लग्न
लग्न


हसू येत हा शब्द जरी ऐकलं तर..
काय करु तो लग्न एका मुलीचं पाहिलं त्याची कहाणी लिहितेय..
सुंदरस गाव त्यात राहणारी लोक आलीच लोक म्हटलं की त्यांच्या नानातऱ्हा त्यापैकी एक होती त्या गावची मोहिनी ... नाव तिचं मोहिनी होत हो पण ही मुलगी नाही आणि पुरुष ही नाही .. मग कोण असा प्रश्न पडलाना ? ... हा तृतीयपंथी व्यक्ती .. तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल त्याच्याही गळ्यात डोरल असतं ...कपाळावर भलं मोठं कुंकू ..हातात बांगड्या...नाकात नथनी... कानात डुल... पायात पैंजण किंवा घुंगरची चाळ त्या सोबत जोडवी ... ही कोणाच्या नावाची तर देवाच्या नावाची ... मोहिनी लहान असताना तिला आई वडिलांनी घरातुन काढलं होतं. कारण त्याला मुलीसारखी सवयी होत्या. म्हणून मग त्याला गावच्या जोगतीन स्वीकार ...आता ती जोगतीन म्हटल्यावर त्याला ही जोगती करणारच मग त्या जोगतीन मोहिनीला त्याच्या गुरूकडे नेलं..तृतीयपंथी मध्ये एक प्रथा आले ती म्हणजे गुरू शिष्य प्रथा ते जपण्यासाठी मोहिनीला ही तिथे घेऊन जाण्यात आलं...रीती प्रमाणे नायक म्हणजे त्याच्या मेळ्याचा करताच तोही जोगतीच ...त्यांनी रेणुका अक्काला सांगितलं तूच बांध मोहिनीला मोती अन कर बाळ जोगतीन सुरू झाली ती रीत मोहिनीचे सगळे वस्त्र कडून तिला पिवळी साडी दिली घाल म्हणून तिला साडी घातली व आणि देवी यल्लमा समोर घेऊन गेले.
तिला तिथे पाठावर बसवून निम नेसवल ...निम नेसवन म्हणजे लिंबाच्या झाडाची पाने साडी सारखी नेसवली ...इकडे झोर झोरात हलगी आणि सांभाळणे तग धरला...मोहिनीला सर्वांनी हळदी लावली ....आणि हवन कुंड पेटवला...मोहिणीला चौरंगावरून उठवलं आणि रेणुका अक्का बसली ...तिने मांडी घातली आणि मोहिनी बस इथे मोहिनी बसली...दोघांनवर कापड झाकलं ...रेणुका अक्काने मोहिनीला दूध पाजलं...आणि गुरू मंत्र दिला...ते कापड काढल्यानंतर मोहिणीच्या गळ्यात रेणुका अक्काने मोती बांधले ...मोती म्हणजे केशरी व लाल रंगाचे मणी... तिच्या गळ्यातले मोती बाकीच्या जोगतिणीच्या मोतीना स्पर्श करून बांधले...यानंतर मोहिनीला हवन कुंडाच्या अग्नी मध्ये जाण्यास सांगितले ....इकडे हलगी व संबळाच्या जोरावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले...मोहिनी जोगतीन झाली...आत्ता गुरूने म्हणजेच रेणुका अक्काने हातात कटार घेतली...कटार आणि मोहिनी यामध्ये परदा पकडला आणि मंगलअष्टका झाल्या...आणि मोहिनीच लग्न झालं तिच्या कपाळावर कुंकू लावण्यात आलं. भंडारा ही लावला तिला सुहासिनीप्रमाणे नटवलं. अश्याप्रकारे तिचं लग्नं पार पडलं.