आज तू हवी होती
आज तू हवी होती
भर दुपारी अचानक पाऊस सुरु झाला रस्त्यावरील लोकांची गर्दी भिजण्यापासून वाचण्या करिता आजबाजूच्या दुकानात गेली, मीही धावत धावत दुकाना कडे निघाले आणि लगेच माझा मोबाईल बॅग मध्ये टाकला. अन त्या क्षनाला मला तुझी आठवण आली.
पाऊस आता जोऱ्याने पडू लागला. लोक इकडे तिकडे धावतच होती, मातीचा सुगंध चोहीकडे दरवळत होता, आणि मी आठवणीत गुंतलेली होती, आठवते आपण कॉलेज वरून परत येत असताना असाच पाऊस पडत होता.पावसाचे थेंब पडताच लगेच मी मोबाईल बॅग मध्ये ठेवायला लागले. आणि चालण्याचा वेगळा वाढवला तेव्हा तू म्हटले या पावसाचा तर आनंद घायला हवा यात तर भिजून जायला हवं, खरं तर तेव्हा तुझं ऐकून बॅग मागे करून पावसाचा मी आस्वाद घेत होते आणि लगेच पावसाने स्वतःच्या नादात मला बेधुंद केले होते थोड्याच वेळात तुझं हॉस्टेल आलं तू निघून गेली आणि मी सार काही विसरून पावसात भिजत होती. ना कसला विचार, ना कसली चिंता.....
माहित नाही तू असं काय केल होत कोणाच्या म्हणण्याने कोणी वेड्यासारखं पावसात भिजत नाही, तो क्षण वेगळाच होता तुझे तस म्हणणे फार वेगळे होते.. मोबाईल, बॅग, कपडे भिजेल या कडे माझं लक्ष गेलंच नाही. फक्त पावसाचा आस्वाद घेत होते. आणि आज बघ पाऊस सुरु आहे आणि मी त्याची बंद होण्याची वाट पाहत आहे. किती अंतर आहेना या दिवसात आणि त्या दिवसात.
आज तू हवी होती इथे खरच हवी होती.तू त्या दिवशी सारखं म्हटलं असत अन मी पावसात भिजले असते..तो क्षण मी पुन्हा जगले असते....
