मला आई व्हायचय-भाग ५
मला आई व्हायचय-भाग ५


"Thank you नचिकेत. एकदम कसं माझ्या मनातलं बोललास तू", रिया हसून नचिकेतला बोलली. "अगं, त्यात Thank you काय. माझी बायको आहेस तू. आणि त्या वेळी मला जे योग्य वाटलं तेच मी बोललो", नचिकेत रियाला बोलला. इंदू खोलीत आराम करत होती. तिच्या चेहऱ्यावर कसलीच चिंता दिसत नव्हती. एकदम गाढ झोपेत होती ती. तिला बघून रियाला खूप आनंद झाला. पण, तिला मनात हि गोष्ट पण सतावत होती कि, आजदेखील लोकं इतकी क्रूर कशी असू शकतात.
संध्याकाळी सगळे एकत्र बसून जेवत होते. तेवढ्यात मनू आत्या आली. "काय ग रिया, हे मी काय ऐकत आहे? तुम्ही surrogacy चा प्लॅन करत आहात म्हणे. आणि हीच का ती मुलगी , जी तुम्हाला मुल देणार आहे?", मनू आत्याने इंदू कडे बोट दाखवलं. "अगं आत्या, काही काय बोलत सुटली आहेस तू", नचिकेत मनू आत्याला बोलला. इंदू हे सगळं ऐकत होती, आणि लगेच तिने खोलीकडे धाव घेतला. तिच्यामागे रिया देखील गेली. "तुम्ही मला इथे कशासाठी आणलं आहे? खरं सांगा मला.", इंदूने रियाला जाब विचारलं. ती खूप रागात होती. "अगं इंदू, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. तू जे विचार करत आहेस, तसं काही नाही", रियाने इंदूची समज काढायचा प्रयत्न केला. इंदू मात्र रडायला लागली, "मी माझं बाळ कुणालाही देणार नाही. मी आताच निघून जाते इकडून". "थांब इंदू. माझंच चुकलं. नचिकेतने मला सगळं काही सांगितलं आहे. तू इथेच रहा. हि लोकं खूप चांगली आहेत. तुझी आणि तुझ्या बाळाची व्यवस्थित काळजी घेतील", मनू आत्या इंदूला बोलली. हे ऐकून इंदू शांत झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी इंदू आणि रिया बोलत बसले होते. इंदूने काल संध्याकाळी घडलेल्या प्रकाराबद्दल रियाला विचारले, तेव्हा तिने तिला सगळं काही सांगितलं, आणि रडू लागली. इंदूने रियाला धीर दिला. त्या रात्री मात्र, इंदूला शांतपणे झोप लागली नाही. तिच्या मनात विचारांचा गोंधळ उडाला होता. तिने आज एक निर्णय घेतला होता आणि ती उद्या सगळ्यांना सांगणार होती.
तर तुम्हाला काय वाटतं? काय असेल हा निर्णय?
क्रमशः