मनातील विचार
मनातील विचार
दिवस सरत गेला, महिना पूर्ण झाला, पाहता पाहता वर्ष हातातून निघून गेलं. रोजच हा विचार मनात येते. कि, वेळ निघून जात आहे. माझं स्वप्न केव्हा पूर्ण होणार, होणारही कि नाही, हाच विचार मनातं सतत फिरत आहे, कधी कधी तर रडावंसं वाटते, का माहीत नाही पण असं वाटते,आईजवळ जावं आणि मनसोक्त रडून मन हलक करून घ्यावं आणि आई डोक्यावरून हात फिरून म्हणणार,सगळं ठीक होणार रडू नको.. केल असंही करून पाहिलं, शेवटी खूप प्रयत्न करूनही. माझं स्वप्न माझ्या जवड येतेना दिसत नाही. सतत मी जितके जवळ जायला निघते तितके ते माझ्या दूरदूर पळताना दिसते.
काय करावं, कस करावं, कोणाला सांगावं,अशी परस्थिती निर्माण होते. कधी कधी तर स्वतःवरच हसू येते. आणि स्वतःलाच म्हणते का कशाला मी असा प्रश्न करते,असं म्हणून फक्त मी माझ्या म्हणाला शांत करण्याचा प्रयत्न करते. असं वाटते हे मनातील सुरु असणारे विचार एकदम बंद व्हावे, लगेच ऐकावेळी, म्हणून मनाला फसवण्याचा प्रयत्न करते, पण मन काही समजण्यास तयार नसते. शेवटी करायच ते मलाच करावं लागेलन. मला हे विचार मनातून लादून टाकायचे असते, आणि मस्त शांत व्हावंसं वाटते. वाटते बेफिकर होऊन जावं, पण काय करावं. असच म्हणता येईल कि, मी रोज स्वतःचं सोबत लढते, आणि त्यात वाईट आणि चांगली दोन्ही बाजू माझीच असते. असं वाटते माझं मन माझ्या ताब्यात नाही, असत तर!सोडा ती वेगळी गोष्ट आहे..आपण जर अंतर्मुख होऊन पाहाल तर, आपल्या मनात अपेक्षा ठासून भरल्या असतात. अशीच स्थिती प्रत्येक व्यक्तीची आहे, आणि त्यात अपेक्षाभंग हा मोठा घाव सुद्दा असतो....
काय करावं, कस करावं, शेवटी हा प्रश्नतर उभाच. आणि या प्रश्नातून सुटका होणे अशक्य आहे.आणि जे एकटे राहतात त्यांचं काय? त्याना तर स्वतःचं या प्रश्नाला सामोरे जावं लागते. हे माझ्या मनाचे खेळ मलाच समाजेना, मन बधिर होऊन जाते. आणि पुन्हा मनात विचारच वादळ थैमान घालते. खरच कबूत वाईट स्थिती निर्मान होते, मनसोक्त रडूनही घेतलं, तरी हुंदके मारता मारता विचार सुरूच, स्वप्न पूर्ण करणं अशक्य वाटतं, मनालाही समजून देते. पण ना ते काही समजतं ना उमगत,आणि पुन्हा तेच मन हलक करण्याचा शेवटचा उपाय मनसोक्त रडणे. थोडा वेळ होईल शांत मन पण मनातीलं विचार शांत तरी बसू देणार का? म्हणूनच तर मला अस म्हणावं वाटते कि, ऐकत राहणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे. आपलं मन आपल्या विचारातच फिरत, आणि स्वतःची स्वस्थिती आपल्याला अवगत असते. म्हणून आपण आपल्या म्हणाला फसवून ठेवू शकत नाही.
आणि करावं तरी काय माझं स्वप्न अशक्य तर नाही पण शक्य करणं फार कठीन होणार आहे. आणि त्यात विचारांची जोड, मानसिकता खराब होण्याची लक्षणे. असेही म्हणता येईल.. माझं स्वप्न मी पूर्ण करण्याची प्रयत्न करणारच पण कधी कधी थकून हर मानते, आणि लगेच काळजावर आघात होऊन अश्रू टिपलेले जाते.
सगळं तर देवाच्या भरोश्यावर ठेवून चालत नाहीन,मग पुन्हा असं वाटते कि चला पुन्हा प्रयत्न करू, आणि देवाचा आशीर्वाद असेलच सोबतीला. मग..... मग कस मला कोणी माझं स्वप्न मिळवण्याच्या वाटेवरून दूर करू शकणार............... पण शेवटी काय? तेच एकच एक विचार मनात सुरूच असतात..
यामध्ये दिवसातून आलेले ते आनंदित क्षण मी जगूच शकत नाही, एकदा तरी मागे वळून बघावं. जुन्या आठवणी ताज्या करून, मन प्रफुल्लीत करावं..आताचा क्षण जण्याची उमेद केव्हा मिळेल.. प्रत्येक गोष्टीचा अतिरेक वाईट असते. आणि जास्त विचार करणे, काय होणार, कस होणार,कधी होणार,हे देखील वाईट आहे..........
