Shobha Wagle

Classics Fantasy

3  

Shobha Wagle

Classics Fantasy

मैत्री

मैत्री

2 mins
309


आजच्या युगात ह्या मैत्रिला खूपच महत्तव आहे. आपण जरा जूजबी ओळख झाली की ती माझी मैत्रीण किंवा माझा मित्र अस संबोधतो.

पण खरेच तो/ती आपले मित्र मैत्रीण असतात का? खरा, सच्चा मित्र कोण असतो?

मैत्री ही निव्वळ मैत्री असते. त्यात स्वार्थ नसतो.

मैत्री ही आरशातल्या प्रतिबिंबा सारखी पारदर्शक असते. मैत्री करायची नसते, ती होत असते. एकमेकांची मते पटू लागली, स्वभावामध्ये समानता आली, आवड निवड सारखी असली की मैत्री ही आपसूकच होत असते आणि ती सदैवच टीकते. 

आज प्रत्येक जण एकमेकांशी नाते जोडतात. त्यामध्ये प्रत्येकाचा काही ना काही आपला हेतू असतो आणि तो साध्य झाला की मैत्री दुरावली जाते. ह्याला मैत्री म्हणणे चूक आहे.

मित्र- सखा- सोबती, आपल्याकडे नुसतं पाहिलं की मनातले भाव ओळखणारा, आपली काळजी घेणारा. सुख दुःखात आपल्या बरोबर असणारा. आपलं दुःख जाणल्यावर आपल्याला आधार देणारा. आपला अत्यंत विश्वासाचा माणूस. प्रत्येक गोष्टीत आपल्याला सावरणारा. समजून घेणारा. आपली चूक दाखवणारा, आपल्याला चांगला सल्ला देणारा. आपल्यातले वाईट असलेले निर्भयपणे सांगणारा व ते दूर करणारा व्यक्ती. आपल्या करता सर्वस्व पणाला लावणारे मैत्रिचे नाते. अडी अडचणीला आपल्या बरोबर सतत असणारे नाते. मैत्री ही एकत्र खाणाऱ्या पिणाऱ्यांमध्येच असते असं नाही. दूर राहुनही एकमेकांच्या संपर्कात राहून एकमेकांना सांभाळणारी ही असते.

मैत्रिला लिंग, वय, जात, धर्म, गरीबी, श्रीमंती ह्याचं काही ही बंधन नसतं. फक्त माणूस, ज्या कुणाशी आपण मोकळेपणाने बोलतो व ज्यावर विश्वास ठेवतो व ती ही तेवढ्याच विश्वासाची असते, ती मैत्रीच खरी मैत्री. 

आपल्या शरिराचाच एक भाग समजून काळजी घेणारी सांभाळणारी निखळ मैत्री.

जीवनाचा मार्ग सूरळीत, सुखद जगण्याकरता प्रत्येकाला कमीत कमी एक तरी असा विश्वासू मित्र /मैत्रीण असावीच.

मैत्री दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics