akshata alias shubhada Tirodkar

Comedy

4  

akshata alias shubhada Tirodkar

Comedy

मित्र

मित्र

3 mins
487


अकबर आणि बिरबलाची जोडी तर खूप प्रसिद्ध आहे आणि ह्या जोडीने आधुनिक जगात प्रवेश केला आहे कॉन्फरेन्स रूम मध्ये सगळे राज्याचे सेवक बसले होते मध्यभागी अकबर राजा बसले होते आणि त्याच्या शेजारी बिरबल राज्याच्या विविध विषयावर चर्चा सुरु होती सगळेच सेवक आणि मुख्य राजा कॉर्पोरेट ड्रेस मध्ये होते 

अधून मधून सल्लागारांची गूगल मीट द्वारे भेट होत होती काही विशेष मंडळी बाहेर राज्यातून आली होती त्यामुळे हि सभा अत्यंत महत्व पूर्ण होती अकबर राजा आणि बिरबल प्रत्येकाचे म्हणे ऐकून घेत होते. खाना पाण्याचीही सोय केली होती. खास राज दरबारातील आचारी कडून सँडविच आणि लस्सी तयार केली होती 

राजाच्या मनगटावर रोलेक्स चे घडयाळ असे काही चमकत होते आणि राजा मुदामहुन ते हात इशारे द्वारा सगळ्याच्या नजरेस आणत होता. अचानक राजा जे लक्ष घड्यळाला कडे गेले आणि राजा च्या चेहेऱ्याचा रंग बदला हे बिरबल च्या नजरेस आले तो मनातल्या मनात म्हणला - 

"नक्कीच काही तरी गडबड आहे "

चर्चा सत्र रंगात आले पण अकबरचे लक्ष भरकटले आहे हे बिरबल च्या लक्षात आले. त्याने इशाऱ्याने विचारले पण अकबर काही सांगण्यास असमर्थ ठरले. एकदाची दोन तास ठरवलेली सभा ३ तासाने संपली सगळी मंडळी उठून केली अकबर मात्र तिथेच बसून राहिला हे पाहून बिरबल ने विचारले 

"काय महाराज घरी नाही जायचे आणि एवढे घाबरलेले का आहात आपण "?

बिरबल कडे पाहत अकबर ने म्हटले "काय सांगू आता खैर नाही माझी बिरबल जरा हा फोन बघ "

बिरबल ने फोन पहिला तर महाराणी चे २५ मिस कॉल होते ते पाहून "महाराज का घेतला नाही तुम्ही फोन थोडा वेळ बोला असता तर काय प्रॉब्लेम झाला असता "

"प्रॉब्लेम झाला असता म्हणून तर नाही घेतला "

"म्हणजे "

"अरे महाराणी ने मला राज्यात आलेल्या सेल मध्ये जाऊया म्हून सांगितले होते मीही हो सांगितले पण सभा एव्हडा वेळ चालेल हे कुठे माहित होते आणि जर मी तिला येऊ शकत नाही असे सांगितलेले तर मग ती थोडीच ऐकली असती आता काय करू मी "?

अकबर राजा चा रडवेला चेहेरा पाहून बिरबल हसू येत होत पण बिरबल ने हसू आवारत म्हण्टले ए"वढेच ना मग आता घेऊन जा "

"नाही नाही असे मी सांगितले तर अजून आरडा ओरड करेल "

बिरबल थोडा शांत राहिला व म्हणाला "महाराज चला ""

"पण कुठे"? 

"सेल मध्ये "

दोघे हि सेल मध्ये येतात तिथे कपड्या पासून दागिण्या प्रय्तनची दुकाने होती दोघी दागिन्यांच्या दुकानात शिरतात दुकान वाला जोधपुरी दागिने विकत होता त्याला पाहत बिरबल म्हणाला 

"आपके पास लेटेस्ट कोई गेहन हें तो दिखाई ये जो सबसे अनोखा होना चाहिये "

त्यानुसार त्या दुकानातून खरेदी करून राजा ना धीर देत बिरबल आपल्या घरी तर अकबर राज महालात पोहचला महाराणी रागात रूम मध्ये बसली होती 

"महाराणी महाराणी ऐकावे महाराणी माफी करा मी तुम्हला सेल मध्ये नेऊ नाही शकलो पण मी मात्र तिथे गेलो होतो खास तुमच्यासाठी हे घया पहा तरी नक्कीच आवडेल तुम्हला "

महाराणी रागात होती तरी पण एक नजर पिशवी कडे गेली नक्कीच काहीतरी चांगलं आहे आत हे बाहेरून दिसत होत महाराणी ने लगेच पिशवी हातात घेतली आणि उघडून पहिली आणि रागावलेला चेहेरा एक'दम हसू लागला हे पाहून अकबर राजा हि खुश झाला 

"वाह राजा किती सुंदर आहे नेकलेस पण तुम्ही कधी गेलात ?

"तुम्हला कशाला कष्ट म्हून मीच गेलो आणि फोन हि नाही घेतला कसा वाटलं सुरप्रायझ "

"खूप मस्त राजा "

"मग आता राग गेला ना "

"हो तर मला वाटलं होत कि तुम्ही मला विसलरलात पण नाही तुम्हला सेल मध्ये जाणे लक्षात होते "

"मग अरे काम वैगेरे चालूच राहील पण राणी ला कसं विसरेन "

"थँक क्यू राजा "

"बरं मी आतच आलो जरा महत्वाचा फोन करून येतो अकबर राजा ने लगेच बिरबल ला फोन केला 

"हॅलो बिरबल माझ्या मित्रा बिरबला "

"महाराज मित्र "

"हो बिरबल तू माझा राजदरबारी सहकारी असलास तरी प्रत्येक संकटातून मला मित्रा प्रमाणे बाहेर काढतोस खरंच मी खूप नशीबवान आहे कि तुच्या सारखा सल्लागार जे माझ्या राज्यचे हित पहातो आणि मित्र म्हूणन मला वयक्तिक मदत करतो 

"पुरे पुरे महाराजा स्तुती खूप झाली ""

"नाही खरचं मित्रा "

""बरं महाराज संकट टळलं तर "

"हो ना नाही तर माझी खैर नव्हती "

"पण महाराज तुम्ही राजा असून कसले घाबरता "

"बाबा रे माझ्या मित्रा आज सुटलो तिच्या तावडीतून राजा असेल रे तुमच्या साठी तिचा तर मी पती आहे ना" 


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy