Jyoti gosavi

Fantasy

4.0  

Jyoti gosavi

Fantasy

मी पुरुष झाले तर

मी पुरुष झाले तर

7 mins
368


मी पुरुष झाले तर !


काय विशेष फरक पडणार? मलाही देवाने दोन हात, दोन पाय ,कान ,नाक, डोळे, सारं काही त्याच्यासारखच दिलेला आहे.

 हा! पण एक गोष्ट माझ्याकडे नाही.ती मात्र पुरुष झाल्यावर मला चिकटेल , ती म्हणजे पुरुषी अहंकार! 

कारण आपल्या कानापेक्षा वर गेलेली बायको पुरुषांना आवडत नाही. 

मग त्या अहंकाराने मी काय करेन ?त्यांनी जे जे माझ्याशी केलेल आहे, त्याची परतफेड करीन का? 


कदाचित नाही. आता हे झालं थोडंस गंभीर पण आपल्याला जरा विनोदी अंगाने लिहायचा आहे नाही का? 

बरं मग आता सुरुवात करूया. 

मुळात मी दोन बहिणी च्या पाठीवर ची मुलगी. त्यामुळे मुला सारखीच वाढवली गेले. 

लहानपणापासून मी टॉम बॉईश प्रकारांमध्ये मोडते. माझी जास्त मैत्री मुलांशी, जमायची ,मी मुलांशी हाणामाऱ्या केलेल्या आहेत. पाचवीत असताना मला एका मुलाने शिवी दिली म्हणून, मी त्याच्या डोक्यात  फावड घातलं होतं .

एकाला वर्गाचा दरवाजा लावून दोघीजणीनी मिळून मारलं होतं. 

तर अस्मादिकांचे असे प्रताप, अगदी लहानपणापासून आहेत. आणि त्यातच जर मी पुरुष झाले तर?

आई लहानपणी म्हणायची "बरं झालं !हा मुलगा नाही झाला ,नाहीतर रोज एका घरचे भांडण घेऊन आला असता! आणि त्या बाया माझं लुगडं फेडायला आल्या असत्या. 

असा आमच्या मातोश्रींना आमच्याबद्दल कॉन्फिडन्स होता. 

असो तरीही विचार करूया मी पुरुष झाले तर? 


पहिली गोष्ट मला हे जे काही उपक्रम वगैरे करायचे असतात, माझ्या आवडत्या गोष्टी करायच्या असतात, त्यामध्ये मला वेळेच बंधन असणार नाही. 

कारण आज पर्यंत कसं, सर्व स्त्रियांच्या बाबतीत मला वाटतं ,ही गोष्ट खरी असेल, की तू तुझे छंद सांभाळ ,परंतु तुझ्या छंदामुळे घरादाराचे रुटीन डिस्टर्ब होता कामा नये. 

हा आपल्या काळातला तरी दंडक होता. घरचं सगळं सांभाळून, काय हवं ते कर. आणि अगदी मोठ्या लेखिका" गिरिजा कीर" यांच्या आत्मचरित्रात देखील असाच उल्लेख आहे. 

मला हवं तसं हुंदडता आलं असतं .

आणि अगदी कॉलेजच्या काळामध्ये रोडरोमिओ बनून ,मुलींवर लाईन देखील मारता आल्या असत्या.

 हा! आता कधी कधी मार देखील खाल्ला असता. जाऊ द्या, ती काय छोटीशी गोष्ट आहे. 

अजून एक पुरुष मंडळींना मिळालेलं प्राधान्य म्हणजे राजरोसपणे दारू पिणे. पुरुषाने प्याली तर चालते, बाईने विचार केला तर शांतम् पापम्. 

लग्नानंतर देखील पुरुषांनी अफेअर्स केलेली चालतात, पण बाईने विचार केला तर शांतम् पापम्. द्रौपदीच्या मनात कर्णाचा विचार आला तर त्याच्यावरती एवढं मोठं जांभूळाख्यान तयार झालं. 

"सुबह का भुला, शाम को वापस आया

 तो उसे भुला नही कहते. 


असं भुल्या बिसऱ्या बाईला कोणी घेईल का हो घरात? हो पुन्हा आपली माझी गाडी फिरून करून तुलनात्मक होते, विनोदी लेख राहतो बाजूला राहतो, तुलना मात्र सुरू होते. कारण , मी पुरुष झाले तर, मला हेच सारं केलं पाहिजे ना! तर माझी पुरुषी सत्ता , माझा पुरुषी मक्ता,अबाधित राहिला पाहिजे ना? 


हा! आता पुरुष झाल्यावर मी एक गोष्ट मात्र करेन, कोणत्याही स्त्रीवर ती अन्याय होऊ देणार नाही. पीडित स्त्रीला मदत करेन, म्हणजे नुसता कायदा करून भागत नाही तर त्याच्या मुळापर्यंत जावे लागते. ते मी करू शकेन

एखाद्या स्त्रीवर अन्याय झालाच तर तिला न्याय मिळवून देण्यासाठी, 

मी 

"अंधेरी रातो मे

सुनसान राहो पर

 एक मसीहा निकलता है

असं हातामध्ये अभिताभ बच्चन सारखे फांसी का फंदा घेऊन रात्रीची निघेन, कारण तेव्हा मी ताकतीने कमकुवत नसेन. 


अजून एक महत्त्वाचा विषय

जे पत्नीकडून अन्याय झालेले पुरुष आहेत, त्यांचा देखील विचार करायला पाहिजे ना? 

मग त्यांच्यासाठी एक मजबूत संघटना बांधेन

 हे हि तितकच खर आहे आता देखील खूप वेळा कायदा स्त्री च्या बाजूला झुकतो आणि पुरुषांवर मात्र त्याचा अन्याय होतो. काही स्त्रिया खोटेनाटे आरोप घालून एखाद्याच आयुष्य ,एखाद्याचं करिअर बरबाद करतात.

देवा! किती दिवस स्त्रीयांनी अन्याय अत्याचार सहन करायचा बरं! 

तिला अगदी गर्भात असल्यापासून भीती आहे. मुलगी आहे म्हणून गर्भातून काढून टाकण्याची, नंतर लहानपणी कुण्या आजुबाजुच्या काक्या, माम्या ,ने बलात्कार करण्याची. अंधारात रात्री एकटा दुकट कुठे फिरण्याची , न जाणो आपल्यावरती सामूहिक बलात्कार झाला तर? 

मग लग्न करून दिल्यावर ते सासु सासरा नवरा यांच्या दहशतीखाली दिवस काढायचे, आणि मोठं झाल्यावर मुलगा म्हणतो आई तुला काही कळत नाही. अशी समस्त स्त्री जातीची ट्रॅजेडी पाहून, मी रात्री विचार करत झोपले. 


देवा! मला पुरुष कर. मला एकदा हे पुरुषाच आयुष्य मजेत जगू दे बरं! आणि काय मज्जा! सकाळी उठले तेव्हा मी पुरुष होते. लक्ष्मीचा लक्ष्मीकांत झाले होते .

मग माझ्या कानात वारे शिरले आणि वासरू टणा टण उड्या मारत माळावर पळतं, तसा मी पळायचं ठरवलं. 

म्हणजे उठलो, बाहेर गेलो आणि मोटरसायकलला किक मारली. आणि हे भन्नाट वेगात आज म्हटलं अख्ख शहर फिरायचं. 

कधी जिथे गेले नाही तिथे जाऊन यायचं .

कुठल्या अंधार्‍या कोपऱ्यांना घाबरायचं नाही. मग सगळ्या शहर 90/100 स्पीडने पालथ घातल. 

पोलीस दादाने फाईन देखील मारली, इथे मात्र लेडीज असल्याचा फायदा मिळतो तो मिळाला नाही. कारण मी पुरुष होते ना. मग निघता निघता एका बिअरच्या बारमध्ये शिरलो, पण माझ्यातली बाई कुठे मेली होती? तिचे नाक तर तेच होते ना? तिथे मला असा भप्पकम वास आला, की मी तिथून पळ काढला.


 मग पान टपरीवर गेलो तिथे  120 हरीपत्ती, कतरी सुपारी आणि असं काही जे ब्रँड असतो ना, तसलं पण मागितलं आणि तोंडात घातल्या बरोबर शी शी शी सगळा तंबाखूचा वास आणि चव,थु थु थु थुंकले, मला तर मळमळायला लागलं. मी ते पटकन थुंकून टाकलं. त्याबरोबर बाकीचे विचारू लागले, 

"पहिली बार पान खा रह रहे हो क्या? मनात म्हणलं, 

छे! बाई आपलं मस्त मिठा मसाला पान, 

कीती किती छान असतं.  मोठी गंमत तर झाली जेव्हा मी -मी लेडीज बाथरूम मध्ये गेले, नाही नाही गेलो. मला पाहून तिथल्या बायका किंचाळत बाहेर आल्या, एका ,एका पुरुषी दिसणाऱ्या बाईने तर माझी गचांडी धरली आणि तिथल्या वॉचमन ने पण मला छान  फटकावले. पार मला पळ काढण्याची वेळ आली. देवळात दर्शनाला गेलो, मी आपला स्त्रीयांच्या रांगेमध्ये तिथला सिक्युरिटी मला म्हणाला ,

अहो! पुरुषांची रांग वेगळी आहे. "तुम्ही का? बायकांच्या मागे उभे आहात! या इकडे, 

तिकडे काही गर्दी नाही. नशीब तो तरी चांगला बोलला, पण पुढे उभी असणारी एक काकू सदृश्य बाई म्हणालीच, 

मेल्यांना, बायकांच्या मागे हुंगत उभ राहायला पाहिजे. असो आजचा दिवस बायकांचे टोमणे आणि मार खाण्याचा होता. 

दर्शन घेताना मी ओढणी किंवा पदर शोधत होतो, आणि माझ्या हातामध्ये शर्टाचा पंखा आला, तो मी तसाच देवापुढे पसरला, तर सारे माझ्याकडे आश्चर्याने बघत, हसत होते.


 एका बस मध्ये चढलो, आणि मी तिथे बसलेल्या एका पुरुषाला उठवायला लागलो, का तर, लेडीज सीट आहे म्हणून, आणि काय सगळेच माझ्याकडे बघू लागले ,आणि त्या पुरुषाने मला विचारले 


की तू कोण आहेस?

" तसला तर वाटत नाहीस" असे म्हणून त्याने मला आपादमस्तक न्याहाळले. आणि माझ्या लक्षात आले अरे बापरे मी आज पुरुष आहे नाही का? 

परत दुसऱ्या बस मध्ये मी स्वतः लेडीज सीटला बसून घेतले आणि येऊन मला एका बाईने उठवले. 

ओ मिस्टर!उठा, लेडीज सीट आहे, काही कळतं की नाही ?चांगला तर दिसत आहेस, तरुण आहेस, आता एखादा म्हातारा पुरुष असता तर सोडून दिलं असतं .

तेव्हा मला मध्येच येऊन लेडीज उठवतात ,तेव्हा कसं वाटतं ते पुरुषांचा दुःख पण कळलं. 

ट्रेनमध्ये पण तीच गोष्ट, 

हो, मी शिरलो लेडीज डब्यात आधी बायकांना मी विक्रेता वाटलो, त्यांना वाटले माझ्या पाठीवरच्या बॅगमध्ये टिकल्या, पिना कानातले, बांगड्या असतील. पण मी तर सीटवर बसून घेतलं, 

मग त्यांनी विचारलं तुम्ही कोण आहेत? 

तुम्ही विक्रेता आहे का? फेरीवाला आहे का? 

मी नाही म्हटल्यावरती त्यांनी मला हाकलून बाहेर काढलं," खाली उतर! नाहीतर पोलिसांना बोलावू" आणि मी घाबरत घाबरत ट्रेन थांबल्याबरोबर पळ काढला, पोबारा केला. 


आणि जेंट्स डब्यांमध्ये चढलो पण त्यांची एकमेका तली भाषा, लैंग्वेज, शिव्या माझ्याच्याने ऐकवेना. तरीपण मी हळूच कान देऊन ऐकू लागलो दोन मित्र बोलत होते, 

अरे माझी ती आहे ना? ती मला काल भेटली आणि मी बायकोसोबत मॉलमध्ये, अशी फाटली म्हणून सांगू, तिला बघून मी दुसऱ्या बाजूने पळालो .नंतर बायको विचारू लागले की अचानक का निघून गेलात? तिला काय उत्तर द्यायचं काही सूचेनामग मी पोटात कळ आल्याच नाटक केल,आणि संडास मध्ये पळालो. 


दुसरा म्हणाला तुला दोन दोन लफडी करायचीच कशाला? 

घरात वहिनी एवढ्या चांगल्या आहेत, 

त्यावर तो म्हणाला "मग पुरुष कशासाठी झालोय? 

कॉलेजची तरुण पिढी तर अशी भाषा वापरत होती की  न ऐकलेली बरी


आता काय करावं बरं! 

मग माझ्याच बॉयफ्रेंड ची परीक्षा घेण्याची मला हुक्की आली, आणि मी त्याच्या ऑफिस मध्ये गेलो. 

तिथे रिसेप्शनिस्टला गेस्ट आहे म्हणून सांगितले. आणि दिलीप माने यांना बोलवा म्हणून सांगितले. 


दिलीप आला, आणि माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागला. 

बरोबरच आहे ,त्यापूर्वी त्याने मला कशाला पाहिलं असेल, पुरुषाच्या रूपामध्ये. 

मी माझी ओळख करून दिली


 मी लक्ष्मीकांत मानकापे, थोड तुमच्याशी खाजगी बोलायचं आहे.  जरा कॅन्टीनला येता का? असे म्हणत मी त्याला कॅन्टीन ला घेऊन गेले ,नाही नाही गेलो. मी तुम्हाला ओळखत नाही. काय बोलायचे आहे? 

अहो मला लक्ष्मी बद्दल बोलायचं आहे. त्याबरोबर दिलीप सावध झाला .


काय बोलायचे आहे? ती तुमची लक्ष्मी आहे ना? चांगली मुलगी नाही. 

तिच आधी माझ्या बरोबर अफेअर होतं. नंतर मी तिला सोडून दिली. 


माझ एवढ वाक्य पूर्ण व्हायच्या आत माझ्या कानाखाली जाळ निघाला,


 काय म्हणालास? हरामखोरा ! मी तिला शाळेपासून ओळखतो. 

ती कधी रे आली तुझ्याशी अफेयर करायला, आणि आली असेल -तर आली असेल. 

आता तिचा तुझा काही संबंध नाही ना? 

आता ती माझी आहे. 



ती कशी आहे ते मला माहित आहे. तू सांगण्याची गरज नाही. 

आता एक शब्द जरी बोललास, तरी हाडं मोडून ठेवीन. 

त्यानंतर मला तेथून पळ काढण्या शिवाय गत्यंतर नव्हतं. 

पण माझ्या पुरुष होण्या मध्ये तेवढी एक गोष्ट मला फायद्यात पडली. 

मला दिलीपची परीक्षा घेता आली. 

रात्री उशिरा घरी आले आणि गुपचुप झोपून गेले. कारण आईने मला ओळखलंच नसते. आणि घरात घेतले नसते. 

त्यामुळे माझ्या चावीने रात्री उशिरा दार उघडून मी घरात शिरले. आणि सकाळी उठले तर मी लक्ष्मी झाले होते. 


परंतु दिलीपने काल मारलेली कानाखाली मारली तिथे काळनिळ झालेलं होतं .

त्यावर मला आईने विचारले काय झालं ?काल दिवसभर कुठे होतीस? 


अगं सकाळी सकाळीच एका मैत्रिणीचा फोन आला, तिची जरा अडचण होती, ती सोडवता सोडवता सगळा दिवस तिथेच गेला. 


पण तुला एक फोन करता येत नाही का? तुला सांगता येत नाही का? 

इथे घरात कोणी काळजी करणार आहे की नाही? वगैरे वगैरे .

तिची काही चूक नव्हती, परत कानाखाली काळनिळ झाला आहे, कोणी मारलं? त्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं .

दिलीप ने देखील मला तेच विचारलं ,"तुझ्या कानाखाली काळ निळा कसा झालेला आहे? 

आणि त्याचेही उत्तर माझ्याकडे नव्हतं . दोघांनाही काहीतरी थातुरमातुर कारण सांगितलं, बाथरूमच्या भिंतीवर आपटले सांगितलं, आणि वेळ मारून नेली. 


शेवटी देवाला म्हटलं देवा मी आपली लक्ष्मीच छान आहे. मला लक्ष्मीकांत व्हायचं नाही. पुन्हा कधी माझी प्रार्थना ऐकू नको.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy