Khajabhai Bagwan

Horror Crime

3  

Khajabhai Bagwan

Horror Crime

मी येतलंय - भाग 1

मी येतलंय - भाग 1

4 mins
295


           निलेशची बदली कोकणातील एका खेड्यात झाली.. प्रश्न प्रमोशनचा होता.. तो नकार देऊ शकला नाही.

कोकणात नव्याने होऊ घातलेल्या प्लॅन्टवर इंजिनियर म्हणून रुजू झाला.


" तू जातो आहेस खरा.. पण मला तर वाटतं तू प्रमोशन नाकारावसं.. तिथे भुताखेतांचा वावर असतो. " आई म्हणाली.

" आई त्या अंधश्रद्धा असतात.. माझा हया गोष्टीवर अजिबात विश्वास नाही.. अन इतक्या लवकर प्रमोशन मिळतेय ते नाकारु म्हणतेस..! प्लिज आई मला आनंदाने जावू दे.. " निलेश म्हणाला.

" बरं बाबा जा तू.. पण स्वामी समर्थांचा ताईत सतत तूझ्या जवळ असू दे. " आई म्हणाली.. अन एक ताईत त्याच्या उजव्या हाताच्या दंडाला बांधला..


आईची आठवण होताच निलेशने आपल्या दांडावर डाव्या हाताची बोटे फिरवली...

" साहेब तुम्ही गावातच रहाल का हय कॉर्टर्स वर? " कंपनीतर्फे मदतीला दिलेला नोकर बाबूल म्हणाला.

" इथे व्यवस्था चांगली आहे.. इथेच राहीन म्हणतो.. " निलेश म्हणाला.

" सायबानू.. थयसर नको ऱ्हवा गावात ऱ्हवा.. गावात चांगली सोय होईत.. रात्री इकडं कोणी फिरकत नाय.. " बाबूल म्हणाला.

" पण मला तर सांगण्यात आलं तू सतत बरोबर असशील !" निलेश म्हणाला.

" मी रात चो नाय ऱ्हवाचय .. गावात जावचा असा तर पानींतल्यान जावचा लागतला.. थंयसर पिंपळ असा.. झाडावर मुजा असता बसलेलो.. " बाबूल म्हणाला.

" त्या सर्व भाकडं कथा असतात.. माझा त्यावर अजिबात विश्वास नाही.. निव्वळ अंधश्रद्धा आहे.. " निलेश म्हणाला.

" सायबानू.. मला बोललस अजून कुणाजवळ बोलू नका.. हसतील तुमासं .. " बाबूल म्हणाला.

" बरं... पण रहाणार कुठे ?.. " निलेशने विचारले.

" सायबानू..खोताच्या वाड्यावर ऱ्हव .. इलेलो हापिसर खोताकडेच ऱ्हवता .. खोत समदी सोय करतो." बाबूल म्हणाला.

निलेश त्याच्या सोबत गावाकडे निघाला.. बॅग्ज घेऊन बाबूल झपाझप पावले टाकत होता.. निलेश निसर्गसौंदर्य लुटत हळूच चालला होता.. चहूबाजुंनी गर्द झाडी.. त्यातून जाणारी पाऊलवाट.. बैलगाडीमुळे झालेली वाट त्याच्या मधोमध ही पाऊल वाट.. हया शांततेला साथ देणारा लाटांचा आवाज.. आपल्याचं तंद्रीत चालतं असलेला निलेश पटकन थांबला.. समोरुन एक साप सळसळत गेला.. त्याची चकाकती त्वचा.. त्याची लांबी पाहून तो क्षणभर घाबरला.. तो सर्पराज जाताच तो पुढे आला.. पिंपळाचा भलामोठा वटवृक्ष पाहून तो थक्क झाला.. खुप जुना वृक्ष असावा.. त्याच्या बुंध्याचा आवाका.. त्याचं विस्तारलेलं रुप.. निलेश पहातच राहिला..

" सायबानू.. चला पटकन.. थयसर थांबू नका.. " दुरूनच बाबूल ओरडला..

त्याच्या आवाजाने निलेश भानावर आला.. त्या पिंपळाची पाने सळसळली.. जणू तो निलेशला खुणावत होता.. निलेशने एकवार वळून झाडच्या उंच फांदीकडे पाहिले..

" सायबानू.. " बाबुलने आवाज दिला.

निलेश चालू लागला.. काही अंतरावर बाबूल थांबला होता.

" थंयसर थांबायच नाही.. मुजा धरलं. चला पटापट. " बाबूल म्हणाला.

" खुप मोठा वृक्ष आहे.. खुप जुना असेल ना? " निलेशने विचारले.

" लय जुना.. बापूस सांगायचा,त्याच्या पणजानं सांगितलं थंयसर मुजा.. चेटकीण ऱ्हवता.. " बाबूल चालता चालता म्हणाला..

" मुजा? चेटकीण? काय प्रकरण आहे? " निलेशने गंमतीने विचारले.

" सायबानू.. थट्टेचा इशय न्हाय हा... मुजा.. चेटकीण असतलो.. पोरगा.. तरुण.. लगीन होण्या आधी मरतो.. तो मुजा होतलो.. अन पोरगी कुवारी मरते ती.. " बाबूल म्हणाला. 

बोलता बोलता दोघांनी गावात प्रवेश केला.. झोपडीवजा घरं.. भोवती बाग.. तिथून दोघे थोडं पुढे गेले.. आता कौलारू घरं लागली.. त्याही घराभोवती बाग होतीच.. नवीन युगाचा शिरकाव इथेही जाणवत होता.. उंचावर असणाऱ्या डिश.. अंगणात बोअरवेल.. एखाद्या अंगणात विहीर.. समोर चार खोल्यांची कौलारू शाळा लागली.. प्रशस्त पटांगण.. भोवती तरेच कुंपण..

" प्राथमिक शाळा मळगाव "

निलेशने पाटी वाचली..

" अजून किती दूर आहे..? " त्याने विचारले.

" अजून पक्की घरं.. मग बामन आळी.. ते संपलं की खोताचो वाडो. " बाबूल म्हणाला.

           गाव संपलं अन थोडी चढणं लागली.. ती चढून जाताना रस्त्याच्या दुतर्फा नारळाची झाडं..लावलेली होती.. त्या गर्द वनराईच्या मागे तो वाडा लपल्या गेला होता.. समोर गेलं की तारांचं कुंपण होतं.. त्यावर जंगली वेली चढलेल्या होत्या.. गेट लोटून दोघे आत शिरले.. चोहुकडे आंबा, फणस, काजू इत्यादी झाडी होती.. एका बाजूला विहीर.. त्याच्या बाजूला केळी.. सोनचाफा.. काही फुलझाडं होती..

" खय येणं केलंस? " बाहेर पडणाऱ्या माणसाने बाबुलला विचारलं.

" खोटाक भेटायचो असा.. हे नवे इंजिनियर सायेब.." बाबूल त्याला म्हणाला..

दोघांचे बोलणे चालू असताना.. निलेश सर्वत्र पहात होता.. खुप शांतता होती..

" सायबानू येवा.. " बाबूल म्हणाला तसा निलेश भानावर आला.

निलेश त्याच्या मागे चालू लागला.. सुपारी, काजू.. फणस.. नारळ.. आंबा कितीतरी वृक्ष त्या बागेत होती.. केळीला लागलेली घडे.. फुललेले गुलाब.. पक्षांचा चिवचिवाट.. मध्येच कोकीळेची ताण.. मन मोहवून टाकत होती.. निलेशने समोर पाहिलं आता वाडा स्पष्ट दिसतं होता..

चिरेबंदी वाडा दिमाखात उभा होता.. त्यावर असणारी भव्य कौलरु माडी.. निलेश ते वैभव पाहून हरखून गेला.. ते दोघे वाड्याच्या दाराजवळ आले.. बाबुलने दरवाजा ठोठावला.. आतून कुत्राच्या भुंकण्याचा आवाज आला.. दरवाजा उघडला गेला.. बाबुलने आतल्या माणसाला निलेशविषयी सांगितले.. तो आत निघून गेला..

" सायबानू.. खोत आहेत.. मला वाटलं तालुक्याला गेले.. " बाबूल म्हणाला..

 कुत्रा भुंकतच होता.. निलेश उभा राहून कंटाळला होता.. इतक्यात तो माणूस आला.. त्याने दोघांना आत बोलावले.

आता दोघानी आत प्रवेश केला.. दारात बांधलेला काळा कुत्रा दोघांना पाहून गुरगुरला.. निलेश क्षणभर थबकला..

" सायबानू येवा.. बांधलेला आहे.. " बाबूल म्हणाला..

निलेश अंग चोरत आत निघाला.. तो कुत्रा चिडून धावला.. साखळीने बांधला असल्याने दोन पायावर उभा राहिला अन लगेचच मघारी गेला.. समोर लाकडी महिरप.. त्यात लटकवलेल्या विविधरंगी हंड्या.. झुंबर. टांगलेली बंगई.. बंगई वर असणारी गादी.. लोड.. बाजूला असणारे दिवाण.. त्यावर अंथरलेल्या गाद्या लोड.. भिंतीवर लावलेले जुनाट फोटो.. त्यावर घातलवले चंदनाचे हार..

" बाबूल तूझी अवशीक बरं असा? " एका वृद्ध स्त्रीने विचारले.

" व्हय जिजी.. तू दिलेली मात्रा लागू झाली.. ताप उतरला.. आता बरी आहे.. " बाबूल म्हणाला.

" एकदा दागदर ला दाखीव.. अंगावर दुखणं काढणं बरं नाय.. " ती स्त्री म्हणाली.

निलेशने तिच्याकडे पाहिलं.. सत्तरी उलटलेली म्हातारी पांढरं लुगडं नेसली होती.. केसं काढल्यामुळे डोक्याला कपडा बांधून वर पदर घेतला होता..

" कोण असा? " तिने विचारले.

" ते नवीन फॅक्ट्री इलो.. तिथले इंजिनियरसायब.. खोताकडं आले.. " बाबूल म्हणाला.

" हे सायब तिकले म्हणजे मिळवली.. रवळनाथा सांभाळ रे आता.. " ती स्त्री म्हणाली..

" सायबानू बस हा.. तो येतलं.. " ती आत जात म्हणाली.

निलेश दिवाणावर बसला अन बाबूल ओसरीत पायरीवर बसला..

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror