पळवाट
पळवाट
पळवाट शोधते प्रत्येक गोष्टीतून.........मी सकाळ पाहत नाही मी संध्या पाहत नाही, आता मला चंद्र दिसत नाही, नाही दिसत त्या विखूरलेल्या चांदण्या आणि सरतही नाही दिवस माझा, मी शोधतो पळवाट.....
घराच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यातला अंधार मला बोलावते, आणि त्यातच सामावून बसते, मग माझ्यापासून माझी सावलीही दुरावते,स्वतःवरचा ताबा तुटतो, निराशा मला तिच्या घेऱ्यात घेते.माझे लोक माझ्या जवळून हरते, दुरावलेल्या हाताचा क्षणभंगूर स्पर्श होतो तरीही पाणी भरलेल्या डोळ्यात आस असते, तिला कळेल माझी व्यथा तिला कळेल मी तिच्याविना हतबत आहे...... मग ती परतनार नेहमी करिता फक्त माझ्यासाठी............................
.......................... परतणारनं?
