Deore Vaishali

Inspirational

2.6  

Deore Vaishali

Inspirational

मग जगणं सोपं होतं..

मग जगणं सोपं होतं..

3 mins
236


काही दिवसांपूर्वी मी एक लघुकथा लिहिली होती. "झुकावे किती हो नात्यांमध्ये"...खर सांगु का बऱ्याच जणांनी त्यास दाद दिली व शेअरही केली...खरतर काय असत ना मित्र -मैत्रिणींनो "नातं"हा एक घटकच खुप महत्वाचा .सगळे काही हेवेदावे, प्रेम ,आपुलकी, मत्सर,लोभ,भावना इत्यादी अनेक घटक हे ह्यात असतात.नाती ही बनतात माणसामाणसात... माणुस हा घटकच असा आहे कि त्याला एकट राहाण आवडत नाही.मग तो नाती जोडतो...म्हणजे माणसे जोडतो हो....!!.


मग ठरलेल्या नात्यांमध्ये मानलेली,हक्काची असे होते .त्यात एक निर्मळ नात असत" मैत्रीचं".खुपच फुलणार ,चैतन्यमय अस .वयाच्या एका टप्पा पर्यंत माणसाला माणसे जोडण्याची एक आवडच होऊन जाते.चांगला स्वभाव, उत्तम चारित्र्य, प्रभाव ह्यांच्या जोरावर ती जोडलीही जातात. पण ते जोडल्यावर जपलेली माणस आपल्याला "जपतात"का?..हो किंवा नाही हे पहाणही महत्वाचे असते. नाहीतर काही नात्यात फक्त आपला वापरच होत असतो..काही वेळेस एखादी मोठी असामी आपल्यासोबत संबध ठेवून आहे .तिच खुप नाव आहे पण आपल्याबरोबर जपलेले संबध आपल्यासाठी खास असतात नाही का?...कि एवढि मोठी व्यक्ती माझा/माझी...मित्र/मैत्रीण ...खुपच अभिमान वाटतो..पण आपला वापर एखाद्या सोगटीप्रमाणे होत नाही ना हे पण लक्ष्यात असु द्यावे. बर्याच जणांना असे अनुभव येतात मग तुटतात मनातुन. माणस जोडणे हा तुमचा चांगुलपणा असतो पण त्याला स्वार्थ व कमकुवतपणा समजणारे अनेक असतात. आपल्या चांगुलपणाचे प्रर्दशन इतकही करू नये कि समोरचा स्ंशय घेइल.खुपदा अस होत कि एखाद्या जवळच्या व्यक्तीला आपल्या मनातील सगळी सुखदुःख आपण सांगत असतो .पण तिच जवळची व्यक्ती त्याचा नको तसा उपयोग करत असते मग नको त्या मानसिक त्रासातुन आपल्याला जावे लागते.म्हणून माणसं जोडतांना कोणत्या पायरीपर्यत त्यांना येऊ द्याव व कुठपर्यंत थांबवाव हे आपण ठरवायला हवं .नाहीतर एखाद्याची कुवत नसताना एकदम जवळ केल्याने आयुष्यभर त्या दुःखाच्या यातना भोगाव्या लागतात ...नाही का...!!


खरंतर लोकांना काही पडलेल नसत व ते तुमच्या आधारासाठीही बसलेले नसतात तर आपणच त्या्चा आधार शोधत असतो .आपणच रडगाण्यासाठी त्यांच्या खांद्याचा आधार घेतो .पण त्यांना तो त्रासदायक वाटु लागतो.दुःखावर फुंकर घालणारी माणसं विरळीच....!!..मन मोठ करून समोरच्याला मदत करत त्याच्या चांगल्यासाठी झटणारी चांगली माणसही आहेत आपल्या आजुबाजुला. पण खुप माणसें जोडण्याच्या नादात उगारच गोळा होते व एखादा कुसळ असा टोचतो कि वेदना असह्य होतात. आपण भारावुन जातो पण समोरच्याचे पाय जमिनीवर आहेत का?...हे पहाणही महत्वाच.माणसातल चागुलपण बघाव, प्रसंगी त्याचे कौतुकही कराव व त्याचे गुणही आचरणात आणावेत. पण काही माणसे फार छान असतात आपण त्याच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करतो आणि अचानक कळत कि ती व्यक्ती किती खोटी, मतलबी होती. आपला वापर करत होती .तेव्हा त्याचा विट येतो...मनस्ताप ,अवहेलना ...काही नको ते पहावयास मिळत ...त्यासाठी एकच करु शकतो कि ,"कोणाच्याही फार जवळ न जाणे".


"दुरून डोंगर साजिरे."......अस. आयुष्यात पुढे निघावं,फार खोलात जाऊन कोणाला आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार देऊ नये .जरूर कमवावी माणसे ..हक्काच्या व्यक्ती काही सांगतात त्याचे शब्द ऐकावेतही पण आपल भलही बघाव. आपलं चांगल व्हाव ह्यासाठी झटणारी कि आपल्या प्रगतीने व आनंदाने जळणारी माणसे ओळखता येणे जमल पाहीजे .नाती व माणसे नक्कीच जोडावीत ,जपावितही पण आपल्या भावना दुखतील इतके अधिकार देणे मुर्खपणाचेच....


जगायला नाती लागतात...माणसेही लागतात... पण मनाच्या आत कोणते व मनाच्या बाहेर कोणते माणसे ठेवायची हे जमलं कि ...."मग जगणं सोपं होत"....


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational