मला आई व्हायचय- भाग ३
मला आई व्हायचय- भाग ३
सकाळी सगळे एकत्र बसून चहा पीत होते, शांतता होती आणि तेवढ्यात रिया बोलली, "आई , बाबा आम्हाला तुमच्यासोबत काही बोलायचं आहे. आम्ही surrogacy चा विचार करत आहोत". हे ऐकून रियाच्या सासू सासऱ्याने चहाचा कप खाली ठेवला आणि बोलले, "तुम्हाला अजून काही मार्ग नाही दिसला का?". " सध्यातरी आम्हाला हाच मार्ग योग्य वाटत आहे. आमचं स्वतःचा मुल आम्हाला पाहिजे, आणि IVF खूप महागात पडेल." नचिकेतने आई बाबाना सांगितले. "ते सर्व ठीक आहे रे, पण तुम्ही कोणाला तयार करणार आहात? आणि असल्या गोष्टींमध्ये खूप सावधगिरी बाळगायला पाहिजे. शिवाय, नंतर जर त्या बाईला आपण आपल्याकडे ठेवलं, तर आजू बाजू च्या लोकांना आपण काय उत्तर द्यायचं?" बाबा नचिकेतला बोलले. "आम्ही आज त्यासाठीच डॉक्टरांकडे जात आहोत. ते सर्व माहिती देतील. आपण बघूया काय करता येईल पुढे. आणि लोकांचा एवढा विचार नका करू. मी बघून घेईल काय सांगायचं ते." नचिकेत बाबाना बोलला. "ठीक आहे. तुम्हाला जसं पटत आहे, तसं करा." आई नचिकेतला बोलली.
रिया आणि नचिकेत डॉक्टरांकडे जायला निघाले. "आई बाबानी किती शांतपणे आणि समजूतदारपणे आपलं बोलणं ऐकलं . मला तर वाटलं कि त्यांना हे पटणार नाही." रिया नचिकेतला बोलली. "ते समजूतदार आहे ग, पण, त्यांना हे हि वाटत आहे कि ह्या परिस्थितीला आपण सगळ्यांनी कसं सामोरे जायचं. पण एकदाकि सगळं व्यवस्थित पार पडलं तर, त्यांच्या मनातील ह्या दुविधेचं पण निरसन होऊन जाईल.", नचिकेत रियाला बोलला. दोघही आज खुश होते. त्यांनी एका मंदिरा समोर गाडी थांबवली आणि दर्शन करायला गेले. ते दर्शन करून परत येतच होते कि , त्यांना मंदिराच्या पायथ्याशी लोकांचा जमाव दिसला. "अरे, कोणी तरी हिला डॉक्टरांकडे घेऊन जा", त्या जमावातील एकजण बोलला. "नको रे, आपण कशाला ह्या भानगडीत पडायचं? पोलिसांनी आपल्याला जाब विचारल्यावर आपण काय करायचा?", त्या जमावातील अजून एकजण बोलला. हे सगळं नचिकेत आणि रिया बघत आणि ऐकत होते, आणि त्या दोघांना त्या लोकांचा खूप राग आला. "सरका, सगळे बाजूला व्हा. आम्ही घेऊन जातो हिला", नचिकेतने त्या जमावाला धक्का दिला आणि बघतो तर काय, एक मुलगी खरचटलेल्या अवस्थेत बेशुद्ध पडली होती. तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूने खूप रक्त वाहत होतं. तिचे कपडे देखील फाटले होते. रिया आणि नचिकेतने लगेच त्या मुलीला आपल्या कार मध्ये ठेवलं आणि डॉक्टरांकडे निघाले.
"आता ज्या मुलीला आत घेऊन गेले, तिच्या सोबत कोण आलं आहे? डॉक्टरांनी बोलावलं आहे." नर्सने त्या रूम मध्ये बसलेल्या सगळ्याना विचारलं. "आम्ही आहोत. काही प्रॉब्लेम झाला आहे का? ती ठीक आहे ना? " रिया ने त्या नर्सला विचारले. "तुम्ही आत जा. डॉक्टर तुम्हाला सर्व सांगतील. " रिया आणि नचिकेत पूर्णपणे घाबरले होते. ते डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेले आणि डॉक्टरांनी त्यांनी बसायला सांगितले. " तुम्ही हिला ओळखता का? " डॉक्टरांनी त्या दोघांना विचारले. "नाही. आम्हाला आज सकाळी, हि मंदिराच्या पायथ्याशी अश्या अवस्थेत सापडली. ती ठीक आहे ना ?" नचिकेतने डॉक्टरांना विचारले. "तुम्ही आज एक नाही दोन जीवांचा प्राण वाचवला आहे. ती गरोदर आहे. आणि माझ्या मते तिच्यासोबत जबरदस्तीचा प्रयत्न झाला असावा,आणि तिने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला असावा. म्हणूनच ती तुम्हाला अश्या अवस्थेत सापडली. मी सगळ्या test केल्या आहेत, ती आणि तिचं बाळ सुखरूप आहे. बाकीची माहिती तीच देऊ शकते शुद्धीवर आल्यानंतर". डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून रिया आणि नचिकेतला खूप वाईट वाटले. पण त्यांना आनंदहि होतं कि, त्यांच्यामुळे ती मुलगी आणि तिचं बाळ वाचले होते. "मॅडम, ती मुलगी शुद्धीवर आली आहे. पण ती खुप घाबरलेली आहे", नर्स डॉक्टरांना बोलली. ती मुलगी जोर जोरात ओरडत होती ,"वाचवा मला. वाचवा." डॉक्टरांनी तिला कसं बस शांत केलं आणि तिला सांगितलं देखील कि तिचं बाळ पण सुखरूप आहे. डॉक्टरांनी तिला तिचं नाव विचारलं. ती म्हणाली , "इंद्रायणी राऊत". हे नाव ऐकून रियाला धक्का बसला आणि ती लगेच म्हणाली " इंदू, तू?" ते ऐकून त्या मुलीला हि आश्चर्य झाला आणि त्या रूम मध्ये एक शांतता पसरली.
तुम्हाला काय वाटतं? कोण आहे हि इंदू, आणि तिचा रियाशी काय संबंध आहे.
क्रमशः