मी कोण?
मी कोण?
शेजारी एका आजीजवळ गप्पा मारत बसलो होतो . सहज बोलता बोलता .आजी त्यांच्या पूर्व काळातील घडलेल्या गोष्टी सांगताना अचानक त्यांच्या तोंडून शब्द निघाला तू कदाचित या क्षणी ? मी सहकार्य केले नसते तर ?तू हाती लागला नसता . तेंव्हा मात्र मला अतिशय धक्का बसला . मी पुन्हा पुन्हा विचारण्याचा प्रयत्न केला . मात्र आजींच्या अचानक लक्षात आल्याने त्या अधिक काही सांगत नव्हते .आरे चुकून बोलले गेलं मी पुन्हा पुन्हा विचारण्याचा प्रयत्न केला . तेंव्हा मात्र आजीच्या डोळ्यात पाणी आले .व आजी सांगू लागली . एक भयानक कथा . एक भयंकर गोष्ट ! जी ऐकून अंगावर काटा येईल ? अशा प्रकारची गोष्ट आजी सांगू लागल्या . अरे तू आज मोठा साहेब आहेस तुझ्याकडे कोणत्या गोष्टी नाहीत . आजीने म्हटलं तुमच्या आशीर्वादाने आहे . माझे आई-वडील त्यांनी कमावलेली संपत्ती . कार .आणि मी आज एका तालुक्याच्या प्रमुख अधिकार पदी होतो . पदरी नोकर-चाकर . वडिलांचा व्यवसाय असल्याकारणाने मोठ्या प्रमाणावर व्यवसाय मध्ये नफा होत .असल्यामुळे गडगंज संपत्ती . कमावली होती . त्यामुळे मला नोकरीची आवश्यकता नव्हती . मात्र माझ्या मनामध्ये एक अधिकारपद असावं व समाजाची सेवा करावी . या हेतूने प्रेरित होऊन मी नोकरी करीत होतो .आमच्या व्यवसायामध्ये भरभराट त्यामुळे व्यवहार बघण्यासाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये आमचे ऑफिस होती .एक नामांकित ' उच्च प्रतिष्ठीत व्यापाऱ्याचा मुलगा ! म्हणून नावलौकिक मिळवला होता . घरामध्ये मी एकटाच असल्याकारणाने मोठ्या धुमधडाक्यात मध्ये लग्न झाले .एक उच्चशिक्षित अशी पत्नी , आज माझी मुले माझ्याप्रमाणेच उच्चशिक्षित असून चांगल्या पदावर काम करीत आहेत. त्यांची लोकप्रियता एवढी वाढली किती या शहरांमध्ये मुलाचीं लोकप्रियता वाढल्यामुळे त्याला त्या नगरसेवक म्हणून .पुढे उत्तम कार्य केल्यामुळे पक्षाने आमदारकीसाठी पाचारण केले . आणि सुदैवाने आज तो आमच्या तालुक्याचा आमदार पदी विराजमान असून देशाची सेवा करीत आहे . माझा मुलगा माझ्याप्रमाणेच उच्च पदावर नोकरीचा अनुभव घेतल्यानंतर स्वतःच्या कंपन्या आणि त्यांचे मॅनेजमेंट सांभाळण्यासाठी नोकरीत निवृत्ती घेतली . व आज उत्तम प्रकारे कारभार सांभाळत आहे . दोन्ही मुलांचे व तिसरी मुलगी तिघांचीही लग्न झाली . आनंदाने चाललेले आहे .मी आज इतका आनंदी आणि नशीबवान समजत होतो . जणू काही स्वर्गात असल्याचा आनंद मला मिळत होता . दैवाने मला कोणत्याही गोष्टीची कमतरता येऊ भासू दिली नाही . पण आज अचानक आजीच्या बोलण्यामुळे मनात शंकेची पाल शंकेची पाल चुरचुरली व मी विचारू लागलो . आज कोणत्याही प्रकारची इच्छा अपूर्ण नाही . पण मन याचा विचार करण्यास तयार नव्हत . आधी एकच प्रकारचे शब्द वापरत की बाळा एका व्यक्तीच्या वचनाने मी बांधलेली आहे . त्यामुळे मी तुला काही सांगू शकत नाही .मात्र माझ्या मनामध्ये जणू काही शंका निर्माण झाल्यामुळे 'स्वतःचे मन स्वतःला खात होते .व प्रत्येक क्षण स वाटत कि कोणती गोष्ट असेल ? आज आयुष्यामध्ये मी रोज ती गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करू लागलो . असंख्य नातेवाईकांकडे जाऊन जुन्या लोकांना त्या प्रकारची माहिती जमवू लागलो . तरीही काही थांगपत्ता लागत नव्हता .आई वडिलांना विचारले . माझ्या बालपणाचे चे किस्से सांगा . गोष्टी सांगा . व ती आनंदाने सांगत . ज्याप्रमाणे एखादा पिक्चर चालू असताना पिक्चर चा रिळ तुटतो व काही दृश्य नाहीशी होतात . रिळ पुन्हा जोडला जातो . पिक्चर ची कथा सलगपणे दाखवली जाते .मात्र मध्ये कट केलेल्या त्या दृश्याचा कोणालाही थांगपत्ता लागत नाही .काही कमतरता ही दिसून येत नाही . तशी माझ्या जीवनात घडले होते . एक दिवस मी आईजवळ हट्ट धरला व विचारू लागलो तुला माझी शपत आहे .की माझ्यापासून अशी कोणती गोष्ट लपवलेली आहे . ती गोष्ट मला शेजारच्या आजीकडून कळाली तेंव्हा मात्र आईच्या चेहऱ्यावरील हावभाव बघून ती माझ्यापासून काही गोष्टी लपवल्या जात आहेत . म्हणून मी पुन्हा पुन्हा विचारू लागलो . तेंव्हा आई सांगू लागली की शेजारच्या आजी म्हणजे तुझी सावत्र मावशी !असून आम्ही दोन्ही एकाच गावच्या व एकाच परिसरात एकाच कुटुंबात वाढलेलो आहेत .जेंव्हा आमची लग्नाची वेळ झाली तेव्हा सुदैवाने म्हणा की नशीब म्हणा आमचे एकाच घरामध्ये दोघांची लग्न झाली .दोघांचे संसार अतिशय सुखाने चालले होते . शेजारच्या आजी कडे म्हणजे तुझ्या मावशीकडे तुला काही दिवस वाढवले तीने स्वतःचे दुध पाजले आहे . त्यांचें घरात चार मुल जन्माला आलेली .मुले कतृत्वशून्य असल्याने दिवसेंन दिवस त्यांची अधोगती होत गेली . आणि परिस्थिती खालावत गेली .मात्र त्यांच्या पोटी चार आपत्य होती . माझ्या कडे संपत्ती भरपूर होती . परंतु आपत्य होत नव्हतआणि मनामध्ये एक शल्य टोचत होते . जवळजवळ दहा वर्षे लग्नाला होऊनही घरामध्ये अपत्याची चाहूल लागत नव्हती . परिणामी तुझ्या वडिलांचे मनस्थिती आणि विचार याचं दुःख ,सतत व समाजामध्ये विविध प्रकारची टोमणे ऐकायला मिळत होते . वेगवेगळ्या वैदयाकडे ' हकीम डॉक्टर ,असे विविध प्रकारचे प्रयत्न करून सुद्धा !यश येत नव्हत . अशाच एका भयाण रात्री ! आम्ही एका शहरातून घरी येत असताना रस्त्यामध्ये आम्हाला काहीतरी वस्तू पडलेली दिसली अचानक रस्त्यात वस्तू दिसल्यामुळे मी गाडी स्लो केली . तेंव्हा मात्र रडण्याचा आवाज आला .म्हणून मी गाडीच्या खाली उतरून बाजूला बघितल .चौकशी केली बर तरीही काही कोणाचा थांगपत्ता लागत नव्हता. व शेजारीच मोठा कचरा डेपो असल्याने आमच्या मनामध्ये शंका आली .लहान बाळ नुकतेच काही तासापूर्वी जन्म झालेले होते . कुणाचे पातक ? मजबुरी असेल . किंवा असे एखादे संकट असेल कि जे आईला जन्म दिलेल्या बालकाला रस्त्यावर टाकण्यास प्रवृत्त केले होते . त्या मागे मोठे कारण असले पाहिजे. त्या बालकाला उचलले दवाखान्यात नेले . उपचार केले .जणू देवाने दिलेला प्रसाद म्हणून आम्ही त्याचा स्वीकार केला ! वडिलांनीही आईला सांगितले . एवढा प्रयत्न करून एवढी संपत्ती !एवढा पैसा ! असूनही कोणत्याही प्रयत्नांना यश आले नाही .आणि ज्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत . ते न करता मिळाले तेंव्हा ! हे स्वीकारायला काय हरकत आहे . म्हणून आम्ही त्या बालकाचा स्वीकार केला . त्यानंतर पेपर मध्ये जाहिरात दिली .जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली . मात्र त्याला शोधण्याचा प्रयत्न केला . मात्र कोणीही माऊली संबंधित व्यक्ती या बाळाच्या तपासासाठी आली नाही .त्या बालकाला एवढे प्रेम मिळाले आम्ही ते बालक स्वतःचे म्हणून सांभाळले व ही गोष्ट फक्त आजींला .व आम्हा दोघांना अशा तीन व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही माहिती नव्हती .आजींना मी शपथ घातली होती .या जीवनामध्ये शेवट पर्यंत गोष्ट या बालकाला . म्हणजे मला ! कळता कामा नये .मात्र बोलण्याच्या ओघात काही क्षणांमध्ये मला विशिष्ट शब्दांमुळे काही संकेत मिळाले . त्या संकेता मुळे मी कोण ? आहे या जीवनामध्ये पहिला पडलेला माझा प्रश्न ! मला पडलेला आयुष्यातील पहिला प्रश्न !मी कोण ? साऱ्या समाजाला जगाला माहिती होते . एका प्रतिष्ठित व्यापाराचा मुलगा . आताच्या आमदाराचे वडील . जे आज जगप्रसिद्ध आहेत .व माझा दुसरा मुलगा एका शहरात कलेक्टर ! पदी विराजमान आहे त्याचे वडिल !साऱ्या समाजाला , जगाला , मी सदाशिवराव धामोडे ! हे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व माहिती आहे . माझ्या मनाला सतत एकच प्रश्न पडत आहे .मी कोण? व त्याचा शोध .एखाद्या धनाचा , संपत्तीचा किंवा जमिनीमध्ये दडलेल्या संस्कृतीचा शोध ? घेतात .त्याप्रमाणे मी आजही त्याचा शोध घेत आहे. मात्र मिळत नाही. व मनाचे समाधान होत नाही. आज कळते की सार्या गोष्टीवर आपण आवर घालू शकतो . साऱ्या गोष्टी मनात येईल त्या इच्छा .आपण उपभोगू शकतो . साऱ्या प्रकारचे पद . संपत्ती ; मिळू शकतो . मात्र मनाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकत नाही. मनाचे समाधान नाही करू शकत .कारण त्या प्रश्नांची उत्तरे सापडली तरी त्याचा उपयोग नाही . शोधण्यात अर्थ नाही .आणि उत्तर सापडली तरी आज जी व्यक्ती जगप्रसिद्ध आहे . ती व्यक्ती ! तिचे अस्तित्व . संपल्या शिवाय राहणार नाही .व या गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे . ती गोष्ट सापडली तरीही !त्या गोष्टीतला मी कोण ? याचे अस्तित्व सिद्ध करता येणार नाही . व मनाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मी आजही शोधत आहे . व शोधत राहील . मी कोण?
