महिष्मती
महिष्मती
महिष्मती नगर आता सुधारलं आहे. जनजीवन नव्या साधन सुविधांनी जगत आहे आपण जगापुढे कुठेही कमी पडू नये हा महाराज बाहुबली याचा उद्देश दर रविवारी महाराज नगरात फेरफटका मारीत असे.
"सेनापती..."
"जी महाराज..."
"माझ्या मोटर सायकलमध्ये पेट्रोल आहे ना?"
"कुठल्या महाराज?"
"हा कसला प्रश्न सेनापती..."
"महाराज आपल्याकडे एवढ्या मोटरसायकल आणि कार आहेत की समजत नाही..."
"बरं बुलेटमध्ये..."
"हो आहे महाराज टाकी फुल्ल आहे..."
"बरं तर मी येतो काही महत्त्वाचं असेल तर फोन करा..."
"महाराज ब्लू टूथ घेतला ना?"
"हो तर गाडी चालवताना खूप उपयोगी पडतो तो..."
महाराज बाहुबली बुलेटवर बसून निघतात. वाटेत त्यांना लोक मोबाईलची रेंज पकडण्यासाठी धडपडताना दिसतात. आपल्या राज्यात एवढी धडपड बुलेट थांबवून महाराज त्या लोकांकडे जातात. बाहुबलीला पाहताच लोक एक सुरात आपले गाऱ्हाणे सांगतात...
"महाराज काल संध्यकाळपासून राज्यात वाय फाय मिळत नाही आहे. आम्ही सगळे रेंजसाठी धडपडत आहोत..."
"काय काल पासून..."
बाहुबली सेनापतीला फोन लावतो...
"सेनापती राज्याच्या वाय फायचे रिचार्ज केले होते ना..."
"हो महाराज..."
"मग वाय फाय कनेक्टिव्हिटी का नाही मिळत कालपासून..."
"महाराज राजमहालात मिळत आहे तेव्हाच दोन्ही वाय फायचे रिचार्ज केले होते..."
"मग आता काय करायचे मी माझ्या राज्याच्या लोकांना वाय फायसाठी असे धडपडताना पाहू नाही शकत..."
"महाराज चिंता नसावी ऑपरेटरला लगेच बोलवतो..."
"बरं लवकर करा..."
"बरं तुमचा प्रॉब्लेम साॅल्व्ह होईल चिंता नसावी..."
ऑपरेटर चेक करतो आणि सेनापतिच्या कानात सांगतो सेनापती त्याला घेऊन राज महालात येतो बाहुबली कँडी क्रशमध्ये बिझी होता...
"महाराज..."
"सेनापती..."
"महाराज हे ऑपरेटर..."
"काम झाले तर..."
"नाही महाराज..."
"प्रॉब्लेम आहे..."
"काय प्रॉब्लेम आहे ऑपरेटर..."
"महाराज तुमच्या वाय फायचा पासवर्ड हॅक करून दुसरीकडे वळवण्यात आला आहे..."
"दुसरी कडे कुठे?"
"भल्ला याच्या मोडेमशी..."
"काय भल्लाची एवढी हिम्मत?"
"सेनापती आताच्या आता भल्लाला ई-मेल पाठवा की जर त्याने हे बंद नाही केलं तर त्याला आमच्याशी कँडी क्रशच्या १००० लेवलमध्ये खेळावं लागेल आणि तो हरला तर त्याला एक वर्ष आमचे सगळे रिचार्ज करावे लागतील..."
"जी महाराज आता पाठवतो इ मेल..."
आणि भल्लाच्या मेल वर बाहबलीची मेल पोहोचली...
