकेल का???

क्रमशः


Rate this content
Log in