मला आई व्हायचय-भाग १
मला आई व्हायचय-भाग १
"वाचवा.. वाचवा.." रिया मध्यरात्री एकटीच रस्त्यावर पळत होती. तिच्या जीवाला धोका होता आणि ती गरोदर होती. पळता पळता तिचा पाय घसरला आणि ती पोटावर पडली. ती जोरात किंचाळली आणि गादीवर उठून बसली. तिच्या लक्षात आलं कि हे स्वप्न आहे. तिच्या शेजारी झोपलेला नचिकेत सुद्धा घाबरून जागा झाला. पण रियाचा हाथ रक्ताने माखलेला होता. तिचे कपडे आणि चादर देखील रक्ताने माखली होती. तिने लगेच बाथरूम कडे धाव घेतली आणि स्वतःला स्वच्छ करू लागली. जोर जोरात रडायला लागली. हे तिचं दुसरं miscarriage होतं. नचिकेतने तिला हळुवारपणे जवळ घेतले आणि तिची समजूत काढायला लागला. "रिया, मी आहे ना तुझ्यासोबत . आपण काही ना काही तरी मार्ग काढू ह्याच्यावर. तू शांत हो अगोदर".
रिया आणि नचिकेत. दोघांची ओळख एका कंपनीच्या पार्टी मध्ये झाली होती. रिया तेव्हा एका कंपनी मध्ये HR होती. नचिकेत पण एका कंपनी मध्ये मार्केटिंग हेड होता. हळू हळू हि ओळख प्रेमात बदलली आणि त्या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांचीही फॅमिली सुशिक्षित असल्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम नाही झाला. रिया आणि नचिकेत दोघांचेही खूप मोठी स्वप्न होती. नचिकेत स्वतःचा business start करण्याच्या मागे होता. लग्नाला दोन वर्ष होऊन गेली होती आणि घरच्यांची बाळासाठी मागणी सुरु झाली . त्या दोघांना मात्र सध्या त्यांच
ी careers खूप महत्वाची होती. काही दिवसांनी कळाले कि रिया गरोदर आहे. घरच्यांना तर खूप आनंद झाला, पण नचिकेत आणि रिया ह्यांच्यावर जणू आभाळच कोसळला. त्या दोघांनी Abortion करण्याचा निर्णय घेतला. घरचे मात्र खूप दुखावले. अजून एक वर्ष असाच निघून गेला. रियाचं प्रोमोशन झालं आणि नचिकेतला सुद्धा त्याच्या business साठी investor मिळाला. दोघांनाही त्यांची स्वप्न पूर्ण होताना दिसत होती. त्या चार वर्षांमध्ये रिया पुन्हा एकदा गरोदर होती आणि पुन्हा एकदा त्यांनी Abortion चा निर्णय घेतला होता.
आज लग्न होऊन नऊ वर्ष झाली. ते दोघंही आता स्वतःच्या careers मध्ये well settled होते. पण दोघांच्या मनात मात्र एकच उणीव होती , ती म्हणजे बाळाची. त्यांनी बाळासाठी खूप प्रयत्न केले. मागच्या वर्षी रिया गरोदरहि राहिली पण, दुसऱ्या महिन्यातच तिचं miscarriage झालं. आणि आज देखील तीच परिस्थिती त्या दोघांसमोर परत आली. ह्या सगळ्या प्रकारामुळे रिया पूर्णपणे खचून गेली होती. नचिकेत सुद्धा खूप दुःखी होता. दुसऱ्या दिवशी ते डॉक्टर कडे चेकअप साठी गेले आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. "रिया आता कधीच आई होऊ शकत नाही" हे वाक्य सारखं सारखं रियाच्या कानावर पडायला लागले आणि ती चक्कर येऊन खाली पडली . नचिकेत मात्र तिकडेच स्तब्ध होऊन रियाकडे बघत राहिला….
क्रमशः