एक वेळा समजून पाहा
एक वेळा समजून पाहा
जग खूप बदललं हो न, हो. काय काय नाही आहे आपल्या जवळ या काळात सगळंच काही आहे आणि मिळत सुद्धा. बघाना मागचा उलटलेला काळ पहा आणि आजची वेळ पहा,सगळं बदललं, जग वेगाने परिवर्तनाच्या दिशेने धावताना दिसते, तरीही लोकांच्या मनातून अजून काही मळ निघाला नाही आहे, बाहेरून जरी जगा सोबत चालताना दिसत असेल तरी ते लोक जुन्या गेल्या काळातील मळलेले विचार सोडायला तयार नाही,मुलगी शिकली प्रगती झाली,, हे असे वाक्य भिंतीवर लिहलेले पाहायला मिळतात आणि बस तिथं पर्यंतच ते मर्यादित असते, कधी शिक्षण त्या मुली पर्यंत पोहचतच नाही कारन मळलेल्या मनानी त्या मुलीला वेडून धरले असते,
काय हवं काय एका मुलीला, एक विश्वास आणि स्वतः शिकून स्वतःच्या पायावर उभ होण्याची हिम्मत बस आणखी काय मागेल ती, लहान पणा पासून असं वागच तस वागाच हे धडे दिल्या जाते, थोडी मोठी झाली कि, जेवण बनवणं शिकवल्या जाते. आणि त्या नंतर लग्न, लग्नाला तिचा होकार नसेल तर तिला बोलून बोलून मानसिक त्रास दिला जातो. तिचा विचार न करता काय काय बोलून जातो आपण.. मी मराच्या आधी तुझं लग्न माझ्या डोळ्यांनी पाहूदे. असं बोलल्या जाते. काय हे कुठं आहे यात त्या मुलीच शिक्षण कुठं आहे तिची स्वप्न सांगा? कुठं दिसते का तीच स्वतःचं जीवन तीच अस्तित्व. लहानपणा पासून ती असच जीवन जगते आणि असच सहन करते. हे असं असं जीवन असते का?कधी त्या मुलीच्या जागी उभ राहून विचार करा. तुम्ही तुमच्या मुलीला दिलेल्या संस्कारावर विश्वास नाही का.. ती नाही करणार तुमची मान खाली, उलट तुमची मान उंचावेल यासाठी तिला शिकवा तिचे स्वप्न पूर्ण करू द्या, हिम्मत द्या तिला. मग पाहा ती स्वतःची जबाबदारी स्वतःचं सांभाळून घेणार तिचीच नाहीतर तुम्हाला ही सांभाळनार...... तिला थोडं त जगू द्या मनमोकड्याने नाही तर तुम्ही तुमच्याच मुलीला गमवाल.. आणि तुम्हाला तुम्ही दिलेल्या संस्कारावर शन्का निर्माण होणार.......
एवढ ऐकून समजून आपण जर आपल्याच बाळाचं मन नाही जपलं तर.. कोण जपणार आपल्या मुलीला सांगा?
