SWATI WAKTE

Inspirational

3  

SWATI WAKTE

Inspirational

मित्र

मित्र

2 mins
346


रोहन हा अतिशय एकलकोंडा मुलगा असतो. तो आठवीत शिकत असतो. त्याला कुणीही मित्र नसतात. तो एकटाच वर्गात राहतो. मधल्या सुट्टीत जेव्हा सर्व मुले सोबत डब्बा खातात तेव्हा रोहन एकटाच डब्बा खातो. सर्व मुलं जेव्हा ग्राउंड वर खेळायला जातात तेव्हा रोहन आपले गृहपाठ शालेतच पूर्ण करतो.त्याचे आई, बाबा त्याला खुप समजावतात अरे रोहन मुलांसोबत राहत जा.. सर्वांना मदत कर.. मिळून मिसळून रहा. पण रोहन त्याच्या आईवडिलांचेही काहीच ऐकत नाही. घरी गेल्यावरही तो त्याच्याच जगात असतो. त्याला शेजारीही मित्र नसतात. रोहनच्या शाळेत एक नविन मुलगा प्रवेश घेतो. त्याचे नाव राम असते.. तो रोहन एकटाच बसत असल्यामुळे तो रोहन जवळ जाऊन बसतो. तो अतिशय मिळून मिसळून राहणारा असतो. तो वर्गात आल्यावर सर्वांशी ओळख करून घेतो. तो रोहन ला स्वतःचे नाव सांगून त्याचे नाव विचारतो तर रोहन त्याला नाव सांगून फक्त विचारलेल्या प्रश्नाचीच उत्तरे देतो..मधली सुट्टी होते तेव्हा सर्व मुले मिळून डब्बा खातात तर ते राम ला बोलावतात. रामने सर्वांशी मैत्री पहिल्याच दिवशी केल्यामुळे त्याला बोलावतात पण राम त्यांना सांगतो की मी डब्बा विसरलो सर्व मुलं त्याला स्वतः च्या डब्ब्यात खाण्याचा आग्रह करतात पण तो नको म्हणतो व जाग्यावरच स्वतः चे काम करतो. रोहन तिथेच डब्बा खातो पण त्याला खायला बोलावतंही नाही. राम स्वतःचे काम करता करता रोहनशी बोलतो पण रोहन काही हॊ नाही च्या पलीकडे बोलत नाही.. सर्वांचा डब्बा खाणे झाल्या वर मात्र राम सर्वांसोबत खेळायला जातो तेव्हा रोहनलाही आग्रह करतो. पण रोहन नको म्हणतो. रोहन रोजच टिफिन आणत नाही सर्व मुले रोज त्याला त्यांच्या डब्ब्यात खायला सांगतात तो नकोच म्हणतो.. जवळपास पंधरा दिवस रोहन बघतो शेवटी तो पहिल्यांदा रामला विचारतो तु डब्बा का आणत नाही.. हे ऐकून राम म्हणतो तु पहिल्यांदा स्वतःहून बोलला म्हणून तुला सांगतो मला आई नाही आहे.. माझी आई माझा जन्म झाल्यावरच देवाघरी गेली माझ्या बाबांनी दुसरे लग्न केले. मला सावत्र आई आहे.. ती मला उठून डब्बा देत नाही.. मी रात्रीचे जे उरले असेल ते खाऊन शाळेत येतो आणि घरी गेल्यावर सकाळचे उरलेले खातो. हे ऐकून रोहनला फार दुःख होते.. तो त्याला जबरदस्तीने स्वतःच्या डब्ब्यात खाण्याची विनंती करतो नाहीतर मीही जेवणार नाही असे सांगतो हे ऐकून राम त्याच्या डब्ब्यात खातो आणि दुसऱ्या दिवशीपासून रोहन आईला सांगतो की थोडा जास्त आई कारण विचारते तर तो आईला रामची गोष्ट आईला रामविषयी वाईट वाटते पण रोहनला त्त्याचा पहिला मित्र मिळाल्याचा खुप आनंद होतो.. राम रोहनशी घनिष्ठ मैत्री करतो त्याचा डब्बाही खातो आणि त्याला बाकी मुलांशीही मैत्री करायला लावतो.. रोहन राममुळे दिवसेंदिवस खुलत जातो. एव्हडेच नाही तर शाळेतल्या स्पर्धेत भागही घ्यायला लावतो.. अश्या प्रकारे मैत्रीमुळे रोहनचे व्यक्तिमत्व खुलते व आई बाबाही खुप खुश होतात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational