मी असा का?
मी असा का?
लोक निघून जातात आणि आठवणी तश्याच ठेवून जातात.मनात, घराच्या कोपऱ्यात आठवणी तश्याच राहतात.उफान देण्यासाठी,शब्द मुके करण्यासाठी.माझ्या घरातील प्रत्येक कोपरा मला तुझा आभास करून देते, अन मन माझं तुला घरभर शोधते.
तुला शोधत शोधत थकते आणि घराच्या एका कोपल्यात जाऊन बसते.. आणि लगेच आठवते तू रोज सायंकाळी इथेच बसायची,मन त्या दिवसाना पुन्हा बोलावते तुझ्या आठवणींना नव्याने उजाळा देते.
